मराठी बातम्या /बातम्या /heatlh /लघवी करताना तुम्हाला या अडचणी जाणवतात का? पुरुषांचे या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष नको

लघवी करताना तुम्हाला या अडचणी जाणवतात का? पुरुषांचे या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष नको

प्रोस्टेट कर्करोग (prostate cancer symptoms) हा धोकादायक आहे, कारण तो आतल्या-आत वर्षानुवर्षे वाढत राहतो आणि त्याची प्रारंभिक लक्षणे जाणवत नाहीत. या लेखात आम्ही तुम्हाला प्रोस्टेट कॅन्सरची काही लक्षणे सांगू, ज्याकडे पुरुषांनी कधीही दुर्लक्ष करू नये.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : पुरुषांना होणाऱ्या कर्करोगांपैकी प्रोस्टेट कर्करोग (prostate cancer) हा एक प्रकार आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीच्या मते, पुरुषांचे कर्करोगाने मृत्यू होण्याचे हे दुसरे प्रमुख कारण आहे. प्रोस्टेट कर्करोग (prostate cancer symptoms) हा धोकादायक आहे, कारण तो आतल्या-आत वर्षानुवर्षे वाढत राहतो आणि त्याची प्रारंभिक लक्षणे जाणवत नाहीत. या लेखात आम्ही तुम्हाला प्रोस्टेट कॅन्सरची काही लक्षणे सांगू, ज्याकडे पुरुषांनी कधीही दुर्लक्ष करू नये.

लघवीची वारंवारता

- क्लीव्हलँड क्लिनिक अक्रॉन जनरल्स मॅकडॉवेल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे ऑन्कोलॉजिस्ट डॉ. ओसी टुटू ओवुसू म्हणतात की लघवीची वारंवारता देखील प्रोस्टेट कर्करोगाचे लक्षण असू शकते. यामध्ये व्यक्तीला वारंवार लघवी होण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

लघवीचा दाब-

डॉ. ओवसूच्या मते, शरीराकडून लघवी करण्यासाठी आवश्यक दबाव किंवा उत्तेजना वाढते. त्यामुळे व्यक्तीला घाईघाईनं लघवीला जाणं आवश्यक बनते.

रात्री लघवी करणे-

प्रोस्टेट कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे रात्री वारंवार लघवीला येणे. रात्री लघवीला जाण्यासाठी गाढ झोपलेल्या व्यक्तीला अनेक वेळा त्रास होऊ शकतो.

हे वाचा - प्रत्येक भारतीयांकडे असणार युनिक हेल्थ आयडी, जाणून घ्या मोदी सरकारची काय आहे नवीन योजना

लघवी करताना अडचण-

या स्थितीत अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला लघवीचा दबाव जाणवतो, पण त्याला लघवी केल्यानंतर वेदना जाणवतात. बऱ्याच बाबतीत एखादी व्यक्ती सामान्यपणे लघवी करू शकत नाही आणि त्याला खूप प्रयत्न करावे लागतात.

लघवी करण्यासाठी जास्त वेळ-

एखाद्या व्यक्तीला शरीरातून मूत्र बाहेर काढण्यास जास्त वेळ लागू शकतो. डॉ ओवसु म्हणतात की, हळूहळू लघवीचे थेंब थेंब पडणे देखील धोकादायक आहे. प्रोस्टेटमधील बिघाडाचे हे प्रारंभिक लक्षण असू शकते.

हे वाचा - मुंबई पुन्हा हादरली! डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांकडून गँगरेप, 9 महिन्यांपासून सुरू होता अत्याचार

मूत्रात रक्त - लघवीतील रक्त हे प्रोस्टेट कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण आहे. हे इतर अनेक कारणांनी देखील होऊ शकते. लघवीमध्ये रक्त येताच आपण त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

कुल्हेच्या हाडांमध्ये वेदना - कूल्हेच्या हाडांमध्ये दुखणे हे प्रोस्टेट कर्करोगाच्या जोखमीचे लक्षण देखील असू शकते. त्याची वेदना हिप किंवा जवळच्या हाडांमध्ये पसरू शकते.

First published:
top videos

    Tags: Cancer, Health Tips