मराठी बातम्या /बातम्या /heatlh /फक्त उशिरा नाही तर लवकरची झोपही घातक; गंभीर आजाराला देते आमंत्रण

फक्त उशिरा नाही तर लवकरची झोपही घातक; गंभीर आजाराला देते आमंत्रण

जास्त झोपण्याचे गंभीर दुष्परिणाम

जास्त झोपण्याचे गंभीर दुष्परिणाम

रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं.

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : लहानपणापासून आपण हेच ऐकत आलो आहोत की लवकर निजे (sleep), लवकर उठे तया आरोग्यसंपदा लाभे. लहान मुलांना वेळेवर झोपावं (Sleep timing) आणि लवकर उठवा (Waking Up) यासाठी आपल्याकडे पिढ्यानपिढ्या पालक हे वाक्य ऐकवतात. पालकच नव्हे तर डॉक्टरदेखील हेच सांगत आले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? उशिराची झोप जशी हानिकारक आहे, तशीच लवकरची झोपही वाईट आहे.

एका संशोधनानुसार लवकर झोपण्याचाही आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतो. स्लीप मेडिसीन (Sleep Medicin) या मेडिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. या संशोधनात रात्री दहा वाजण्यापूर्वी झोपणं आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे.

या अभ्यासानुसार, रात्री दहा वाजण्यापूर्वी झोपणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका (Heart attack), ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) येण्याचा धोका 9 टक्क्यांनी अधिक असतो, तर उशिरा झोपल्यामुळे चयापचयाशी  (Metabolism) संबधित आजार आणि जीवनशैलीशी (Life style) संबधित आजार होण्याचा धोकाही असतोच.

हे वाचा - तुमचं कार्टं काही केल्या TV समोरून हटेना; हा VIDEO पाहा मिळेल आयडिया

संशोधकांनी 21 पेक्षा अधिक देशांमध्ये रात्री दहा वाजण्यापूर्वी झोपणाऱ्या 5 हजार 633 लोकांच्या मृत्यूचं कारण जाणून घेतलं. त्यानुसार 4 हजार 346 लोकांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं किंवा स्ट्रोकनं झाल्याचं निष्पन्न झालं. या अभ्यासात असंही आढळून आलं आहे की, मध्यरात्री (Mid night) झोपणाऱ्या लोकांमध्ये आजारपण किंवा मृत्यूचा धोका इतर लोकांपेक्षा 10 टक्क्यांनी अधिक असतो.

ज्या लोकांची झोपण्याची वेळ रात्री दहा ते मध्यरात्र यांच्यामध्ये असते त्यांना ह्र्द्याविकार किंवा ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी असतो. जे लोक रात्री 9 ते रात्री 1 पर्यंतच्या वेळेत झोपतात त्यांनाही असा धोका कमी असल्याचं आढळून आलं; मात्र जे लोक संध्याकाळी सात वाजण्याच्या आधी झोपतात त्यांना ह्रदयविकार आणि स्ट्रोकचा धोका जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हे वाचा - महाराष्ट्रात पुन्हा का होतोय कोरोनाचा उद्रेक? केंद्र सरकारनं सांगितली कारणं )

संशोधनात सहभागी झालेले तज्ज्ञ डॉ. व्ही. मोहन यांनी माहिती देताना सांगितलं की, "या अभ्यासात झोप आणि घटना यांच्यामधील जोखमीचा संबंध तपासाला असता तो यू आकारात असल्याचं दिसून आलं. दररोज सहा ते आठ तास झोप आवश्यक आहे, हे आपणा सर्वांना माहिती आहे. मात्र लवकर किंवा उशिरा झोपण्यापेक्षा वेळेवर झोपणं अतिशय महत्त्वाचं आहे."

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Sleep