नवी दिल्ली, 17 जून : व्यस्त जीवनशैली, धावपळ यामुळे लोक आपल्या आरोग्याकडे
(Helath) दुर्लक्ष करतात. ताण-तणाव यामुळे शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे उत्तम आणि निरोगी शरीरासाठी आपल्याला आहारात अनेक पौष्टिक गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे. अशातच ड्रायफ्रुट्स
(DryFruits benifits)म्हणजेच सुक्या मेव्यामध्ये शरीरासाठी भरपूर पोषक गोष्टी असतात. त्यामुळे तुम्ही ड्रायफ्रुट्सचं सेवन करणं गरजेचं आहे. ज्या लोकांना ताजी फळे खाण्याची कोणतीही समस्या आहे ते लोक ड्रायफ्रुट्स आणि नट्सचे सेवन करू शकतात. यातून त्यांना खूप फायदा होतो. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकता. यामुळे दिवसभर तुमच्या शरीरात उर्जा राहिल.
पिस्ता
जर तुम्हाला सकाळी उठल्यावर लगेच भूक लागली असेल तर पिस्ता हा एक उत्तम पर्याय आहे. पिस्ता तुमची सकाळची भूक कमी करून तुमचे पोट दिवसभर भरलेले ठेवते. जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केले तर तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. पिस्तामध्ये ओलेइक ऍसिड, अॅंटिऑक्सिडेंट, कॅरोटीन, व्हिटॅमिन ई, लोह असते. जे मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी करण्यास मदत करतात.
हे ही वाचा - Health Tips: दातांमधील पोकळी त्रास देतेय? मग करा 'हे' घरगुती उपाय
मनुका
अनेक लोक सकाळी उठून मनुका पाणी पितात. अशा परिस्थितीत तुम्ही रिकाम्या पोटी मनुका सुद्धा खाऊ शकता. त्यात लोह मुबलक प्रमाणात आढळते. त्यात प्रथिने आणि फायबरही चांगल्या प्रमाणात असते.
बदाम
बदाममध्ये अॅंटिऑक्सिडंट्स, फायबर, कॅल्शियम आणि प्रोटीन असतात. याचे सेवन केल्याने तुम्ही निरोगी राहता. म्हणूनच तुम्ही दररोज रिकाम्या पोटी बदाम खावे. यासाठी तुम्ही भिजवलेले बदामही खाऊ शकता. बदाम खाल्ल्याने तुमचा मेंदू तीक्ष्ण होतो.
दरम्यान, दिर्घायुष्य निरोगी राहण्यासाठी आणि चांगली जीवनशैली अवलंबवण्यासाठी आहारात पोष्टीक गोष्टींचा समावेश करा. त्यामुळे निरोगी आणि आनंदी जीवन जगता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.