Almond Tea : दररोज घ्या बदाम चहा; सेवनामुळे टळतील 'हे' घातक आजार!

Almond Tea : दररोज घ्या बदाम चहा; सेवनामुळे टळतील 'हे' घातक आजार!

सातत्याने बदाम आपल्या आहारात आल्यामुळे ह्रदयविकाराचा (Heart) धोका कमी होतो. अनेकदा विविध कारणांमुळे आपल्या शरिरात सूज तयार होते, त्यासाठीही बदाम उपायकारक ठरू शकते. कारण बदामामुळे शरिराला डिटॉक्सीफाई (Ditoxify) करण्यास मदत होते.

  • Share this:

दिल्ली, 13 सप्टेंबर : भारतात लोकांना (Tea) चहाचे फार वेड आहे. दिवसातून अनेकदा लोकांना कामावर असताना किंवा नसतानाही चहा हवाच असतो. त्यामुळे चहाचे व्यसन लागले आहे. आता हे व्यसन अनेकदा घातक ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे फार वेळा चहा घेणे हे आरोग्यासाठी हानीकारक (Harmful to health) ठरू शकते. त्यामुळे अनेकदा लोक चहा घेतात, परंतु त्यात वेगवेगळी फ्लेलरची चहा घेतात. त्यामुळे त्यातून होणारे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात. बदाम हे शरिरासाठी फार उपयुक्त असते. अनेकांना ते खायला आवडते. पण जर तेच चहात मिसळून बदामयूक्त चहा तयार केला तर त्याचा उपयोग शरिरातील अनेक आजारांपासून सुटका करण्यासाठी केला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का की बदामयुक्त चहाच्या सेवनामुळे आरोग्याला कोणते आणि कसे फायदे आहेत, तर ते आपण जाणून घेऊयात.

सातत्याने बदाम आपल्या आहारात आल्यामुळे ह्रदयविकाराचा (Heart)  धोका कमी होतो. अनेकदा विविध कारणांमुळे आपल्या शरिरात सूज तयार होते, त्यासाठीही बदाम उपायकारक ठरू शकते. कारण बदामामुळे शरिराला डिटॉक्सीफाई (Ditoxify) करण्यास मदत होते. लहान मुलांना आणि वृद्धांना गुडघेदुखीचा होणारा त्रासही बदामाच्या सेवनामुळे कमी होतो. बदामाच्या सेवनामुळे आणि त्यापासून बनवलेल्या चहामुळे आपल्या आरोग्याला याच पद्धतीचे अनेक प्रकारचे फायदे होतात.

केसांच्या अनेक समस्यांवर कारलं आहे गुणकारी; कोंडा घालवण्यासाठी ठरेल उपयोगी

बदामयुक्त चहा कशी बनवाल?

सर्वात आधी बदामाला रात्रभर भिजवून ठेवा.

भिजवल्यानंतर त्यावरील साल काढून घ्या.

आता या बदामाला बरिक करून त्याची पाण्यासोबत पेस्ट तयार करा.

तयार झालेल्या या पेस्टला पाण्यातून उकडून घ्या.

त्यानंतर आपण याला गरम किंवा थंड करून पिऊ शकतो.

(Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Published by: Atik Shaikh
First published: September 13, 2021, 2:30 PM IST

ताज्या बातम्या