मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

अनेक वर्षांपूर्वी गिळलेलं CHEWING GUM अजूनही असेल पोटात? तज्ज्ञांनी दिलं उत्तर, वाचा सविस्तर

अनेक वर्षांपूर्वी गिळलेलं CHEWING GUM अजूनही असेल पोटात? तज्ज्ञांनी दिलं उत्तर, वाचा सविस्तर

च्युइंगम गिळलं तर (Experts clears things regarding effect of chewing gum on human body) वर्षानुवर्षं पोटात राहतं का, या प्रश्नाचं उत्तर तज्ज्ञांनी दिलं आहे.

च्युइंगम गिळलं तर (Experts clears things regarding effect of chewing gum on human body) वर्षानुवर्षं पोटात राहतं का, या प्रश्नाचं उत्तर तज्ज्ञांनी दिलं आहे.

च्युइंगम गिळलं तर (Experts clears things regarding effect of chewing gum on human body) वर्षानुवर्षं पोटात राहतं का, या प्रश्नाचं उत्तर तज्ज्ञांनी दिलं आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 26 ऑक्टोबर : च्युइंगम गिळलं तर (Experts clears things regarding effect of chewing gum on human body) वर्षानुवर्षं पोटात राहतं का, या प्रश्नाचं उत्तर तज्ज्ञांनी दिलं आहे. च्युइंगम हे इतर काही पदार्थांप्रमाणंच असतं आणि ते पोटात चिकटून राहण्याचा प्रश्नच येत नसल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. लहानपणी अनेकांना (Fear of chewing gum) च्युइंगमबाबत भिती घालण्यात येते. लहान मुलांनी च्युइंगम खाऊ नये आणि खाल्लं तरी गिळू नये, यासाठी त्यांचे पालक च्युइंगमबाबत अनेक खोट्या गोष्टी सांगतात. ज्याप्रमाणे जास्त (Misconceptions about things) पाणी प्यायल्यावर पोटात चिखल होईल किंवा कलिगडाचा बिया गिळल्या तर पोटात झाड उगवेल, अशी भिती मुलांना दाखवली जाते, त्याचप्रमाणे च्युइंगमबाबतही भिती दाखवली जाते.

च्युइंगमबाबत गैरसमज

लहानपणी मुलांना घातलेली भिती त्यांच्या मनात तशीच राहते आणि च्युइंगमबाबतचा गैरसमज मोठेपणीदेखील दूर होत नाही. त्यामुळे या गैरसमजातून पालकही मुलांना पुन्हा तशीच भिती घालतात आणि हा प्रकार सुरुच राहतो. मात्र च्युइंगम पोटात चिकटून वगैरे राहतं, हा शुद्ध गैरसमज असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले तज्ज्ञ

अमेरिकेतील फ्लोरिडात प्रॅक्टिस करणारे गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डेव्हिड मिलोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार च्युइंगम खाल्ल्यानंतर थेट छोट्या आतड्यात पोहोचतं आणि तिथून त्यातील नको असलेला भाग शरीराबाहेर टाकला जातो. अर्थात इतर पदार्थांच्या  तुलनेत च्युइंगम पचण्यासाठी थोडा अधिक वेळ लागतो.

सात दिवस चालते प्रक्रिया

च्युइंगम गिळलं, तर त्याचं पचन होऊन मलावाटे ते बाहेर पडण्याच्या पूर्ण प्रक्रियेला साधारण 7 दिवस लागतात. च्युइंगममधील स्वीटनर, फ्लेवरिंग, प्रिजव्हेटिव्ह आणि सॉफ्टनर यासारखे घटक सहजपणे पचवले जातात. तर यातील गमचा भाग असणारा सिंथेटिक पॉलिमर्सचा बेस शरीर पचवू शकत नाही. त्यामुळे छोट्या आतड्यावाटे तो पदार्थ थेट शरीराबाहेर फेकला जातो. अर्थात मका, शेंगदाणे यासारख्या पदार्थांनादेखील पचन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 7 दिवसांचा वेळ लागतो.

हे वाचा- शेळीचं दूध, पपईच्या पानाने बरा होतो डेंग्यू रुग्ण; काय सांगतात तज्ज्ञ पाहा

तर होऊ शकतो धोका

च्युइंगम पोटात गेल्यावर काहीही अपाय होत नसला तरी पोटात जाण्याच्या प्रक्रियेदरम्यान मात्र त्रास होऊ शकतो. च्युइंगम श्वासनलिकेत अडकणे, अन्ननलिकेत चिकटणे वगैरे प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही च्युइंगम प्रेमी असाल तरी ते गिळण्यापेक्षा चावून झाल्यानंतर फेकून देणेच अधिक योग्य असल्याचं सांगितलं जातं.

First published:

Tags: Fitness, Health