मराठी बातम्या /बातम्या /heatlh /तुम्ही मासे खात नाहीत? मग सावधान! तुमच्या आयुर्मानावर होऊ शकतो परिणाम

तुम्ही मासे खात नाहीत? मग सावधान! तुमच्या आयुर्मानावर होऊ शकतो परिणाम

पायाच्या दुखण्यात फिश ऑईल वापरणं योग्य आहे. म्हणून आपल्या आहारात सीफूडचा समावेश करावा. यामुळे सूज,वेदना कमी करण्यास मदत होते.

पायाच्या दुखण्यात फिश ऑईल वापरणं योग्य आहे. म्हणून आपल्या आहारात सीफूडचा समावेश करावा. यामुळे सूज,वेदना कमी करण्यास मदत होते.

मासे (Fish) हे ओमेगा -3 चा प्रमुख आणि चांगला स्त्रोत आहेत. त्यामुळे शरीराला ओमेगा-3 ची कमतरता जाणवू नये, यासाठी आहारात माश्यांचा समावेश करणं महत्वाचं आहे असं हे संशोधन सुचवतं.

  नवी दिल्ली, 20 जुलै : आपली खाद्य संस्कृती (Food Culture) ही आरोग्यपूरक आहे. आहारातील बहुतांश पदार्थ आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे असतात. त्यातून पुरेशी पोषणमूल्य आपल्या शरीराला मिळत असतात. काही लोक शाकाहारास (Veg) प्राधान्य देतात तर काही लोक मांसहाराला (Non veg). त्यात मिश्रहारी असणाऱ्या लोकांचे प्रमाणही लक्षणीय आहे. परंतु, जे लोक शाकाहारास प्राधान्य देतात किंवा मांसाहारामध्ये काही विशिष्ट पदार्थांचे सेवन करतात त्यांच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे. आहारात ओमेगा-3 (Omega -3) चा समावेश असलेले पदार्थ कमी प्रमाणात सेवन केल्यामुळे माणसाचं आर्युमान (Life Span) कमी होतं, असा दावा नुकताच एका संशोधनातून करण्यात आला आहे. मासे (Fish) हे ओमेगा -3 चा प्रमुख आणि चांगला स्त्रोत आहेत. त्यामुळे शरीराला ओमेगा-3 ची कमतरता जाणवू नये, यासाठी आहारात माश्यांचा समावेश करणं महत्वाचं आहे असं हे संशोधन सुचवतं.

  2018 मध्ये 2500 लोकांवर ओमेगा -3 च्या अनुषंगाने एक संशोधन करण्यात आले. ओमेगा -3 युक्त पदार्थांचे पुरेशा प्रमाणात सेवन करणाऱ्या लोकांमध्ये लवकर मृत्यूचे प्रमाण 33 टक्क्यांहून कमी असते, असे या संशोधनातून दिसून आले. महिलांवर करण्यात आलेल्या एका संशोधनात असेच निष्कर्ष दिसल्याचे आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

  जपानचा (Japan) ओमेगा-3 इंडेक्स (Index) 8 टक्क्यांहून अधिक असल्याने तेथील नागरिकांचे आर्युमान हे अमेरिकेतील नागरिकांच्या तुलनेत 5 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती कॅनडातील गुएल्फ विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनाचे प्रमुख संशोधक डॉ. मायकल मॅकबर्नी यांनी दिली. याबाबतचे संशोधन अमेरिकी जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झाले आहे.

  बापरे! या देशांमध्ये होतो एवढा पाऊस, भारत या यादीत TOP 10 मध्येही नाही

  यात फर्मिंघम हार्ट स्टडीतील आकडेवारीचा समावेश करण्यात आला आहे. हे जगभरातील आतापर्यंतचे सर्वात दीर्घ असे संशोधन मानले जाते. फॅटी अॅसिडसची तपासणी करुन मानक जोखीम घटकांप्रमाणेच मृत्यूचा अंदाज लावता येऊ शकतो असे या संशोधनात म्हटलं आहे. तसेच धुम्रपान करणाऱ्या माणसाचे आर्युमान हे अंदाजे चार वर्षांनी कमी होते, मात्र साल्मन आणि मॅकेरेल ऑयली माशांमधून मिळणाऱ्या फॅटी अॅसिडच्या (Fatty Acids) कमतरतेमुळे माणसाचं आर्युमान पाच वर्षांनी कमी होऊ शकतं. तज्ज्ञांच्या मते, साल्मन आणि मॅकेरेल माशांमध्ये मुबलक ओमेगा -3 असतं. ऑयस्टर्ससह अन्य सीफूडमधूनही ते मिळतं, सरडाईन्स नावाचा छोटासा मासाही ओमेगा-3चा मोठा स्त्रोत असतो, असं हे संशोधन सांगते. माश्यांचे तेल हे ह्दयाच्या आरोग्याकरिता चांगले असते. त्यामुळे ब्लड क्लॉटची समस्या उदभवत नाही. त्यामुळे याची इंडेक्स पातळी 4 पेक्षा कमी नसावी. आहारात 8 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात ओमेगा-3 चा समावेश असणं महत्वाचं आहे.

  या संशोधनात फॅटी अॅसिड बाबत दिलेली माहिती जितकी उपयुक्त आहे, तितकीच ती लिपीड पातळी, रक्तदाब, धुम्रपान, आणि मधुमेहामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूशी संबंधित आहे. ओमगा -3 च्या अनुषंगाने एक रिस्क फॅक्टर काय असू शकतो यासाठी या संशोधनाकडे पाहणे आवश्यक असल्याचे फॅटी असिड रिसर्च इन्स्टिट्युटचे प्राध्यापक आणि या संशोधनाचे सहलेखक डॉ. बिल हॅरिस यांनी सांगितले.

  आहार, तंबाखूचे व्यसन, मद्यपान आणि व्यायामाचा अभाव यात बदल करुन आर्युमानावर परिणाम करणारे धोके कमी करता येतात. यामुळे आरोग्य तर सुधारतेच परंतु, अकाली मृत्यूचा धोकाही कमी होतो. त्यामुळे ओमेगा -3 हा आपल्या आहारात महत्वाचा घटक ठरतो. केवियर (माशांची अंडी), सब्जाचे बी, जवस, सोयाबीन, अक्रोड यातही ओमेगा -3चे प्रमाण चांगले असते. त्यामुळे जे लोक मांस किंवा मासे खात नाहीत, त्यांनी आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.

  First published:

  Tags: Fish