मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Benefits of Steam Bath: काय आहेत स्टिम बाथचे फायदे?, घ्या जाणून

Benefits of Steam Bath: काय आहेत स्टिम बाथचे फायदे?, घ्या जाणून

Steam Bath

Steam Bath

स्टीम बाथ (Steam Bath) घेण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कारण स्टीम बाथ ही फक्त दैनंदिन क्रिया राहिली नसून तो एक फिटनेस (Fitness) चा भाग झाला आहे.

    नवी दिल्ली, 24 डिसेंबर: रोज व्यायामासाठी जिमला जाणाऱ्यांना स्टीम बाथ माहीत असतेच. तसंच सामान्यतः स्टीम बाथ हा व्यायाम केल्यावर घेतला जातो, असा आपला समज आहे. पण याचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

    स्टीम बाथ (Steam Bath) घेण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कारण स्टीम बाथ ही फक्त दैनंदिन क्रिया राहिली नसून तो एक फिटनेस (Fitness) चा भाग झाला आहे. आयुर्वेदातही (Ayurved) स्टीम बाथचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. असं म्हटलं जातं की, स्टीम बाथ घेतल्याने ना केवळ शरीर निरोगी राहतं, तर त्वचाही तुकतुकीत राहण्यास मदत होतो.

    थंडीच्या दिवसात (Winter) आपण हमखास गरम पाण्याने आंघोळ करतो. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, स्टीम बाथ घेतल्याने तुमची थंडी तर पळेलच सोबतच शरीराचा थकवा आणि सांधेदुखीही दूर होईल. स्टीम बाथ हे डायबेटिसच्या (Diabetes) रूग्णांसाठीही गुणकारी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

    स्टीम बाथमध्ये आपल्या आसपासचं वातावरण खूप गरम होतं. ज्यामुळे आपला श्वासही उबदार होतो. उबदार श्वासामुळे फुफ्फुसांत जमलेला कफ बाहेर पडण्यास मदत होते. स्टीम बाथ ही आता थेरेपी म्हणून वापरली जाते. TV9 हिंदीच्या वृत्तानुसार जाणून घेऊया याचे काही आरोग्यदायी फायदे.

    वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. स्टीम बाथ योग्य प्रकारे घेतल्यास तुम्हाला शरीरातील कॅलरी बर्न (Calories Burn) करण्यास मदत होते. यामुळे निश्चितच वेटलॉस (Weight Loss) होतो.

    स्टीम बाथमध्ये जेव्हा आपलं शरीर गरम पाण्याच्या संपर्कात येतं. तेव्हा ते ल्युकोसाईट्सला उत्तेजित करतं. ज्या आपल्याला रोग संक्रमणाशी लढण्यास मदत करतात. त्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी स्टीम बाथ उपयुक्त आहे.

    रक्तदाबावरही (Blood Pressure) स्टीम बाथ प्रभावी असल्याचं एका अभ्यासात दिसून आलं आहे. या अभ्यासानुसार स्टीम बाथमध्ये आपल्या शरीरातून असे हॉर्मोन्स उत्सर्जित होतात. जे हृदयाची गती कमी करण्यास मदत करतात. जर तुम्ही रोज स्टीम बाथ घेतली तर तुमचं रक्ताभिसरण योग्य राहतं. परिणामी, तुम्हाला अनेक आजारांना दोन हात लांब ठेवता येईल.

    हिवाळ्यात अनेक त्वचेच्या समस्या उद्भवतात. अशावेळी त्वचेची छिद्र मोकळी व्हावी याकरता तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता. स्टीम बाथ घेतल्याने त्वचेची रंध्र मोकळी होऊन त्वचा तुकतुकीत दिसते.

    आरोग्यदायी फायद्यांसोबत स्टीम बाथ हे आपला मूड चांगला करण्यासाठीही उपयुक्त ठरते. ज्यामुळे शरीराचा थकवा आणि निद्रानाश यासारख्या समस्या दूर होतात.

    First published:

    Tags: Health, Health Tips