मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

अरे बापरे! Chewing gum खाऊन खाऊन तरुणीची भयंकर अवस्था; अखेर जीवच गेला

अरे बापरे! Chewing gum खाऊन खाऊन तरुणीची भयंकर अवस्था; अखेर जीवच गेला

च्युइंगम (chewing gum) चघळल्याने आपल्या मुलीचा मृत्यू झाला असा दावा तिच्या आईने केला आहे.

च्युइंगम (chewing gum) चघळल्याने आपल्या मुलीचा मृत्यू झाला असा दावा तिच्या आईने केला आहे.

च्युइंगम (chewing gum) चघळल्याने आपल्या मुलीचा मृत्यू झाला असा दावा तिच्या आईने केला आहे.

  • Published by:  Priya Lad
ब्रिटन, 31 मे :  काम करताना, प्रवास करताना, गाणी ऐकताना अनेकांना च्युइंगम खाण्याची (chewing gum) सवय असते. ज्याप्रमाणे काहींना सिगारेट किंवा दारूचं व्यसन असतं, अगदी तसंच अनेकांना च्युइंगमचं व्यसन असतं असं म्हणण्यास हरकत नाही. च्युइंगम चुकून घशात किंवा शरीराच्या आत अडकला तर मोठं संकट उभं राहू शकतं. पण फक्त च्युइंगम चघळून जीव जाऊ (chewing gum cause girl death) शकतो, का असा प्रश्न नक्कीच आपल्याला पडले. ब्रिटनच्या एका महिलेने च्युइंगममुळे आपल्या मुलीचा जीव गेला आहे, असा दावा केला आहे. मुलीच्या मृत्यूच्या 10 वर्षांनी आईने तिच्या मृत्यूच्या कारणाबाबत मोठा खुलासा केला आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार ब्रिटनच्या लैननेलीमध्ये राहणारी मारिया मॉर्गनची 19 वर्षाची मुलगी सामंथा जेनकिंसचा 2011 साली मृत्यू झाला. ती अचानक आजारी पडली होती. सुरुवातीला आपल्या मुलीला सामान्य आजार असावा असंच मारियाला वाटलं. पण हळूहळू तिची तब्येत खूपच बिघडली. तिला प्रिन्स फिलिप रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ती बेशुद्ध झाली होती. तिच्यावर उपचार सुरू होते. पण तीन दिवसांतच तिचा मृत्यू झाला. हे वाचा - फक्त 45+ लोकांनाच मोफत कोरोना लस का?; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला झापलं आपल्या मुलीच्या मृत्यूमुळे मारिया हादरली. ती स्वस्थ बसली नाही. तिला आपल्या मुलीच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधायचं होतं. त्यासाठी तिने शोधाशोध सुरू केली. सामंथाचा टॉक्सिकोलॉजी रिपोर्ट निगेटिव्ह होता. मारियाच्या दुसऱ्या मुलीने सांगितलं की सामंथा च्युइंगम खूप खायची. त्यानंतर मारियाने तिच्या खोलीची तपासणी केली. जिथं च्युइंगम खरेदी केल्याचे खूप बिल सापडले. त्या बिलनुसार सामंथा दिवसाला कमीत कमी एक पाकिट किंवा दोन पाकिटही च्युइंगम खायची. त्यानंतर च्युइंगचा काय दुष्परिणाम होतो, हे शोधायला तिने सुरुवात केली. च्युइंगममुळे मानवी शरीरातील सॉल्ट खूप कमी होतं. मॉरिस्टन रुग्णालयातील पॅथॉलॉजिस्ट डॉ. पॉल ग्रिफिथ्स यांनी सामंथाच्या मृत्यूचं कारण इलेक्ट्रोलाइट्सची कमी झाल्याने होणारा सेरेब्रल हाइपोक्सिया सांगितलं होतं. सामंथाच्या शरीरात मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, सोडिअम आणि कॅल्शिअमची कमी होती. दीर्घकाळ भरपूर प्रमाणात च्युइंगम खाल्ल्याने तिला हे सर्व झालं होतं. हे वाचा - धुम्रपान करणाऱ्यांसाठी जास्त घातक आहे कोरोना, मृत्यूचा 50 टक्के अधिक धोका - WHO सामंथाच्या मृत्यूला 6 जूनला 10 वर्षे पूर्ण होतील. तिच्या आईने च्युइंगमच्या दुष्परिणाबाबत सांगितलं आहे. आपल्या मुलीवर जी वेळ आली ती कुणावर येऊ नये, यासाठी आता या आईची धडपड सुरू आहे.
First published:

Tags: Health, Lifestyle

पुढील बातम्या