मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Fact Check: गुळवेलीमुळे यकृत निकामी ही फक्त अफवा; आयुर्वेदिक औषधावर मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

Fact Check: गुळवेलीमुळे यकृत निकामी ही फक्त अफवा; आयुर्वेदिक औषधावर मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

गुळवेल या वनस्पतीचा प्राचीन काळापासून औषधी द्रव्यांमध्ये समावेश होतो.

गुळवेल या वनस्पतीचा प्राचीन काळापासून औषधी द्रव्यांमध्ये समावेश होतो.

गुळवेल या वनस्पतीचा प्राचीन काळापासून औषधी द्रव्यांमध्ये समावेश होतो.

  मुंबई, 7 जुलै:   कोरोना संसर्ग पसरू लागल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय (Preventive Measure) म्हणून, तसंच शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी (Immunity) अनेक आयुर्वेदिक औषधं (Ayurvedic Medicines), तसंच काढ्यांची शिफारस करण्यात आली. तज्ज्ञांच्या अभ्यासातून निश्चित झाल्यानंतर आयुष मंत्रालयानेही (Ayush Quath) तशा अनेक शिफारशी (Recommendations) केल्या. त्यातच गुडुची/गुळवेल/गिलोय सेवनाच्या शिफारशीचाही समावेश आहे. अनेक डॉक्टर्सही गुळवेलीचा काढा पिण्याचा सल्ला पेशंटना देत आहेत. त्याचा चांगला उपयोगही होत असल्याचं दिसून आलं आहे; मात्र जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपरिमेंटल हिपॅटोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखानंतर याबद्दल वाद उत्पन्न झाला आहे. त्या लेखात असा दावा करण्यात आला आहे, की कोरोना कालखंडात गुळवेलीचा काढा सेवन केल्याने अनेक पेशंटचं यकृत अर्थात लिव्हर (Liver Damage) खराब झालं आहे. या दाव्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, आयुष मंत्रालयाने (Ayush Ministry) या वादाची दखल घेतली असून, या लेखात करण्यात आलेला दावा पूर्णतः चुकीचा असल्याचा निर्वाळा दिला आहे. गिलोय अर्थात गुळवेलीमुळे यकृत खराब होण्याची गोष्ट ही निव्वळ एक अफवा असून, गुळवेलीचा काढा पूर्णतः सुरक्षित असल्याचं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे.

  Tinospora cordifolia हे गुळवेलीचं शास्त्रीय नाव आहे. गुळवेलीला संस्कृतात गुडुची किंवा गिलोय असंही म्हणतात. आयुर्वेदाच्या (Ayurveda) दृष्टीने गुळवेल अत्यंत गुणकारी असून, अनेक विकारांवरच्या औषधात गुळवेलीचा समावेश असतो; मात्र वर उल्लेख केलेल्या लेखात अशी माहिती देण्यात आली आहे, की गुळवेलीच्या सेवनामुळे मुंबईत आतापर्यंत सहा जणांचं यकृत निकामी झालं आहे. आयुष मंत्रालयाचं म्हणणं आहे, की या शोधाशी निगडित असलेल्या व्यक्ती त्यांचा शोध योग्य पद्धतीने मांडू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यावर इतकी चर्चा होत आहे. गुळवेल आणि तिची गुणवैशिष्ट्यं यांचं योग्य विश्लेषण या शोधात करण्यात आलेलं नाही. संबंधित पेशंटना देण्यात आलेलं औषध गुळवेलीचंच होतं की अन्य कोणती जडी-बुटी त्यात वापरण्यात आली होती, ते या शोधकर्त्यांनी तपासून पाहावं, असं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे.

  (हे वाचा:Gymनंतर पाळावेत काही नियम; फायद्याऐवजी होईल नुकसान  )

  गुळवेलीबद्दल अशा अफवा पसरवणं म्हणजे प्राचीन आणि पारंपरिक भारतीय औषधप्रणालीविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे. पुरातन काळापासून जडी-बुटीमध्ये गुळवेलीचा वापर केला जात आहे. अनेक गंभीर विकारांवर मात करण्यासाठी गुळवेलीचा समावेश असलेलं औषध प्रभावी ठरतं. औषधी वनस्पतीची ओळख योग्य प्रकारे झाली नसल्यासदेखील संशोधनात विपरीत परिणाम झाल्याचं दिसू शकतं. गुळवेलीसारख्या दिसणाऱ्या अनेक वनस्पती असतात. त्यामुळे गुळवेल समजून भलतीच वनस्पती औषधासाठी वापरली असेल, तर त्या दुष्परिणाम होणारच, असं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे.

  गुळवेलीसारख्या दिसणाऱ्या या वनस्पतीचा संशोधनाकरिता औषध म्हणून वापर करण्यापूर्वी निर्धारित मार्गदर्शक सूचनांचं (Standard Guidelines) पालन करून ती वनस्पती नेमकी कोणती आहे, याची नेमकी ओळख पटवणं गरजेचं होतं. त्यानंतर संशोधनासाठी या वनस्पतीचा वापर केला जायला हवा होता; प्रत्यक्षात मात्र तसं करण्यात आलेलं नाही, असंही आयुष मंत्रालयाने सांगितलं.

  (हे वाचा: कोरोना काळात वाढाला ताण; विद्यार्थांसाठी स्ट्रेस कमी करणारे उपाय)

  जाणून घ्या गुळवेलीविषयी...

  गुळवेल या वनस्पतीचा प्राचीन काळापासून औषधी द्रव्यांमध्ये समावेश होतो. अनेक प्रकारच्या विकारांवर उपचार करण्यासाठी गुळवेलीचा वापर केला जातो. अमरत्व प्रदान करणारी वनस्पती अशीही तिची ओळख आहे. इम्युनिटी बूस्टर (Immunity Booster) अर्थात प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक यात असल्याने कोरोना साथीच्या (Corona Pandemic) काळात गुळवेलीच्या वापराची शिफारस करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर वापरही झाला. गुळवेलीत अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) मोठ्या प्रमाणावर असतात; मात्र गुळवेलीचा वापर आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे नेमक्या आणि मोजक्या प्रमाणातच केला जाणं अत्यावश्यक आहे. कारण त्यावरही औषधाचा प्रभाव आणि दुष्परिणाम अवलंबून असतात, असं आयुर्वेद सांगतो. त्यामुळे कोणतीही वनस्पती आयुर्वेदाच्या दृष्टीने औषध समजली जात असली, तरी तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याशिवाय आणि योग्य त्या प्रमाणातच तिचं सेवन करणं अत्यावश्यक असतं. व्यक्तिपरत्वे त्यात बदल होऊ शकतो.

  (हे वाचा:घरगुती उपाय जरूर करा; पण 'या' गोष्टी लक्षात ठेवा! होणार नाहीत Side Effects  )

  गुळवेलीचे उपयोग

  - गुळवेलीच्या सेवनाने रक्तशुद्धी होते.

  - यकृताशी संबंधित विकारांपासून गुळवेल संरक्षण करते.

  - शरीरातून विषद्रव्यं बाहेर टाकण्याचं काम गुळवेल करते.

  - मूत्रमार्गाचा संसर्ग अर्थात Urinary Track Infection थांबवण्यासाठीही गुळवेल उपयुक्त आहे.

  - पचनक्रिया सुधारण्याचं काम गुळवेल करते.

  - श्वासाशी संबंधित आरोग्य समस्या गुळवेलीमुळे बऱ्या होतात.

  - ताण, चिंता यातून मुक्ततेसाठीही गुळवेलीचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

  - ज्वर अर्थात तापावर औषध म्हणूनही गुळवेलीचा उपयोग होतो.

  First published:
  top videos

   Tags: Coronavirus, Health Tips