मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Fever Benefits : ताप येणंही असतं चांगलं; आरोग्याला असा होतो फायदा

Fever Benefits : ताप येणंही असतं चांगलं; आरोग्याला असा होतो फायदा

ताप हा खरं तर आजार नाही. हे केवळ शरीर निरोगी नसल्याचे एक लक्षण आहे. ताप आल्यावर डॉक्टरांकडे जाणं योग्यच आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? सर्वच प्रकारचे ताप आपल्यासाठी हानिकारक नसतात.

ताप हा खरं तर आजार नाही. हे केवळ शरीर निरोगी नसल्याचे एक लक्षण आहे. ताप आल्यावर डॉक्टरांकडे जाणं योग्यच आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? सर्वच प्रकारचे ताप आपल्यासाठी हानिकारक नसतात.

ताप हा खरं तर आजार नाही. हे केवळ शरीर निरोगी नसल्याचे एक लक्षण आहे. ताप आल्यावर डॉक्टरांकडे जाणं योग्यच आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? सर्वच प्रकारचे ताप आपल्यासाठी हानिकारक नसतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 28 सप्टेंबर : कोरोनानंतर आता ताप म्हटलं की सर्वजण घाबरतातच. ताप आला की लगेच डॉक्टरांकडे जा. या ना त्या तपासण्या करा आणि काळजीने लोक परेशान होतात ते वेगळं. ताप हा खरं तर आजार नाही. हे केवळ शरीर निरोगी नसल्याचे एक लक्षण आहे. ताप आल्यावर डॉक्टरांकडे जाणं योग्यच आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? सर्वच प्रकारचे ताप आपल्यासाठी हानिकारक नसतात.

होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. सर्वच प्रकारचे ताप आपल्यासाठी हानिकारक नसतात. उलट काही ताप आपल्यासाठी चांगलेही असतात. आज आपण तापाचे आपल्याला किती आणि कसे फायदे होतात. याबद्दल माहिती घेणार आहोत. डॉक्टर नागरेकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

सायनस इन्फेक्शनमुळे खूप त्रास होतोय? ‘हे’ 5 घरगुती उपाय करून पाहा

ताप कसा येतो?

आपल्या शरीरात एखादे बॅक्टरीयल किंवा व्हायरल इन्फेक्शन झाल्यास आपल्याला ताप येतो. अनेकदा काही आजारांचे लक्षण म्हणून आपल्याला ताप येतो. जेव्हा आपल्याला शरीरात एखादा व्हायरस किंवा बॅक्टरीया प्रवेश करतो आणि तो त्याचा प्रसार वाढवू लागतो.

तेव्हा त्या बॅक्टरीया किंवा व्हायरसला मारण्यासाठी आपल्या शरीरातील इम्युनिटी काम करते आणि त्यांच्याशी लढते. तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा तापाच्या स्वरूपात आपल्या शरीरातून बाहेर पडते.

तापाचे फायदे

- आपल्या शरीरात जेव्हा एखादा बॅक्टरीया प्रवेश करतो तेव्हा त्याला मारण्यासाठी शरीरातील सेल क्लोन तयार करतात. त्यानंतर हे क्लोन त्या बॅक्टरीयाला पूर्णपणे संपवतात. मात्र त्यानंतर हे क्लोन मेमरी सेलच्या स्वरूपात आपल्या शरीरात स्टोअर राहतात आणि नंतर पुन्हा त्याच बॅक्टरीया किंवा व्हायरसचा हल्ला झाल्यास या केलं त्याच्याशी लढण्यास तयार असतात. म्हणजेच ताप एकप्रकारे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.

- जेव्हा आपण शरीरास न पचणारे अन्न खातो. तेव्हा शरीर ते पचवण्यास असमर्थ होते म्हणजेच आपल्याला अपचन होते आणि त्यामुळे आपला जठराग्नी मंदावतो. त्यानंतर आपल्याला भूक लागणे कमी होते. आपल्या शरोरातील ही समस्या दूर करण्यासाठी नंतर आपल्या शरीरातील उष्णता कार्य करू लागते आणि त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान वाढते. यानंतर आपल्या शरीरातून हानिकारक पदार्थ मल, मूत्र किंवा घामावाटे बाहेर पडू लागतात.

रक्त अशुद्ध झाल्यास आरोग्यासोबत त्वचेवरही होतात वाईट परिणाम, हे पदार्थ रक्त ठेवतील शुद्ध

ताप आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो त्यामुळे लहान मुलांनाही ताप आपल्यास ती त्याच्या रोगप्रतिकारशक्ती वाढण्याची सुरुवात असते. त्यामुळे घाबरून जाऊ नये. मात्र हा ताप सात दिवसांपेक्षा जास्त काळ राहू नये. अशावेळी तावरीर डॉक्टरांशी संपर्क साधने योग्य असते.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle