कोरोनापाठोपाठ ‘Monkey Bee’ची दहशत, भारतातल्या माकडांनाही लागण झालीय का? संशोधन सुरू

कोरोनापाठोपाठ ‘Monkey Bee’ची दहशत, भारतातल्या माकडांनाही लागण झालीय का? संशोधन सुरू

चीनमध्ये ‘मंकी बी’ (Monkey bee) नावाच्या व्हायरसच्या प्रादुर्भावाने एका रुग्णाचा मृत्यू (Death) झाला आहे. त्यामुळे कोरोनापाठोपाठ आता या दुसऱ्या व्हायरसचे थैमान सुरू होणार की काय, अशी भीती सामान्यांना वाटू लागली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जुलै: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second wave of corona) जोर ओसरत असताना आता तिसऱ्या लाटेचा (Third wave) इशारा दिला जात आहे. अशा परिस्थितीत चीनमध्ये ‘मंकी बी’ (Monkey bee) नावाच्या व्हायरसच्या प्रादुर्भावाने एका रुग्णाचा मृत्यू (Death) झाला आहे. त्यामुळे कोरोनापाठोपाठ आता या दुसऱ्या व्हायरसचे थैमान सुरू होणार की काय, अशी भीती सामान्यांना वाटू लागली आहे.

भारतात अद्याप भीती नाही

भारतात आतापर्यंत माकडांमध्ये अशा प्रकारच्या विषाणू आढळल्याची किंवा ‘मंकी बी’ व्हायरसची एखाद्या रुग्णाला लागण झाल्याचं एकही उदाहरण नसल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलचे संचालक डॉ. सुजित कुमार सिंह यांनी दिली आहे. चीनमध्ये ‘मंकी बी’ व्हायरसमुळे एक मृत्यू झाला असला, तरी भारतात अद्याप अशी एकही केस आढळलेली नाही. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कोरोनामुळे अनेक रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. अशात कुठलाही नव्या व्हायरस मोठं नुकसान करण्याची शक्यता असते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संशोधन सुरू

भारतातील माकडांमध्ये कुठल्याही प्रकारच्या विषाणूचं अस्तित्व आहे की नाही,याचा कुठलाही ठोस पुरावा अद्याप उपलब्ध नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. जर तो नसेल, तर आता नव्या व्हायरसची अचानक लागण होण्याची शक्यता नाही. मात्र त्याबाबत नेमकं संशोधन झाल्याशिवाय काहीच ठोस सांगणं शक्य नसल्याचं ते म्हणाले.

हे वाचा -'राज निर्दोष आहे, ते पॉर्न नाही तर..' पतीच्या बचावासाठी शिल्पाचा चौकशीत असा दावा

माकडांची वाढती संख्या

भारतात माकडांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही माकडे मानवी वस्तीत शिरत असल्यामुळे माकड आणि माणसांचा प्रत्यक्ष संबंध वाढला आहे. माकडाने हल्ला करणे, चावे घेणे यासारख्या घटनांमध्ये वाढ होते आहे. त्यामुळे माकडांपासून होणाऱ्या आजारांचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यासाठी माकडांपासन दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Published by: desk news
First published: July 25, 2021, 4:47 PM IST
Tags: chinavirus

ताज्या बातम्या