मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Vegetables For Heart : तुमचं हृदय निरोगी ठेवण्यासाठी नक्की खा या 5 भाज्या

Vegetables For Heart : तुमचं हृदय निरोगी ठेवण्यासाठी नक्की खा या 5 भाज्या

हिरव्या भाज्या शरीराला पोषक घटक तर पुरवतातच आणि रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. याच कारणामुळे डॉक्टर ताज्या आणि हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. आपले हृदय (Heart) निरोगी ठेवण्यासाठी भाज्या खाणं अत्यंत आवश्यक आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 05 सप्टेंबर : ताज्या भाज्या खाल्यानं आरोग्य चांगलं राहतं. भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. हिरव्या भाज्या शरीराला पोषक घटक तर पुरवतातच आणि रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. याच कारणामुळे डॉक्टर ताज्या आणि हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. आपले हृदय (Heart) निरोगी ठेवण्यासाठी भाज्या खाणं अत्यंत आवश्यक आहे. या व्यतिरिक्त वजन (Weight) कमी करण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती (Immunity) चांगली राखण्यासाठी भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. आजच्या व्यग्र जीवनात हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही विशेष भाज्यांचा आहारात उपयोग करणे अत्यंत आवश्यक आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी असणाऱ्या भाज्यांची माहिती घेऊ. हृदय निरोगी ठेवण्यासाठी या भाज्या खाव्यात

ब्रोकोली

ब्रोकोली हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. ब्रोकोलीमध्ये प्रथिने, कॅल्शियम, क्वेरसेटिन, कार्बोहायड्रेट्स, लोह, जीवनसत्त्वे ए आणि सी सारखी पोषक तत्त्वे असतात. जी शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी, आपण सूप, भाज्या आणि सॅलडच्या स्वरूपात ब्रोकोलीचा आपल्या आहारात समावेश करू शकता.

पालक

पालक हे पोषक तत्वांनी समृद्ध मानले जाते. त्यात लोह, प्रथिने, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फोलेट सारखे घटक असतात, जे रक्त आणि हृदयासाठी चांगले असतात.

गाजर

गाजर व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत मानले जाते. त्यात लोह, सोडियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, प्रथिने, व्हिटॅमिन ए, डी, बी 6 देखील असतात. गाजराचा आहारात समावेश करून तुम्ही हृदय निरोगी ठेवू शकता.

हे वाचा - हे पदार्थ उपवास काळात टाळाच; वाढेल अ‍ॅसिडिटी, होतील पोटाचे विकार

लसूण

लसूण हृदयासाठी चांगले आहे. हे व्हायरल इन्फेक्शनच्या जोखमीपासून संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य करते. लसणातील असलेले अॅलिसिन घटक कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते.

भेंडी

भेंडी हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगली मानली जाते. भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि असंतृप्त फॅटी अॅसिड आणि बीटा कॅरोटीन देखील विपूल प्रमाणात असते. भेंडीचा आहारात वापर केल्यानं हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

(सूचना : या लेखात दिलेले उपाय सामान्य माहितीवर आधारित आहेत. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)

First published:

Tags: Vegetables