मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Baby planning करताय तर चुकूनही करू नका हे व्यायाम; Pregnancy मध्ये होईल अडचण

Baby planning करताय तर चुकूनही करू नका हे व्यायाम; Pregnancy मध्ये होईल अडचण

जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल, तर या काळात कोणत्याही प्रकारचे हार्ड कोर व्यायामप्रकार करू नका. यामुळं शरीरातील हार्मोन्सवर खूप प्रभाव पडतो.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : जीवनशैलीतील चुकीच्या सवयी, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि तणावामुळं हल्ली महिलांमध्ये प्रजनन क्षमतेशी (Fertility) संबंधित समस्या सामान्यपणे पाहायला मिळतात. यामुळे त्यांना गर्भधारणा (Pregnancy) करणं कठीण जातं. काही वेळा यासाठी काही व्यायाम (Exercise) करण्याचाही सल्ला दिला जातो. पण व्यायामाच्या बाबतीतही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. असे काही व्यायामप्रकार आहेत, ज्यांच्यामुळं गर्भधारणेची शक्यता कमी होऊ शकते.

हार्ड कोर व्यायाम

जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल, तर या काळात कोणत्याही प्रकारचे हार्ड कोर व्यायामप्रकार करू नका. यामुळं शरीरातील हार्मोन्सवर खूप प्रभाव पडतो. ज्यामुळं प्रजननक्षमतेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

काही प्रकारचे मासे खाणं टाळा

काही माशांमध्ये पाऱ्याचं (mercury) प्रमाण जास्त असतं. रक्तातील पाऱ्याचं जास्त प्रमाण प्रजननक्षमतेशी संबंधित समस्यांशी संबंधित असल्याचं दिसून आलं आहे. यासाठी गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना काही प्रकारचे मासे खाणं टाळा. याविषयी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. याशिवाय, आणखी एक कारण म्हणजे पारा एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ शरीरात राहू शकतो. तज्ज्ञांच्या मते, याचा परिणाम गर्भाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासावर होतो.

हे वाचा - Apple ला मागे टाकत Microsoft ठरली जगातील सर्वात श्रीमंत कंपनी, पाहा किती आहे मार्केट कॅप

ही चूक अजिबात करू नका

जर तुम्ही गरोदर होण्याआधी वजन कमी करण्याचा विचार करत असाल आणि यासाठी क्रॅश डाएट (Crash Diet) घेत असाल तर असे अजिबात करू नका. यावेळी जेवणाकडे विशेष लक्ष द्यावे आणि पौष्टिक आहार घ्या.

हे वाचा - T20 World Cup : भारताविरुद्ध विजय मिळवून देताना बाबरची आई व्हॅन्टिलेटरवर, वडिलांनी सांगितला हृदयद्रावक प्रसंग

फेरफटका मारणं

प्रजनन शक्ती वाढवण्यासाठी दररोज किमान अर्धा तास चालावं. याशिवाय, आपल्याला पोहण्याचादेखील फायदा होईल. पोहण्यामुळं स्नायू मजबूत होतात.

First published:

Tags: Pregnancy, Pregnant woman