मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

रात्रीचे जेवण आणि शांत झोपेचा आहे असा संबंध; चांगल्या झोपेसाठी या गोष्टी गुणकारी

रात्रीचे जेवण आणि शांत झोपेचा आहे असा संबंध; चांगल्या झोपेसाठी या गोष्टी गुणकारी

रात्रीची झोप आणि आहार यांच्यातील संबंध महत्त्वाचे आहेत. पण, असे काही पदार्थ आहेत, जे तुम्हाला चांगल्या झोपेसाठी मदत करू शकतात. चांगल्या झोपेसाठी (Food For Good Night Sleep) रात्रीच्या जेवणात काय खावं याची माहिती घेऊया.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : रात्रीचे जागरण हे आजच्या जीवनशैलीचा एक भाग बनले आहे. मात्र, तुम्हाला इच्छा असतानाही रात्री पडल्यानंतर अंथरुणावर झोपू शकत (Night sleep) नसाल तर ही समस्या असू शकते. बऱ्याच लोकांची तक्रार असते की, ते वेळेवर झोपायला जातात, पण रात्रभर कुस बदलत राहतात आणि झोप काही येत नाही. ही समस्या तुमच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांचे प्रमुख कारण बनू शकते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार रात्री कमीत कमी 6 ते 8 तासांची झोप खूप महत्वाची आहे.

स्लीप फाउंडेशनच्या मते, रात्रीची झोप आणि आहार यांच्यातील संबंध महत्त्वाचे आहेत. पण, असे काही पदार्थ आहेत, जे तुम्हाला चांगल्या झोपेसाठी मदत करू शकतात. चांगल्या झोपेसाठी (Food For Good Night Sleep) रात्रीच्या जेवणात काय खावं याची माहिती घेऊया.

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी खा

किवी

स्लीप फाउंडेशनच्या मते, संशोधनात असे आढळून आले आहे की जर तुम्ही झोपेच्या 2 तास आधी किवी हे फळ खाल्ले तर तुम्हाला चांगली झोप लागू शकते. त्याचे सेवन केल्याने आपण पटकन झोपी जावू शकतो आणि चांगली शांत झोप घ्याल.

गरम दूध -

दुधात भरपूर मेलाटोनिन असते जे झोपेचे संप्रेरक चांगले ठेवण्यास मदत करते. जर तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही झोपेच्या आधी एक ग्लास कोमट दुधाचे सेवन करू शकता. हे आपल्याला चांगल्या झोपण्यास मदत करेल.

हे वाचा - Navratri 2021: नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत घ्या ‘या’ गोष्टींची काळजी; वाचा काय करावं आणि काय करू नये

ड्राय फ्रुट -

ड्राय फ्रुटसमध्येही मेलाटोनिन घटक असतो. याशिवाय, त्यात असलेले मॅग्नेशियम, झिंक देखील आपल्याला चांगल्या झोपेसाठी मदत करतात.

चरबीयुक्त मासे

संशोधनात असे आढळून आले आहे की, जर तुम्ही रात्रीच्या जेवणात फॅटी फिश खाल्ले तर तुम्हाला चांगली झोप मिळू शकते. असे दिसून आले की जर आपण आठवड्यातून तीन दिवस सॅल्मन मासे खाल्ले तर आपल्याला चांगली झोप लागू शकते.

भात

जपानमधील एका संशोधनात असे आढळून आले आहे की, रात्रीच्या आहारात तुम्ही रोटी, ब्रेड इत्यादीसोबतच भात खाण्याची सवय ठेवावी. भात खाण्यानं रात्री चांगली झोप लागू शकते.

हे वाचा - Alert! 5 दिवसांनी बदलणार तुमच्या जीवनावर परिणाम करणारे 5 नियम, चेकबुक-ऑटो डेबिटसह यामध्ये होणार बदल

चांगल्या झोपेसाठी हे टाळा

रात्री झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफीचे सेवन टाळा.

झोपेच्या 2 ते 4 तास आधी जेवण करा.

अल्कोहोलचे सेवन टाळा.

चांगल्या झोपेसाठी आंघोळ करणे उत्तम.

First published:

Tags: Sleep, Sleep benefits