मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Diabetic : ही फळं हेल्दी असली तरी मधुमेह असणाऱ्यांनी खाऊ नयेत; वाढते ब्लड शुगर

Diabetic : ही फळं हेल्दी असली तरी मधुमेह असणाऱ्यांनी खाऊ नयेत; वाढते ब्लड शुगर

काही फळे मधुमेह असणाऱ्यांनी खायची नसतात, त्यांना फळांचा देखील त्रास होऊ शकतो. अशी कोणती फळे आहेत, जी मधुमेहाच्या रुग्णांनी खाल्ल्यास नुकसान होऊ शकते, त्याविषयी आज आपण जाणून (Harmful Fruits for Diabetic) घेऊया.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 16 ऑगस्ट : फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. फळांच्या सेवनाने शरीरातील अनेक खनिजे, फायबर, जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण होते. फळे खाल्ल्याने आपली पचनक्रियाही मजबूत राहते. निरोगी आहारासाठी, फळे देखील पुरेशा प्रमाणात खाणे आवश्यक आहे. मात्र, काही फळे मधुमेह असणाऱ्यांनी खायची नसतात, त्यांना फळांचा देखील त्रास होऊ शकतो. अशी कोणती फळे आहेत, जी मधुमेहाच्या रुग्णांनी खाल्ल्यास नुकसान होऊ शकते, त्याविषयी आज आपण जाणून (Harmful Fruits for Diabetic) घेऊया. मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती फळे खाणे टाळावीत - MedicalNewsToday च्या माहितीनुसार ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स 70 ते 100 च्या दरम्यान असतो, त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते, जसे की टरबूज, केळी, पण शुगर असलेले लोकदेखील ही फळे खाऊ शकतात. मात्र, त्यांचे जास्त प्रमाणात सेवन करणे हानिकारक ठरू शकते. कोणते फळ खाता, तुम्ही किती प्रमाणात फळ खात आहात हे जास्त महत्त्वाचे आहे. अननस - TasteOfHome च्या माहितीनुसार, अननसात साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मधुमेही रुग्णांना अननसाचा ज्युस पिण्यास मनाई आहे. एक कप अननसाच्या रसामध्ये 14 ग्रॅम साखर असते, त्यामुळे ते टाळले पाहिजे. फार थोड्या प्रमाणात अननस खाऊ शकता, ज्युस नकोच. आंबा टाळा - साखरेच्या रुग्णांना गोड पदार्थ खाण्यास मनाई आहे किंवा खाणे टाळण्यास सांगितले जाते. मधुमेहाच्या रुग्णाने आंब्याचे सेवन करू नये, कारण एक कप आंब्यामध्ये सुमारे 23 ग्रॅम साखर असते, त्यामुळे हे फळ मधुमेहींसाठी त्रासदायक ठरू शकते. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर चेरी नकोत - चेरी खायला अनेकांना आवडतात, म्हणून ती आईस्क्रीम आणि केकमध्ये जास्त वापरली जातात. पण, अनेकांना माहीत नाही की, एक कप चेरीमध्ये सुमारे 20 ग्रॅम साखर असते. त्यामुळे साखर असलेल्या रुग्णांनी-मधुमेही रुग्णांनी चेरी खाणे टाळावे. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या