मुंबई, 30 नोव्हेंबर : आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणाकडे वेळ नाही, अशा वेळी आरोग्य विमा तुम्हाला खूप मदत करू शकतो. उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये येणारा मोठ्या प्रमाणातील खर्च पाहता आरोग्य विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण त्वचेसंबंधीत आजार उद्भवल्यानंतर आरोग्य विम्याचा फायदा होतो का, हे तुमच्यापैकी अनेकांना माहिती नसेल. चला तर आज याबाबत जाणून घेऊ. ‘झी बिझनेस हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय.
त्वचेशी संबंधित समस्या आणि रोगांशी संबंधित मेडिकल शाखेला डरमॅटॉलॉजी (त्वचा विज्ञान) म्हणतात. त्वचेच्या कोणत्याही आजारावर उपचार करणं हे त्वचारोगतज्ज्ञाचं काम असतं. त्वचारोगतज्ज्ञ त्वचेच्या आजाराचं निदान करतो, आणि त्यानुसार उपचार करतो. यामध्ये त्वचा, केस, नखं, चरबी, तोंडाचा कॅन्सर, कॉस्मेटिक कंडिशन आदींचा समावेश होतो. डरमॅटॉलॉजी उपचार मेडिकल आणि सर्जिकल अशा दोन्ही प्रकारचे असू शकतात. हे उपचार महाग असण्याची शक्यताही असते.
हे ही वाचा : पिझ्झा-बर्गर खाणं म्हणजे कॅन्सरला आमंत्रण? वैज्ञानिकांकडून अलर्ट
त्वचेच्या कॅन्सरसाठी केमोथेरपी किंवा त्वचेच्या विकारांवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया तुमच्या खिशावर बोजा पडू शकते. यासोबतच कॉस्मेटिक किंवा प्लॅस्टिक सर्जरी हादेखील महागड्या उपचारांपैकी एक आहे. कधीकधी डरमॅटॉलॉजीशी संबंधित उपचार दीर्घकाळ सुरू असतात. त्यामुळे तुमच्या बचतीवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी त्वचारोग उपचारांचा समावेश असलेल्या आरोग्य विम्याबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
आरोग्य विम्यात कोणते त्वचारोग आहेत कव्हर?
तुम्ही आरोग्य विम्यामध्ये डरमॅटॉलॉजी उपचारांतर्गत स्किन ट्रिटमेंट, मुरुम, स्किन कॅन्सर, स्किन व्हायरल रोग, पुरळ, स्किन फंगल इन्फेक्शन, रिकंस्ट्रक्टिव्ह सर्जरी, सोरायसिस, त्वचेची ॲलर्जी, पॉयझन आयव्ही रॅश, पोर्ट वाइन डाग समाविष्ट करू शकता. तर, कॉस्मेटिक सर्जरी, नॉन-ॲक्सिडेंटल प्लॅस्टिक सर्जरी, बोटॉक्स, टॅटू रिमूव्हल, फीलर्स, केमिकल पील्स, मायक्रोडर्माब्रेशन फेशियल हे आरोग्य विम्यामध्ये डरमॅटॉलॉजी उपचारांतर्गत समाविष्ट नाहीत.
भारतातील आरोग्य विमा योजना मुख्यतः डरमॅटॉलॉजी किंवा त्वचेच्या समस्यांचा कव्हर करतात. तुमच्याकडे आरोग्य विमा पॉलिसी असल्यास, तुम्ही त्वचेशी संबंधित समस्यांसाठी तुमच्या उपचाराचा खर्च कव्हर करण्यासाठी क्लेम करू शकता. स्किन कॅन्सरवरील उपचारांचा खर्च हा गंभीर आजार विमा पॉलिसी तसेच कॅन्सर विमा पॉलिसी अंतर्गत कव्हर होतो.
अर्थात कव्हरेजची व्याप्ती एका विमा कंपनीपेक्षा दुसऱ्या विमा कंपनीची भिन्न असू शकते. उदाहरणार्थ, काही आरोग्य विमा योजना केवळ डरमॅटॉलॉजी उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलायझेशन खर्च कव्हर करतात. परंतु या योजनांमध्ये डे-केअर प्रक्रिया आणि ओपीडी कन्सल्टेशन खर्च योजनेतून बाहेर ठेवले जातात. दुसरीकडे, काही आरोग्य विमा कंपन्या हॉस्पिटलायझेशन खर्च, ओपीडी कन्सल्टेशन खर्च तसेच डे-केअर प्रक्रियांसाठी कव्हरेज देऊ शकतात.
हे ही वाचा : शरीराच्या 'या' भागांमध्ये चरबी जमा होणे धोकादायक; असू शकतो गंभीर आजाराचा धोका!
त्यामुळे, पॉलिसी अंतर्गत कोणत्या प्रकारचे डरमॅटॉलॉजी उपचार समाविष्ट आहेत, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी त्यातील अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. स्किन कॅन्सरसाठी रेग्युलर आरोग्य विमा पॉलिसीचा प्रतीक्षा कालावधी बहुतेक एक किंवा दोन वर्षांचा असतो. दुसरीकडे, गंभीर आजार विमा पॉलिसी अंतर्गत, स्किन कॅन्सर 90 दिवसांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर 30 दिवसांच्या सर्व्हायवल पीरिएडसह संरक्षित आहे.
पॉलिसी विकत घेण्यापूर्वीच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचा रोग किंवा कॅन्सर असेल तर, तर ही स्थिती प्री-एक्झिस्टिंग आजाराअंतर्गत येईल. अशा परिस्थितीत, तुम्हाला आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत त्वचारोगाच्या समस्येसाठी क्लेम करण्यापूर्वी निश्चित कालावधी संपण्याची प्रतीक्षा करावी लागेल. सामान्यत: प्री-एक्झिस्टिंग रोगांसाठी एक ते चार वर्षांचा प्रतीक्षा कालावधी असतो.
दरम्यान, आरोग्य विमा पॉलिसी असणं आजच्याजीवनात खूप आवश्यक झालं आहे. पण आरोग्य विमा पॉलिसी घेताना त्यामध्ये कोणकोणत्या आजारांचा समावेश आहे, हे पाहणंही महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.