मराठी बातम्या /बातम्या /heatlh /उपवास केल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढतंय? या 4 चुका चुकूनही करू नका

उपवास केल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढतंय? या 4 चुका चुकूनही करू नका

जर तुमचंही वजन उपवास केल्यामुळे कमी झालं नसेल तर जाणून घ्या उपवासादरम्यान कोणत्या गोष्टी चुकत आहेत. ज्यामुळे तुमचं वजन वाढत आहे.

जर तुमचंही वजन उपवास केल्यामुळे कमी झालं नसेल तर जाणून घ्या उपवासादरम्यान कोणत्या गोष्टी चुकत आहेत. ज्यामुळे तुमचं वजन वाढत आहे.

जर तुमचंही वजन उपवास केल्यामुळे कमी झालं नसेल तर जाणून घ्या उपवासादरम्यान कोणत्या गोष्टी चुकत आहेत. ज्यामुळे तुमचं वजन वाढत आहे.

    नवी दिल्ली, 1 मार्च : अनेक संस्कृतींमध्ये आणि धर्मांमध्ये उपवास (Fasting) करण्याची परंपरा आहे. असं मानलं जातं की, उपवास केल्याने शरीराचं आतून डिटॉक्सिफिकेशन होतं आणि शरीरात अनावश्यक जमा झालेले फॅट्स (Fat) कमी होतात. पण काही जणांनी उपवास करूनही त्यांचं वजन कमी होण्याऐवजी वाढल्याचं (Weight Gain) दिसून येतं. अशामुळे उपवास केल्याने वजन कमी होण्याच्या धारणेवरील विश्वास कमी होतो. खरं तर उपवासादरम्यान दिवसभर अनहेल्दी पदार्थांचं (Diet) सेवन केलं जातं. याचा परिणाम आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरतो. उपवासाच्या दिवशी अनेकजण बाहेर असल्यामुळे भूक लागल्यावर पॅकबंद स्नॅक्स किंवा तळलेले पदार्थ खाऊन पोट भरण्याची चूक करतात. जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं. जर तुमचंही वजन उपवास केल्यामुळे कमी झालं नसेल तर जाणून घ्या उपवासादरम्यान कोणत्या गोष्टी चुकत आहेत. ज्यामुळे तुमचं वजन वाढत आहे.

    उपवासावेळी करू नका ‘या’ चुका -

    गोडं खाणं टाळा

    काही जणांना उपवासामध्येही गोड पदार्थ खाणं आवडतं. गोड खाल्ल्याने त्यांना उर्जा मिळाल्यासारखं वाटतं. पण हे एक असं कारण आहे, ज्यामुळे उपवास करूनही तुमचं वजन वाढतं. उपवासादरम्यान तुम्ही जितकं साखरेचं सेवन कमी कराल तितकं तुमच्या वजनावर तुमचं नियंत्रण राहील.

    तळलेले पदार्थ खाणं

    उपवासादरम्यान तळलेले बटाट्याचे चिप्स खाणं अनेकांना आवडतं. पण यामुळे तुमचं वजन हमखास वाढतं. अशावेळी तुम्ही बटाटा उकडून आहारात सामील केल्यास ते चांगलं राहील. तुम्ही बिनातेलाचं नुसता भाजूनही बटाटा खाऊ शकता. बेक करून बटाट्यातील फॅट्स नष्ट होतात आणि तो अधिक रूचकर आणि आरोग्यदायी बनतो.

    हे वाचा - वजन कमी करण्यासाठी घरगुती हिंगाचं पाणी Best, जाणून घ्या त्याचे फायदे

    हेल्दी फॅटकडे दुर्लक्ष करणं

    उपवासाच्या काळात तुम्ही फॅटयुक्त डाएट घेतल्यास तुमचं वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्ही सुकामेवा, फ्लॅक्स सीड, सूर्यफुलाच्या बिया यासारख्या हेल्दी फॅटयुक्त पदार्थांचा डाएटमध्ये सामील करा. यामुळे तुमचं वजनही वाढणार नाही आणि तुम्ही निरोगी राहाल.

    सतत जेवणाचा विचार करणं

    जर तुम्ही वेळोवेळी फक्त खाण्याचा विचार करत राहिलात आणि काय खाऊ किंवा खाऊ नको याबाबत विचार केलात तर तुमचं क्रेव्हिंग वाढेल. अशावेळी तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होईल. त्यामुळे उपवास करण्याआधी त्या दिवशी नेमकं काय खाणं चांगलं आहे, हे ठरवून घ्या. आरोग्यदायी खाणं, फळं, सुकामेवा यांचा उपवासाच्या दिवशी आहारात समावेश केल्यास उत्तम राहील.

    हे वाचा - मांड्यांवरील चरबी घटण्यासाठी हे व्यायाम प्रकार आहेत गुणकारी; लगेच दिसेल परिणाम

    उपवासाच्या दिवशी तळलेले उपवासाचे पदार्थ किंवा चिप्स यासारख्या गोष्टी खाणं टाळा आणि आरोग्यदायी उपवास करा.

    First published:

    Tags: Health, Health Tips, Weight gain, Weight loss