नवी दिल्ली, 25 एप्रिल: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave of Corona) विळखा बसलेला असताना आपण स्वत:ची आणि आपल्या कुटूंबाची काळजी घ्यायला हवी. कोरोनापासून बचावासाठी स्वच्छता,सॅनिटायझेशन,मास्क,सोशल डिस्टन्सिंग हे चार नियम पाळणे आवश्यक आहे. त्याबरोबर रोगप्रतिकार शक्ती चांगली असणंही आवश्यक आहे. त्यासाठी खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी (Good Habits) लाऊन घ्या. खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी म्हणजेच आपली इम्युन सिस्टीम (Immune System) कमजोर करणाऱ्या सवयी सोडून हेल्दी आहार घ्यावा. कायकाय खाणे बंद करावे ? जाणून घेऊयात.
चहा-कॉफीचे अतिरिक्त सेवन
अनेकांना चहा-कॉफी जास्त पिण्याची सवय असते. चहा-कॉपी घेतल्याशिवाय राहूच शकत नाही असे काही जण असतात. चहा-कॉफीचं अतिरेकी सेवन इम्युन सिस्टीम (immunity System) कमजोर करते. त्यामुळे अँसिडीटी आणि निद्रानाशीची समस्याही होते. परिमाणी रोगप्रतिकार शक्ती कमी होते. स्वत:ला कोरोना संक्रमणापासून वाचवण्यासाठी जास्त चहा-कॉफीचं घेणं बंद करा.
(इम्युनिटी वाढवेल आणि व्हायरल इन्फेक्शनपासून ठेवेल दूर; आरोग्यासाठी उत्तम असा चहा)
हिरव्या भाज्या भरपूर खा
हिरव्या भाज्या खायला आवडत नसेल तरी आजपासून हिरव्या भाज्या खायला सुरुवात करा. हिरव्या भाज्या खाल्याने इम्युनिटी सिस्टीम चांगली होते. हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन ए आणि फॉलिक अँसिड असतं. त्यामुळे इम्युनटी सिस्टीम चांगील बनते. त्यामुळे आपल्या जेवणात हिरव्या भाज्यांचा समावेश जरुर करा.
मीठाचं सेवन कमी करा
काही लोकांना जेवणात जास्त मीठ आवडतं. ताटात मीठ घेऊन जेवणात टाकण्याचीही काहीजणांना सवय असते. ही सवय तुम्हालाही असेल तर बदला. मीठ जास्त खाणाऱ्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास होतो. वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (World Health organization) मते एका दिवसात केवळ 5 ग्रॅमच शरीरात जायला हवं. जर यापेक्षा जास्त मीठ खात असाल तर, तुमचे इम्युन सेल्स कमजोर होतात. त्यामुळे शरीरात बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनची भिती वाढते.
(ड्रोनने होणार COVID-19 वॅक्सिनची डिलीव्हरी; असा आहे सरकारचा प्लॅन)
गोड पदार्थांना करा बायबाय
मीठाप्रमाणे जास्त गोड खाणेही चांगले नाही. साखरेचा अतिरेकी वापर शरीरासाठी घातक आहे. शरीरातली अतिरिक्त साखर विषाणूशी लढण्याची क्षमता कमी करते. डायबेटीज होण्याचा धोकाही वाढतो. डायबेटीज असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा धोका जास्त असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Health Tips, Tips