मुंबई, 1 नोव्हेंबर : बहुतेक लोकांना हिवाळा ऋतू खूप आवडतो. पण या ऋतूत अनेक आजारही होत असतात. थंडीच्या वातावरणात सूक्ष्मजीवाणूंच्या संसर्गामुळं (बॅक्टेरियल इन्फेक्शन - bacterial infection) खोकला, पडसं, सर्दी, ताप (Common cold, fever, cough) यांसारख्या समस्या अधिक दिसतात. थंडीच्या मोसमात रोगप्रतिकारशक्ती (immunity) कमी झाल्यास आपलं शरीर या आजारांशी लढण्यास सक्षम राहत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच 7 नैसर्गिक वस्तूंबद्दल सांगत आहोत, ज्या हिवाळ्यात अशा आजारांपासून आपला बचाव करू शकतात.
आलं - आल्यामध्ये दाहविरोधी (anti-inflammatory) गुणधर्म असतात. शिवाय, आलं त्याच्या प्रतिजैविक (antimicrobial) आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्मांसाठी देखील ओळखले जाते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स (antioxidants) ताप किंवा फ्लूदरम्यान होणाऱ्या मळमळण्याच्या समस्येपासून आराम देतात. व्हायरल इन्फेक्शन (viral infection) टाळण्यासाठी तुम्ही आल्यासह काही मसाले पाण्यात गरम करून त्याच्या काढ्याचं सेवन करू शकता.
मध- मधामध्ये (Honey) आढळणाऱ्या अँटीबॅक्टेरियल (antibacterial) आणि अँटीमायक्रोबियल कंपाऊंडमुळे हिवाळ्यात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मध केवळ आपल्यातील शरीरातील ओलावा धरून ठेवत नाही तर, रोगप्रतिकारक शक्ती देतो. यामध्ये असलेले संसर्गविरोधी घटक आपल्याला खोकला आणि घसादुखीपासून आराम देतात. पाण्यात मध आणि लिंबू मिसळूनही याचं सेवन करता येतं.
लसूण- लसूण भाजीची चव वाढवण्यासाठी महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. खोकला आणि सर्दीपासून बचाव करण्यासाठी कच्च्या लसणाचं सेवन फायदेशीर ठरतं. लसणामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि सल्फ्युरिक संयुगं असतात. याच्यामुळं संसर्गास कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियांपासून मुक्तता होण्यास मदत होते. लसणामुळं आपली रोगप्रतिकारक शक्तीही चांगली राहते.
चिकन सूप- चिकन सूप हा देखील हिवाळ्यात आरोग्यवर्धक आणि चविष्ट पर्याय आहे. ते पचायला सोपं तर आहेच. पण त्यामध्ये असलेले क्षार (मिनरल्स), जीवनसत्त्व (व्हिटॅमिन्स), प्रथिनं (प्रोटीन्स) आणि कॅलरीज आपल्या शरीराला खूप फायदे देतात.. चिकन सूप हे इलेक्ट्रोलाइट्स आणि द्रवपदार्थांचा एक चांगला स्रोतदेखील मानला जातो, ज्यामुळं ताप आणि छातीतील श्लेष्माच्या समस्येपासून आराम मिळतो.
हे वाचा - Post Office Scheme:दरमाह जमा करा 1500 रुपये, मिळवा 35 लाख; वाचा स्कीमबद्दल सर्वकाही
दही किंवा योगर्ट (Curd or Yogurt) - कॅल्शियम, जीवनसत्त्वं, खनिजं, प्रथिनं यांसह अनेक प्रकारचे प्रोबायोटिक (Probiotic) गुणधर्म दह्यामध्ये आणि योगर्टमध्ये आढळतात. या सर्व घटकांमुळं रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि सामान्य सर्दीचा धोका कमी होतो. मात्र, हिवाळ्यात ते अतिशय काळजीपूर्वक वापरावे. जर तुम्हाला श्लेष्माची (mucus) तक्रार असेल तर त्यापासून दूर राहणे चांगले.
हे वाचा - विदारक! पोलिसांच्या ताब्यात असताना विवाहितेचा मृत्यू, हुंडाबळीची करूण कहाणी
ओट्स- तुम्हाला माहीत आहे का, ओट्समध्ये पाण्यात विरघळणारे फायबर (Fiber) आढळते जे आपल्या हृदयाचे आरोग्य (heart) सुधारण्याचे काम करते. यामध्ये असलेले झिंक रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवते. आहारतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, यामध्ये असलेले फायबर आतड्यांमधील जळजळीच्या समस्येपासून आराम देते, जे पोटात मुरडा येणं (पेटके) आणि डायरियासारख्या समस्यांसाठी जबाबदार आहे.
केळी- केळ्यांमध्ये पाण्यात विरघळणारे फायबरदेखील असतं, जे आपली पचनक्रिया सुधारण्याचं काम करतं. त्यात थंडीशी लढणारे सर्व पोषक घटक आणि कॅलरीज असतात. मात्र, काही लोकांमध्ये एक गैरसमज आहे की, केळी खाल्ल्याने सर्दी वाढू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Winter session