नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : पपईच्या पानांचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Papaya Leaf) आतापर्यंत तुम्ही नैसर्गिक उपचारांसाठी कडुनिंब, तुळस, कोरफड, पुदीना यासारख्या पानांच्या वापराबद्दल ऐकले असेल. या यादीमध्ये पपईच्या पानांचाही (Papaya Leaf) त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी समावेश केला जातो, हे तुम्हाला माहीत आहे का? आयुर्वेदात (Ayurveda) या पानांच्या औषधी गुणधर्मांविषयी सांगितलं आहे. त्यानुसार वर्षानुवर्ष त्याचा वापर होत आहे. मात्र, आता डेंग्यूच्या उपचारांसाठीही याचा खूप वापर केला जात आहे. पपईचं फळ जेवढं डेंग्यूमध्ये उपयुक्त आहे, तेवढीच त्याची पानंही उपयुक्त असल्याचं सिद्ध होतंय.
आयुर्वेदात याचा उपयोग अनेक गंभीर आजारांच्या उपचारासाठी केला जातो. NBT च्या वृत्तानुसार, पपईची पाने रोज खाल्ल्यास अनेक आजार दूर ठेवता येतात.
असा करावा वापर
पपईची पानं पाण्याने चांगली धुवून ज्यूसरमध्ये बारीक करावीत. याची चटणी गाळणीतून गाळून घ्यावीत. हा रस एका काचेच्या बाटलीत साठवून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकता. हा रस थंड झाल्यावर प्यावा. याशिवाय, पपईची पानं चावून खाल्ल्यास अधिक फायदा होतो. याचे तंतू पोटात गेल्यामुळं पचनाला मदत होते. कोणतीही फळं, तंतुमय गुणधर्म असलेले पदार्थ कमीत कमी प्रोसेसिंग करून तसेच्या तसे आणि कच्चे खाल्ले असता अधिक फायदा होतो.
या रोगांवर आहे उपाय
1. डेंग्यू
डेंग्यूमध्ये प्लेटलेट्सची संख्या झपाट्यानं कमी होऊ लागते. प्लेटलेट्स कमी झाल्यामुळं आणि जास्त ताप आल्यामुळं शरीराला थकवा येऊन ब्रेकडाउन झाल्यासारखं वाटू लागतं. अशा परिस्थितीत पपईच्या पानांचं सेवन केलं तर प्लेटलेट्सची संख्या झपाट्यानं वाढते. पपईमध्ये अल्कलॉइड्स, पपेनसारखे अनेक महत्वाचे पोषक घटक असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती देखील वाढवतात.
2. मलेरिया
आयुर्वेदात पपईच्या पानांचा रस किंवा अर्क मलेरियाच्या उपचारांसाठीही वापरला जातो. पपईच्या पानांमध्ये प्लास्मोडिस्टॅटिक गुणधर्म असतात, जे मलेरियाचा ताप नियंत्रित करण्यास मदत करतात.
3. पचनक्रिया सुधारते
पपईच्या पानांमध्ये पपेन, कायमोपेपिन आणि अनेक अत्यावश्यक तंतू असतात, जे पचनक्रिया व्यवस्थित ठेवतात. याचं सेवन केल्यास पोट फुगल्यासारखं वाटणं, छातीत जळजळ, आंबट ढेकर, अपचनाची भावना आणि बद्धकोष्ठता आदी समस्या दूर होतात.
4. यकृत निरोगी ठेवते
पपईच्या पानांचे सेवन केल्यानं शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते आणि त्यामुळे रक्त शुद्ध होते. कोलेस्टेरॉल नियंत्रित केल्यानं लिपिडचे पेरोक्सिडेशन देखील कमी होतं. यामुळं यकृतशी संबंधित अनेक रोग जसं कावीळ, लिव्हर सिरोसिस आदी दूर राहतात.
हे वाचा - तुमचीही होतेय चिडचिड? हे उपाय पाहा करून राग होईल गायब
5. त्वचा आणि केस निरोगी बनवते
पपईच्या पानांचा रस प्यायल्यानं त्वचा आणि केसांच्या समस्याही दूर राहतात. त्याच्या सेवनानं त्वचेवरील मुरुम, मुरुमे आदींपासून सुटका मिळते. तुम्ही ही पानं बारीक करून डोक्याला लावू शकता, ज्यामुळे डोक्यातील कोंडाही दूर होतो. पपईची पानं आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. अनेक रोग दूर होतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips