मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Fruit Seeds : रोगमुक्त राहण्यासाठी फळं आवश्यक पण, फळांच्या बिया ठरू शकतात विषारी

Fruit Seeds : रोगमुक्त राहण्यासाठी फळं आवश्यक पण, फळांच्या बिया ठरू शकतात विषारी

निरोगी जीवनासाठी संतुलित आहार फार महत्त्वाचा आहे. (Fruit Seeds) त्याचवेळी आहारात फळांचा समावेश करणंही तितकचं गरजेचं असतं.

निरोगी जीवनासाठी संतुलित आहार फार महत्त्वाचा आहे. (Fruit Seeds) त्याचवेळी आहारात फळांचा समावेश करणंही तितकचं गरजेचं असतं.

निरोगी जीवनासाठी संतुलित आहार फार महत्त्वाचा आहे. (Fruit Seeds) त्याचवेळी आहारात फळांचा समावेश करणंही तितकचं गरजेचं असतं.

मुंबई, 10 ऑगस्ट : निरोगी जीवनासाठी संतुलित आहार फार महत्त्वाचा आहे. (Fruit Seeds) त्याचवेळी आहारात फळांचा समावेश करणंही तितकचं गरजेचं असतं. फळांमधून शरीराला आवश्यक असणारी सर्व प्रकारची जीवनसत्त्वं, क्षार, प्रथिनं, खनिजं, आम्लं इत्यादी घटक मिळण्यास मदत होते. फळं पौष्टिक आहाराला पूरक असतात. त्यामुळे दररोज कुठलं ना कुठलं फळ खायलाच हवं, असा सल्ला आहारतज्ज्ञ, डॉक्टर नेहमी देत असतात. परंतु, काही फळांच्या बिया खाण्यात आल्या तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. ‘टीव्ही 9 हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

फळांमध्ये पोषक घटक (Nutrients) मोठ्या प्रमाणात असतात. परंतु, फळांचं सेवन योग्य पद्धतीने झालं नाही तर त्याच नुकसान होऊ शकतं. काही फळांच्या बिया चुकीनेही गिळण्यात आल्या तर ते शरीरासाठी विषारी ठरू शकतं.

हे ही वाचा : वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये आहे मोठा फरक; तुम्ही या चुका तर करत नाही ना?

बोराच्या बिया

बोर हे फळ आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. परंतु, बोराची बी गिळली किंवा खाल्ली तर अडचणींचा सामना करावा लागतो. बोराची बी पोटात गेल्यास ती एखाद्या विषाप्रमाणे काम करते.

आलुबुखार

आलुबुखार हे फळ पोट आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. आलुबुखारची बी कठीण आणि मोठी असते. अनेकदा आलुबुखार खात असताना चुकून त्याचं बी गिळलं जाऊ शकतं. मोठी व्यक्ती किंवा लहान मुलांकडून अशी चूक झाली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

सफरचंद, चेरीच्या बियांमुळे बिघडू शकतं पोट

आरोग्यदायी राहण्यासाठी दररोज एका सफरचंदाचं सेवन करायला हवं, असा सल्ला डॉक्टर व आहारतज्ज्ञ देतात. सफरचंदामुळे आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी होतं. परंतु, सफरचंदाच्या बियाही विषाचं काम करतात, असं मानलं जातं. या बियांमध्ये सायनाइड नावाचं विष अगदी सूक्ष्म प्रमाणात आढळतं. यामुळे पोटांचे विकार होण्याची शक्यता असते.

चेरीचं फळ अनेकजण आवडीने खातात. प्रकृतीसाठी चेरीचं फळ चांगलं असतं. परंतु, चेरीच्या बिया विषाची भूमिका बजावत असतात. अनेकजण चुकून चेरीच्या बिया गिळतात. त्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा : Ghee For Hair: साजूक तुपाचा वापर केल्यास केसांशी संबंधित 'या' समस्या होतील दूर

भारतात विविध प्रकारची फळं आढळतात. प्रत्येक ऋतुनुसार येणाऱ्या फळांचं सेवन करायला हवं असं नेहमी आहारतज्ज्ञांकडून सांगितलं जातं. शरीराला आवश्यक असणारे कार्बोहायड्रेट, प्रथिनं, लोह, अँटिऑक्सिडंट, फायबर आदी पोषक घटक याद्वारे मिळू शकतात. तर जीवनसत्त्व ए, बी कॉम्प्लेक्स, सी, ई, के, डी सर्व जीवनसत्त्व फळांमध्ये आढळतात. त्यामुळे त्यांचं नियमित सेवन करायला हवं. परंतु, फळांचं सेवन करताना त्यांच्या बिया खाल्ल्या जाऊ नयेत याची काळजी घ्यायला हवी.

First published:

Tags: Fruit, Health, Health Tips

पुढील बातम्या