आता बिनधास्त खा आवडीचे पदार्थ! मसाल्याचे 'हे' घरगुती पदार्थ Acidity करतील क्षणात दूर

आता बिनधास्त खा आवडीचे पदार्थ! मसाल्याचे 'हे' घरगुती पदार्थ Acidity करतील क्षणात दूर

आता बिनधास्त खा आवडीचे पदार्थ! मसाल्याचे 'हे' घरगुती पदार्थ Acidity करतील क्षणात दूर

  • Share this:

नवी दिल्ली, 08 सप्टेंबर : आपली खाद्यसंस्कृती (Food Culture) ही जगात सर्वश्रेष्ठ समजली जाते. अर्थात आपल्याकडील पदार्थ आणि त्यांच्या चवीतील वेगळेपण हे त्याचं प्रमुख कारण मानता येईल. त्यात प्रामुख्यानं आपल्याकडील मसालेदार पदार्थांच्या चवीनं जगाला भुरळ घातली आहे. आपल्याकडे मसालेदार (Spicy) आणि चविष्ट जेवण प्रत्येकालाच आवडतं. आपल्या स्वयंपाकात अशा अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. हे मसाले तयार करण्यासाठी विविध नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जातो. कधीतरी मसालेदार पदार्थ खाणं हे श्रेयस्कर असतं. कारण दररोज असे पदार्थ खाल्ल्यानं अॅसिडिटी (Acidity), करपट ढेकर, पोटफुगी आदी आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु, आपल्या स्वयंपाकघरात मसाल्याचे असे काही पदार्थ असतात, की ज्यांच्या वापरानं या आरोग्यविषयक समस्यांमधून अगदी कमी वेळेत सुटका होऊ शकते. या विषयीची माहिती `लाईव्ह हिंदुस्थान डॉट कॉम`नं दिली आहे. जाणून घेऊया आरोग्यपूरक मसाल्याचे पदार्थ आणि त्यांच्या वापराविषयीची माहिती सविस्तर...

करपट ढेकर आणि अॅसिडिटीचा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर घरातील, रोजच्या वापरातील मसाल्याचे काही पदार्थ यावर नक्की गुणकारी ठरू शकतात.

पोटफुगी, अॅसिडिटी आदी विकारांवर हिंग हा खूप गुणकारी मानला जातो. तसंच याच्या वापरानं अन्न पदार्थाचा स्वाद वाढतो. त्यामुळे दैनंदिन आहारात हिंगाचा समावेश करणं आवश्यक आहे. हिंगामध्ये अॅंटि- इंफ्लेमेटरी, कार्मोनेटिव्ह (Carminative) आणि पाचक गुणधर्म असतात. यामुळे अन्न पचनासाठी आवश्यक असलेले जठरातील रस स्रवतात. त्यामुळे घरगुती उपचारांमध्ये हिंग हा महत्त्वपूर्ण मानला जातो. एक चिमूट हिंगात सूंठ पावडर आणि काळं मीठ (Black Salt) मिसळावं. हे मिश्रण जेवणानंतर एक ग्लास पाण्यासोबत घ्यावं. तसंच एक ग्लास ताकात चिमूटभर हिंग मिक्स करून ते ताक प्यायल्यास अपचन, करपट ढेकर या समस्या दूर होतात.

दालचिनी ही नैसर्गिक पाचक म्हणून वापरली जाते. बिर्याणी किंवा करीचा स्वाद वाढवण्यासाठी प्रामुख्यानं दालचिनीचा वापर केला जातो. अपचनाचा (Indigestion) त्रास दूर करण्यासाठी ही फायदेशीर ठरते. अल्सरचा त्रास कमी करण्यासाठीही दालचिनीचा वापर केला जातो. यातील घटक हे पचनाला पूरक असल्यानं जेवण केल्यावर अॅसिडिटीचा त्रास होत नाही. पोटाचे विकार दूर करण्यासाठी दिवसातून दोनदा दालचिनी मिश्रित चहा घेणं श्रेयस्कर मानलं जातं. यासाठी एक कप पाण्यात चहा पावडर आणि ताज्या पुदिन्यासह दालचिनीचा एक तुकडा टाकावा आणि उकळून हा चहा घ्यावा.

जिरे पूड ही पदार्थाची चव आणि स्वाद वाढवण्यासाठी प्रामुख्यानं वापरली जाते. जिऱ्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असल्यानं अपचनाचा त्रास दूर होतो. अपचन आणि अॅसिडिटीचा त्रास दूर करण्यासाठी एक चमचा जिरे भाजून, थंड करून घ्यावेत आणि हे जिरे बारीक करावेत. ही पेस्ट मध किंवा पाण्यात मिसळून रिकाम्या पोटी घ्यावी. यामुळे पचनशक्ती सुधारते.

वेलदोडा हा नैसर्गिक माऊथ फ्रेशनर (Mouth Freshener) आहे. यातील तेलामुळे लाळ ग्रंथींचं कार्य सुधारतं. तोंडात पुरेशा प्रमाण लाळनिर्मिती होऊन अॅसिडीटीमुळं होणारी जळजळ कमी होते. तसेच भूक सुधारते. जेव्हा तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास जाणवेल त्यावेळी दोन वेलदोडे बारीक वाटून घ्या. ती पूड पाण्यात उकळा. हा रस थंड करून प्यायल्यास त्वरित आराम मिळतो.

अॅसिडीटमुळं पोटफुगीचा त्रास होत असेल तर तातडीनं आल्याचा (Ginger) वापर करावा. आल्यातील कार्मिनटिव्ह हा घटक आतड्यातील गॅस बाहेर टाकण्यास मदत करतो आणि पोटफुगीची समस्या दूर होते. यासाठी आल्याचे छोटे तुकडे करून त्यातील रस काढावा. हा चमचाभर रस प्यावा.

गॅस आणि अॅसिडिटीच्या घरगुती उपचारात ओवा हा सर्वात लोकप्रिय मानला जातो. पोटदुखी, पोट फुगणं, अॅसिडिटीसारख्या विकारात ओवा हा अधिक गुणकारी असतो. दोन जेवणात जास्त अंतर पडलं किंवा एखाद्या पार्टीत तुम्ही भरपेट जेवण केलं तर अशा वेळी ओवा खाणं श्रेयस्कर ठरतं. यातील थाइमोल (Thymol) हे तेल पोटातील गॅस बाहेर सोडतं आणि अॅसिडिटी कमी होते. असा त्रास झाल्यास एक चमचा ओवा घ्यावा तो पाण्यात टाकून पाणी चांगलं उकळावं. नंतर हे पाणी गाळून प्यावं.

भारतीय मसाल्याचे पदार्थ अशा पध्दतीनं पोटाच्या विकारांमध्ये गुणकारी ठरु शकतात.

First published: September 8, 2021, 8:58 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या