मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Health Benefits Of Adusa: सर्दी-खोकल्यापासून ते सांधेदुखीवरही उपयोगी आहेत अडुळशाची पानं; अशा पद्धतीनं करा वापरा

Health Benefits Of Adusa: सर्दी-खोकल्यापासून ते सांधेदुखीवरही उपयोगी आहेत अडुळशाची पानं; अशा पद्धतीनं करा वापरा

अडुळश्याची पाने चावल्याने कोरडा खोकला आणि घशात आराम मिळतो. पावसाळ्यात होणाऱ्या विषाणूजन्य तापामध्येही हे खूप फायदेशीर आहे. त्याचा काढा प्यायल्यानं शरीरातील थकवा आणि वेदना दूर होतात.

अडुळश्याची पाने चावल्याने कोरडा खोकला आणि घशात आराम मिळतो. पावसाळ्यात होणाऱ्या विषाणूजन्य तापामध्येही हे खूप फायदेशीर आहे. त्याचा काढा प्यायल्यानं शरीरातील थकवा आणि वेदना दूर होतात.

अडुळश्याची पाने चावल्याने कोरडा खोकला आणि घशात आराम मिळतो. पावसाळ्यात होणाऱ्या विषाणूजन्य तापामध्येही हे खूप फायदेशीर आहे. त्याचा काढा प्यायल्यानं शरीरातील थकवा आणि वेदना दूर होतात.

मुंबई,  10 सप्टेंबर : आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाणारी एक महत्त्वाची वनस्पती म्हणजे अडुळसा. अडुळश्याच्या पानांपासून ते लाकडापर्यंत (Health Benefits Of Adusa) सगळ्या गोष्टींचा औषध म्हणून उपयोग होतो. ही एकेन्थेसिया (Acanthaceae )कुळातील वनस्पती आहे. याची पाने लांब असतात. अडुळश्याची पानं उकळून आणि काढा प्यायल्याने सर्दी आणि खोकल्यामध्ये खूप आराम मिळतो. अडुळश्याची पाने चावल्याने कोरडा खोकला आणि घशात आराम मिळतो. पावसाळ्यात होणाऱ्या विषाणूजन्य तापामध्येही हे खूप फायदेशीर आहे. त्याचा काढा प्यायल्यानं शरीरातील थकवा आणि वेदना दूर होतात. त्याच्या काही खास फायद्यांविषयी आपण जाणून घेऊया.

फोड कमी होतात

जर तुम्ही अल्सरच्या समस्येने त्रस्त असाल तर अडुळश्याची दोन ते तीन पाने चावून त्याचा रस चोखल्यानंतर फोड लवकर बरे होतात. चघळल्यानंतर पाने फेकून थूकून टाका.

हिरड्या आणि दातदुखी आराम

दात आणि हिरड्यांच्या अनेक प्रकारच्या समस्या अडुळश्याच्या लाकडाने घासल्याने बरे होतात. यासोबतच दात आणि हिरड्यांच्या दुखत असतील तरीही त्यावर आराम मिळतो.

श्वसन रोगांपासून मुक्तता

मधात मिसळून अडुळश्याच्या पानांचा रस प्यायल्याने खोकला आणि श्वसनाचे आजार बरे होतात. कोरडा खोकला घालवण्यासाठी अडुळश्याची पाने, मनुका आणि साखर कँडीचा काढा पिणं उपयुक्त आहे.

हे वाचा - Good News! पगारवाढीसाठी राहा तयार, या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार जबरदस्त Salary Hike

सांधेदुखी पासून आराम

अडुळश्याच्या पानांचा वापर सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी देखील केला जातो. त्यात आढळणारे दाहक-विरोधी गुणधर्म संधिवात, जळजळ कमी करण्यास मदत करतात.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी घेत नाही. हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधावा.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips