मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Winter Health : हिवाळ्यात सर्दीनं नाक गच्च झालंय? मग घरच्या-घरी करा हे सोपे 5 उपाय

Winter Health : हिवाळ्यात सर्दीनं नाक गच्च झालंय? मग घरच्या-घरी करा हे सोपे 5 उपाय

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

Home Remedies for Open Blocked Nose: हिवाळ्यात सर्दी (Common Cold) होणं ही खूप सामान्य बाब आहे. ही समस्या ऐकायला छोटी वाटते. पण खूप त्रास देते. विशेषत: जेव्हा नाक गच्च होतं (Nasal congestion). कारण त्यामुळं श्वास घेण्यास खूप त्रास होतो.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : हिवाळ्यात सर्दी (Common Cold) होणं ही खूप सामान्य बाब आहे. ही समस्या ऐकायला छोटी वाटते. पण खूप त्रास देते. विशेषत: जेव्हा नाक गच्च होतं (Nasal congestion). कारण त्यामुळं श्वास घेण्यास खूप त्रास होतो. यासोबतच चेहऱ्याच्या आजूबाजूच्या नसांनाही सूज येते. त्यामुळं खूप त्रासल्यासारखं होऊन जातं. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही इथं सांगितलेल्या घरगुती उपायांची मदत घेऊ (Home Remedies for Open Blocked Nose) शकता.

थंडीत तुम्ही कोमट पाणी पित असाल, तरी ती चांगली सवय आहे. कोमट पाण्यामुळं सर्दीमध्ये खूपसा आराम मिळतो. तसंच बंद झालेलं नाक मोकळं होण्यासही मदत मिळते. यामुळं शरीरात उष्णता निर्माण होते. तुम्हाला आवडत असल्यास कोमट पाण्यात आलं किंवा ग्रीन टी मिसळून पिणंही फायदेशीर ठरू शकतं. यामुळं नाक मोकळं मदत होईल. तसंच नाक आणि घशाच्या पडद्यावरील सूज कमी होईल.

वाफ

बंद नाकामुळं सायनसच्या रक्तवाहिन्यांना सूज येते. अशा वेळी तुम्ही वाफ घेऊ शकता. वाफ घेतल्यानं नाक मोकळं होणं सोपं होईल. यासोबतच घसा, नाक, फुप्फुसांमध्ये जमा झालेला श्लेष्माही बाहेर पडण्यास सुरुवात होईल. यामुळं तुम्हाला खूप आराम वाटेल. यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन गरम करा. त्यातून वाफ येऊ लागली की, हे भांडं गॅसवरून खाली घ्या, भांड्यापासून चेहरा थोडासा उंचीवर ठेवून वाफ घ्या. यादरम्यान आपलं डोकं, चेहरा आणि भांडं टॉवेलनं किंवा कापडानं झाकून ठेवा. तुम्हाला हवं असल्यास वाफ घेण्यासाठी तुम्ही व्हेपोरायझरचीही मदत घेऊ शकता.

सलाईन स्प्रे घ्या

सर्दीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही सलाईन स्प्रेची मदत घेऊ शकता. नाकपुड्या आणि श्वसनमार्ग साफ करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्ही ते बाजारातूनही विकत घेऊ शकता किंवा घरीही तयार करू शकता. खरं तर, बंद केलेलं नाक उघडण्यासाठी मिठाचं पाणी खूप चांगली भूमिका बजावतं. पण ते दिवसातून अनेक वेळा वापरावं लागतं.

हे वाचा - चाळीशी उलटूनही सुटेना मुलाची हौस, अपत्यप्राप्तीसाठी सुरूय तिसऱ्या लग्नाची तयारी

नाक शेकणं

थंडीच्या वेळी नाक बंद राहिल्यानं श्वास घेण्यास खूप त्रास होतो. तसंच, माणूस खूप त्रस्त होऊऩ जातो. यावर मात करण्यासाठी आपण कोमट पाण्यानं नाक शेकू शकता. यासाठी कोमट पाण्यात एक कपडा भिजवून काही सेकंदांसाठी नाकावर दाबून ठेवा. असं पुन्हा पुन्हा करा. यामुळं नाक उघडण्यास मदत होईलच, शिवाय नाकाच्या आजूबाजूच्या नसांना आराम मिळेल.

हे वाचा - जबरदस्त! वयाच्या 16 वर्षी सुरू केलं Saving; 21 येईपर्यंत खरेदी केलं स्वत:च घर

मसालेदार अन्न

सर्दीपासून आराम मिळण्यासाठी आणि नाक उघडण्यासाठी तुम्ही मसालेदार किंवा तिखट अन्नाचीही मदत घेऊ शकता. खरं तर, मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचा घटक असतो, जो त्याच्या उष्णता-उत्पादक प्रभावासाठी ओळखला जातो. याच्यामुळं नाकपुड्या आणि श्वसनमार्ग मोकळा होण्यास आणि सूज कमी होण्यास मदत होते. ज्यामुळं नाक बंद होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा हेतू आहे. मात्र, न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health Tips, Winter session