Health Benefits Of Cardamom Water : वेलचीचा वापर जेवणाचा स्वाद द्विगुणित करण्यासाठी केला जातो. वेलची खाल्ल्यानं दुर्गंधीही दूर होते. एवढेच नाही तर वेलची खाल्ल्याने आरोग्यावरही चांगले परिणाम होतात. पण तुम्हाला माहीत नसेल की वेलची जेवणात घालण्याबरोबरच तुम्ही त्याचे पाणी देखील पिऊ शकता. वेलचीचे पाणी रोज प्यायल्याने अनेक आरोग्यवर्धक फायदे होतात. वेलचीचे पाणी पचन सुधारते आणि गॅसच्या समस्येपासून मुक्त करते. वेलचीचे पाणी कसे तयार करावे आणि त्याचा शरीराला कसा फायदा होतो ते जाणून घेऊया.
वेलचीचे पाणी कसे बनवायचे
सर्वप्रथम, एका लिटर पाण्यात 5 वेलचीची साल रात्रभर भिजवून ठेवा. त्यानंतर सकाळी ते कोमट पाणी प्या. हे पाणी तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा पिऊ शकता.
वेलचीचे पाणी पिण्याचे फायदे
कोलेस्टेरॉलवर नियंत्रण
वेलचीमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळं ते कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो आणि हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात
वेलचीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्णांनी त्याचे सेवन करणे आवश्यक आहे. तसेच त्यानं शरीराचा थकवा दूर होतो.
हे वाचा -
Weird News: येथे मृत्यूनंतर करीत नाही अंत्यसंस्कार; मृतदेहाला देतात सिगारेट आणि बरचं काही…
चांगले पचन होते
वेलचीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. त्याच्या सेवनाने आपण पोटाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होऊ शकतो.
वजन नियंत्रणात राहते
विविध पोषक आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असल्याने, वेलचीचे पाणी शरीरात साठवलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. यामुळे वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
हे वाचा -
फेस्टिव्ह ऑफर! Yamaha च्या या स्कूटर्सवर बंपर डिस्काउंट, ग्राहकांना 1 लाख जिंकण्याची संधी
(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी घेत नाही. या गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.