मराठी बातम्या /बातम्या /heatlh /सर्वांसाठी खुले लसीकरण: गरज आणि पुढील मार्ग

सर्वांसाठी खुले लसीकरण: गरज आणि पुढील मार्ग

लसीकरण सुरु झालं आहे त्यामुळे आशादायी चित्र आहे. म्हणून निराश होऊ नका. सरकार देखील या प्रश्नाचं उत्तर शोधत आहे. त्यामुळे या काळात पॉझिटीव्ह विचार आपल्याला तारू शकतात.

लसीकरण सुरु झालं आहे त्यामुळे आशादायी चित्र आहे. म्हणून निराश होऊ नका. सरकार देखील या प्रश्नाचं उत्तर शोधत आहे. त्यामुळे या काळात पॉझिटीव्ह विचार आपल्याला तारू शकतात.

सर्व महत्त्वाच्या काळातील शोकांतिकांप्रमाणेच कोविड -19 ची ही महामारीसुद्धा तिच्यामुळे झालेल्या उलथापालथीवर मात करून सामूहिक हेतूचे नूतनीकरण करण्याचे आणि लक्ष्य समोर ठेऊन त्यासाठी कष्ट करण्याचे आवाहन करीत आहे.

  अनेक नवीन वापरकर्त्यांनी कोविन (CoWin) या नोंदणी वेबसाइटवर तुटवड्याची नोंद केल्याने लसीकरण मोहिमेच्या विस्ताराची गती कमी झाली. त्याचे निराकरण झाल्यानंतर, लसीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना नोंदणी करण्यास सांगितले गेले आणि त्यांच्या क्षेत्रीय पिनकोडमध्ये योग्य लसीकरण स्लॉट शोधण्याचे निर्देश देण्यात आले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 4 मेपर्यंत 18 ते 44 वयोगटातील सुमारे 600,000 लोकांना लस देण्यात आली. या वयोगटात झालेल्या लसीकरणाच्या संख्येमध्ये गुजरात आघाडीवर आहे. परंतु अद्यापही भारताच्या लसीकरण मोहिमेला मोठ्या प्रमाणात चालना देण्याची गरज आहे.

  पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे लक्ष्य समोर ठेऊन त्या दिशेने कृती करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि पंजाब यासारख्या राज्यातील अनेक संक्रमण होणारी संवेदनशील ठिकाणे लसी आणि संसाधनांसाठी ताटकळत आहेत आणि त्यांना विशेष मदतीची आवश्यकता आहे. कोविड-19 विरूद्ध शक्य तितक्या लवकर लसीकरण करण्यासाठी अशा ठिकाणी असलेल्या लोकांचे शिक्षण आणि सशक्तीकरण करणे आवश्यक आहे. नुकतीच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या भारतीय लस उत्पादकांनी अनुक्रमे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यांचे उत्पादन वाढवण्याचे काम हाती घेतले आहे, या दोन लसींचा सध्या वापर होतो आहे. याखेरीज रशियन बनावटीच्या स्पुटनिक व्हीलाही नुकतीच मंजुरी मिळाली आहे. आता फक्त गरज आहे ज्यांना सर्वाधिक गरज आहे त्यांच्यापर्यंत या लसीचे डोस पोहचवण्यासाठी योग्य वाहतूक आणि पुरवठा साखळीची.

  सर्व महत्त्वाच्या काळातील शोकांतिकांप्रमाणेच कोविड -19 ची ही महामारीसुद्धा तिच्यामुळे झालेल्या उलथापालथीवर मात करून सामूहिक हेतूचे नूतनीकरण करण्याचे आणि लक्ष्य समोर ठेऊन त्यासाठी कष्ट करण्याचे आवाहन करीत आहे. याच्या भयानक प्रसार आणि निर्दयी विध्वंसाच्या माध्यमातून हे अधिक स्पष्ट झाले आहे की, हा आजार आपण आपला ताण सामायिक न केल्यास त्याच्याखाली दबले जाण्याचा धोका तीव्रपणे जाणवून देतो.

  Network18 Sanjeevani – A Shot Of Life (नेटवर्क 18 संजीवनी – अ शॉट ऑफ लाईफ) या भारतातील कोविड-19 विरोधातील सर्वांत मोठ्या लसीकरण आणि जनजागृती मोहीम आणि फेडरल बँके(Federal Bank) च्या CSR उपक्रमाद्वारे आम्ही खारीचा वाटा उचलत आहोत. अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा आणि भारताच्या आरोग्य आणि प्रतिकारशक्तीसाठी आपले कर्तव्य पार पाडा.

  First published:
  top videos

   Tags: Sanjeevani