मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

बापरे! तिखट खाताच छातीचा झाला खुळखुळा, मोडल्या तरुणीच्या बरगड्या; धक्कादायक कारण

बापरे! तिखट खाताच छातीचा झाला खुळखुळा, मोडल्या तरुणीच्या बरगड्या; धक्कादायक कारण

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

तिखट खाल्ल्यानंतर खोकला लागून तरुणीच्या छातीत तीव्र वेदना झाल्या. मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक सत्य समोर आलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

बीजिंग, 07 डिसेंबर : हिवाळ्यात सर्दी-खोकला सामान्य आहे. काही वेळा तिखट जास्त खाल्लं किंवा खाताना आपल्याला ठसका लागतो आणि खोकला येतो. खोकला जास्त असेल तर छातीतही थोडं दुखतं. एका तरुणीसोबत असंच घडलं. पण तिला इतका त्रास झाला की त्यानंतर तिने डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यानंतर मेडिकल रिपोर्टमध्ये जे दिसलं ते पाहून तिला धक्काच बसला. चीनच्या शांघाईतील ही घटना चर्चेत आली आहे.

हुआंग नावाची ही महिला. तरुणीने सांगितलं की, ती खूप तिखट पदार्थ खात होती, तेव्हा तिला अचानक खोकला आला. काही वेळाने खोकला थांबला पण तिच्या छातीत वेदना होऊ लागल्या. खोकला आल्यानंतर तशा सामान्यपणे वेदना होतात हे तिला माहिती होत पण तिला ज्या वेदना होत होत्या त्या सहन करणं अशक्यच होतं. श्वास घेताना आणि बोलतानाही तिला त्रास येत होता. त्यामुळे तिने डॉक्टरांकडे धाव घेतली. हुआंगच्या एका रुग्णालयात ती गेली. तिथं तिच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. एक्स-रे रिपोर्ट धक्कादायक होता. तिच्या बरगड्या तुटल्या.

हे वाचा - बापरे! यांना झालंय काय? हा व्हायरसचा परिणाम की आणखी काही? VIDEO पाहून तुम्हीही हादराल

ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार डॉक्टर म्हणाले तिचं वजन खूप कमी होतं. छातीवर मांसही कमी होतं. शरीरातील हाडांना सुरक्षित ठेवण्यासाठी जितकं मांस गरजेचं असतं तितकं मांस तिच्या शरीरात नाही. खूप सडपातळ असल्याने तिच्या छातीतील सापळा बाहेरूनच दिसत होता.  त्यामुळे जेव्हा ती खोकली तेव्हा खोकल्याचा दबाव तिचा छातीच्या बरगड्या पेलू शकले नाही आणि त्या तुटल्या.

तरुणीने सांगितलं की तिची उंची 5 फूट 6 इंच आहे. वजन फक्त 57 किलो आहे. तिने वजन वाढवण्याचा प्रयत्न केला पण ते कधीच शक्य झालं नाही. आता डॉक्टरांनी तिला कमीत कमी एक महिना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle