मराठी बातम्या /बातम्या /heatlh /स्वयंपाकाचा कंटाळा पण हेल्दी फूड हवंय; हे 5 पदार्थ फक्त उकडून खा, शरीराला होईल डबल फायदा

स्वयंपाकाचा कंटाळा पण हेल्दी फूड हवंय; हे 5 पदार्थ फक्त उकडून खा, शरीराला होईल डबल फायदा

वजन कमी करण्याआधी स्वतःचे जेवण स्वतः बनवायला शिका. कारण ज्याला जेवण बनवायची माहिती असते त्याला न्यूट्रिशनचं महत्व देखील कळतं.

वजन कमी करण्याआधी स्वतःचे जेवण स्वतः बनवायला शिका. कारण ज्याला जेवण बनवायची माहिती असते त्याला न्यूट्रिशनचं महत्व देखील कळतं.

हे पदार्थ शिजवल्यावर यातील तत्वांमध्ये काहीसा बदल झाल्याचं पाहायला मिळतं.

  मुंबई, 03 जून  : दैनंदिन आहारामध्ये लोक आवडत्या पदार्थांना प्राधान्य देतात. एखाद्या व्यक्तीला जो पदार्थ आवडतो, तो त्याचा आस्वाद घेतो. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, काही पदार्थ असे असतात की जे एका विशिष्ट पद्धतीने खाल्ल्यावरच त्याचा अधिक फायदा होतो. अशाच पद्धतीपैकी एक म्हणजे पदार्थ उकडून खाणे (Boiled Food). काही पदार्थ उकडून खाल्ल्याने त्याचा शरीराला दुप्पट फायदा होतो.

  काही पदार्थ उकडून खावेत कारण त्यात अन्य पदार्थांच्या तुलनेत अधिक पोषण मूल्ये असतात. हे पदार्थ शिजवल्यावर यातील तत्वांमध्ये काहीसा बदल झाल्याचं पाहायला मिळतं. जर अन्न योग्यरितीने आणि योग्य वेळेपर्यंतच शिजवले तर ते शरीरासाठी उपयुक्त ठरतं.

  उकडलेलं अन्न का असते पोषक?

  आपल्या खाण्यापिण्याच्या काही गोष्टींमध्ये पचनास जड असे घटक असतात. परंतु, जेव्हा आपण अन्नपदार्थ योग्य पद्धतीनं शिजवतो, तेव्हा अशा घटकांचे सहज पचन होते. शिजवलेले अन्न सेवन केल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. त्वचा तजेलदार होते, पित्त होत नाही, किडनीचं आरोग्य चांगलं राहतं, पचन विकारांपासून मुक्ती मिळते आणि केसांची वाढ चांगली होते. त्यामुळे आपण जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे उकडून खाल्ल्यास आरोग्यदायी ठरतात.

  हे वाचा - खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारी ही Chef स्वतः पदार्थ चाखूही शकत नाही कारण...

  मका - मका (Corn) यामध्ये अनेक पोषकघटक असतात. यात आरोग्यासाठी पूरक बी व्हिटॅमिन मुबलक असतं. तसंच यात कॉपर, आयर्न, मॅग्नेशियम आणि झिंक आदी खनिज तत्वे असतात. याच्या सेवनामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढून, रोगांपासून आपला बचाव होतो.

  ब्रोकोली - आजकाल लोक आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेताना दिसतात. यासाठी ते ब्रोकोली (Broccoli) सेवनाला प्राधान्य देतात. ब्रोकोलीत व्हिटॅमिन सी, के, आर्यन, पोटॅशिअमसारखे घटक असतात. तसंच ब्रोकोलीत प्रोटीनचे प्रमाण मुबलक असतं. ब्रोकोलीचं सूप बनवून देखील सेवन करता येतं.

  बटाटे - बटाटे (Potato) उकडून घेतल्यास त्यातील कॅलरीजचं प्रमाण कमी होतं. तसंच त्यातील फॅटसही कमी होतात. तुम्हाला आवडत असेल तर उकडलेल्या बटाट्यात टोमॅटो, कांदा आणि अन्य घटक घालून त्याचे सेवन करू शकतात.

  हे वाचा - चहाबरोबर हे 5 पदार्थ अजिबात नका खाऊ; होईल मोठं नुकसान

  कोलंबी - कोलंबी म्हणजे प्रॉन्स (prawns) हे एक परिपूर्ण सीफूड आहे. यातील पोषक तत्वांमुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. प्रॉन्स उकडून त्याचं सेवन तुम्ही सॅलड किंवा सूप सोबत करू शकता. प्रॉन्सचं सेवन आरोग्यसाठी चांगले असतं.

  अंडी - उकडलेल्या अंड्याचं (Eggs) पांढरं आवरण सेवन केल्यास त्यातून मुबलक प्रोटीन मिळतं. हे प्रोटीन ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. अंडी अधिक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी व्हावीत यासाठी त्यात एक चिमूट काळ्या मिरी पावडर टाकावी आणि त्याचं सेवन करावं.

  First published:

  Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle