मराठी बातम्या /बातम्या /heatlh /लसणाच्या पातीचे आहेत अनेक फायदे, तुम्ही कधी ऐकलेही नसतील!

लसणाच्या पातीचे आहेत अनेक फायदे, तुम्ही कधी ऐकलेही नसतील!

पालेभाज्यांबरोबर कंदमुळं, कांदा, लसूण (Onion and Garlic) यांच्या पातीही आपण भाजी करून खातो. त्यातून आपल्याला अनेक प्रकारे शक्ती मिळते. यापैकी लसणाची पातीही (Green Garlic) तितकीच महत्त्वाची आहे.

पालेभाज्यांबरोबर कंदमुळं, कांदा, लसूण (Onion and Garlic) यांच्या पातीही आपण भाजी करून खातो. त्यातून आपल्याला अनेक प्रकारे शक्ती मिळते. यापैकी लसणाची पातीही (Green Garlic) तितकीच महत्त्वाची आहे.

पालेभाज्यांबरोबर कंदमुळं, कांदा, लसूण (Onion and Garlic) यांच्या पातीही आपण भाजी करून खातो. त्यातून आपल्याला अनेक प्रकारे शक्ती मिळते. यापैकी लसणाची पातीही (Green Garlic) तितकीच महत्त्वाची आहे.

  मुंबई, 14 जानेवारी : आपल्या स्वयंपाकघरात अनेक मसाले असतात. अगदी हळद, मिरे, जिरे, ओवा असे अनेक पदार्थ आपल्या किचनमधल्या मिसळण्याच्या डब्यात असतात. हे सगळे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असतात. आयुर्वेदाने (Ayurveda) त्यांचे गुणधर्म सांगून ठेवले आहेत, त्यामुळे आपल्या भारतातील अन्नपदार्थांमध्ये मसाले वापरले जातात आणि ते आपोआप आपलं आरोग्य चांगलं राखतात. जसे मसाले महत्त्वाचे आहेत तसंच भाज्याही अत्यंत गुणकारी असतात. पालेभाज्यांबरोबर कंदमुळं, कांदा, लसूण (Onion and Garlic) यांच्या पातीही आपण भाजी करून खातो. त्यातून आपल्याला अनेक प्रकारे शक्ती मिळते. यापैकी लसणाची पातीही (Green Garlic) तितकीच महत्त्वाची आहे.

  हिरव्या लसणाचा वापर अन्नपदार्थांमध्ये केला जातो त्याला स्प्रिंग गार्लिकही (Spring Garlic) म्हणतात. हा लसूण खूप तिखट नसतो. लसणाची कळी जमिनीत तयार होण्याआधीच त्याची पात जमिनीतून बाहेर काढली जाते. हिरवा लसूण किंवा बेबी लसूण म्हणून प्रसिद्ध असलेला हा लसूण त्याच्या स्वादामुळेच सगळ्यांना आकर्षित करून घेतो.

  लसणामुळे अनेक पदार्थांच्या चवीत मोलाची भर पडते. सुप, चीजी डिप्स, गार्लिक ब्रेड, स्टर-फ्राय किंवा अगदी कोशिंबिर, मीट रोस्ट या पदार्थांची चवही लसणामुळेच लज्जतदार होते.

  हिरव्या लसणात एलिसिन नावाचा अँटिऑक्सिडंट घटक भरपूर प्रमाणात असतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल(Cholesterol) कमी करण्यासाठी एलिसिन खूप मदत करतं. शरीरावर सूज आली असेल, सर्दी, खोकला किंवा फ्लू झाला असेल तरीही लसूण खाणं फायद्याचं ठरते. शरीरावरची सूज कमी करायला मदत होते.

  एलिसिन या अँटिऑक्सिडंटमुळे (Antioxidant Properties) शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. काही अभ्यासांनुसार लसणात असलेल्या एलिसिनमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या शरीरातील पेशींची वाढ रोखण्यास काही प्रमाणात मदत होते.

  सध्या भारतात चिनी खाद्यपदार्थ (Chinese Food) खाण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. अगदी तालुक्याच्या ठिकाणी किंवा अगदी निमशहरी भागांतही आता चॅयनिज खाद्याच्या गाड्या दिसतात. त्या पदार्थांमध्ये कांद्याच्या पातीबरोबरच लसणाच्या पातीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तसंच त्यांच्या सर्व मसाल्यांमध्ये भरमसाठ प्रमाणात लसूण असतो. आपल्या घरांतही नूडल्स अगदी सर्रास तयार होतात. यामुळे आपल्या शरीरात लसूण जातो आहे.

  आयुर्वेदाने हेदेखील सांगितलंय की कितीही गुणकारी अन्नपदार्थ किंवा औषध असलं तरीही अति तेथे माती होते. त्यामुळे ते अति सेवन केलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे जर तुम्हाला लसणाचा किंवा लसणाच्या हिरव्या पातीचा वापर जेवणात करायचा असेल तर तोही प्रमाणातच करायला हवा.

  First published: