कोरोना काळात फक्त शारीरिक नाही तर मानसिक परिणामही होतो. अँझायटी, स्ट्रेस जाणवतो आहे आणि हे कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट उत्तम आहे. कमीत कमी 70 टक्के कोको पावडर असलेलं चॉकलेट खा, जेणेकरून अँझायटी कमी होईल, असा सल्ला केंद्राने दिला आहे. (मधुमेह आणि हृदयविकार असूनही कोरोनाला हरवलं, 92 वर्षाचे आजोबा झाले ठणठणीत) डार्क चॉकलेट शिवाय आणखीन कोणते पदार्थ फायदेशीर आहेत हे देखील या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. नाचणी, जवस आणि अमर वेलचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. तर इम्युनिटी वाढवण्यासाठी हळदीचं दूध (Turmeric milk) पिण्यासही सांगण्यात आलंय. शिवाय आमचूर पावडरही फायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. ड्राय फ्रुट (Dry fruit) खाल्ल्यानेही इम्युनिटी वाढते. त्यामुळे बदाम, आक्रोड, मनुका खायला हव्यात. तर ऑलिव्ह ऑईल, राई तेलही चांगलं आहे. प्रोटीन शरीरात चांगल्या प्रमाणात असायला हवं. त्यासाठी अंड,मासे, पनीर, सोयाबीन यांचंही सेवन करायला हवं. (RT-PCR टेस्टसाठी पर्यायी ठरेल ही रॅपिड टेस्ट, मधमाश्या लावणार COVID रुग्णाचा शोध) कोरोना काळात हलका, पचायला सोपा आहार थोड्याथोड्या वेळाने घ्यायला हवा. शिवाय भरपूर पाणी प्यायला हवं. भरपूर पाणी पिण्याने शरीर हायड्रेट (Hydrate) राहतं. याकाळात इम्युनिटी वाढवण्यासाठी आहाराबरोबर व्ययामाकडे लक्ष द्यावं बाहेर जाणं शक्य नसेल तरी, घरातच व्यायाम करावा. प्राणायाम, योगासन रोज करावीत.Are you looking for natural ways to boost your immunity? We’ve got you covered! Here’s few general measures which you can follow to boost your immunity organically amidst #COVID19. #StayHomeStaySafe#IndiaFightsCorona @MoHFW_INDIA @MIB_India @PIB_India pic.twitter.com/KfKk2pLyeL
— MyGovIndia (@mygovindia) May 6, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Health, Health Tips, Lifestyle