Home /News /heatlh /

रोगप्रतिकारक प्रणाली कमजोर बनवणारा आहार; चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

रोगप्रतिकारक प्रणाली कमजोर बनवणारा आहार; चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

एखाद्या व्यक्तीने दररोज कमी प्रमाणात काळं मीठ खाल्ल तर, रक्तदाब कमी केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर,ब्‍लड ग्‍लूकोज फॉल झाला असेल तर, काळे मीठ थोड्या प्रमाणात उपयोगी पडतं.

एखाद्या व्यक्तीने दररोज कमी प्रमाणात काळं मीठ खाल्ल तर, रक्तदाब कमी केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर,ब्‍लड ग्‍लूकोज फॉल झाला असेल तर, काळे मीठ थोड्या प्रमाणात उपयोगी पडतं.

रोगप्रतिकारक प्रणाली मजबूत ठेवण्यासाठी आहारही तितकाच महत्त्वाच असतो. पण काही विशिष्ट आहार याच इम्युन सिस्टमला (Immune system) हानीही पोहोचवतो.

मुंबई, 26 फेब्रुवारी : आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही असं आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराची सक्रमित जीवाणू, विषाणू, परजीवी आणि इतर हानीकारक सुक्ष्मजीवांपासून संरक्षण करते. जर आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली नसेल तर आपल्याला कोणत्याही रोगाची लागण होऊ शकते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. एका नवीन अभ्यासातून असं सांगण्यात आलं आहे की, एक विशिष्ट प्रकारचा आहार आपल्या रोगप्रतिकार प्रणालीला (immune system) नुकसान पोहचवण्याचं काम करतो. फ्रुक्टोज डाएटचं जास्त प्रमाण आपल्या रोगप्रतिकार प्रणालीला योग्य प्रकारे कार्य करण्यास प्रतिबंध करते.' युकेच्या स्वान्सी युनिव्हर्सिटीच्या (Swansea University) संशोधकांनी युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल आणि फ्रान्सिस क्रिक इंस्टिट्यूटच्या संशोधकांसोबत एकत्र हा अभ्यास केला आहे. हा अभ्यास नेचर कम्युनिकेशन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. फ्रुक्टोज साधारणत: गोड पेय, मिठाई आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये आढळतो. फूड प्रोडक्शनमध्ये त्याचा जास्त वापर केला जातो. हे लठ्ठपणा टाइप-2 डायबिटीज आणि नॉन अल्कोहलिक फॅटी लिव्हरशी संबंधित आहे. गेल्या काही वर्षांमध्ये फ्रक्टोज डाएट घेणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. फ्रक्टोजबाबत लोकांना खूपच कमी माहिती असते. हे वाचा - फक्त उशिरा नाही तर लवकरची झोपही घातक; गंभीर आजाराला देते आमंत्रण नव्या अभ्यासातून हे समजलं की, फ्रक्टोजमुळे रोगप्रतिकार प्रणालीत सूज येते. सूज आल्यामुळे रोगप्रतिकार प्रणालीच्या पेशी आणि ऊती खराब होऊ लागतात. त्यामुळे त्या आपल्या शरीरातील अवयव आणि शरीराच्या प्रणालीला सपोर्ट करु शकत नाही. रोगप्रतिकार प्रणाली योग्यप्रकारे कार्य करु न शकल्यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारच्या आजाराशी लढायला खूप अडचणी येतात. या अभ्यासामध्ये डायबिटीज आणि लठ्ठपणाला फ्रक्टोज डाएटशी जोडून समजून घेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. स्वान्सी युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉक्टर निक जोनस यांनी सांगितलं की, 'डाएटच्या अनेक घटकांवर संशोधन केल्यामुळे आम्हाला हे समजण्यास मदत झाली की कोणत्या कारणामुळे सूज आणि आजार वाढू शकतो. तसंच त्याला कशाप्रकारे बरं केलं जाऊ शकतं.' या अभ्यासात सहभागी झालेल्या आणखी एक डॉक्टर एम्मा विंसेंट म्हणाले की, 'आमचा अभ्यास यासाठी महत्वाचा आहे कारण त्यातून हे समजण्यास मदत होते की काही विशिष्ट आहार घेतल्यामुळे लोकं आजारी का पडतात.' हे वाचा -  कोरोनाविरोधातील लढ्यात चष्माही ठरतोय मोठं शस्त्रं; नेमकं कसं ते वाचा प्रक्रिया केलेले अन्न आणि गोड पदार्थांव्यतिरिक्त फ्रक्टोज नैसर्गिकरित्या सफरचंद, सफरचंदाचा ज्यूस, सुखे अंजीर, मध, गूळ, आलूबुखार, शतावरी आणि कांद्यामध्ये आढळतो. पण मर्यादित प्रमाणात नैसर्गिक फ्रक्टोज शरीराला नुकसान पोहचवत नाही.
Published by:Aiman Desai
First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Mumbai, Research, Swansea university, Wellness

पुढील बातम्या