केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले, "मी आणि माझ्या पत्नीने एकत्र कोरोना लस घेतली. पहिला डोस घेतल्याच्या 28 दिवसांनंतर आज आम्ही कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला. पहिला डोस घेतल्यापासून ते दुसरा डोस घेतल्यानंतर 30 मिनिटांनंतरही आम्हाला कोणताच त्रास झाला नाही. दोन्ही भारतीय कोरोना लशी सुरक्षित आणि प्रभावी आहेत" हे वाचा - काळजी घ्या! महाराष्ट्रातील 'या' 8 जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण काही लोकांच्या मनात कोरोना लशीबाबत प्रश्न आहेत. त्यांनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. कोरोना लस घेतल्यानंतर कोरोना संसर्गाचे काही मोजकीच प्रकरणं आहेत. पण कोरोना लस घेतल्यानंतर कोरोना संसर्ग झाला तरी त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची किंवा आयसीयूमध्ये दाखल करण्याची शक्यता खूप कमी असते, असं ते म्हणाले. हे वाचा - कोरोना महासाथीचा असाही परिणाम; तुमच्यासोबतही असंच घडतंय का ते पाहा देशात जानेवारी, 2021 पासून कोरोना लसीकरण सुरू झालं. लसीकरणाचा तिसरा टप्पा एक एप्रिलपासून सुरू होणार आहे. 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे.#COVID19Vaccine की दूसरी डोज़ लेने के बाद पत्रकारों से बात करते हुए मैंने कहा कि भारत में लगाई जाने वाली दोनों वैक्सीन बिल्कुल सुरक्षित और प्रभावी हैं। मैंने स्पष्ट किया कि लोग भारतीय वैक्सीन को लेकर किसी भी तरह के भ्रम या गलतफ़हमी में न रहें।@PMOIndia pic.twitter.com/12HTULkPIa
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) March 30, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.