मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

GOOD NEWS! कोरोनाची लस शोधता शोधता सापडली कॅन्सरची लस; पाहा कधी उपलब्ध होणार

GOOD NEWS! कोरोनाची लस शोधता शोधता सापडली कॅन्सरची लस; पाहा कधी उपलब्ध होणार

जगाला कोरोना लस (Corona vaccine) उपलब्ध करून देणाऱ्या शास्त्रज्ञ दाम्पत्याने कॅन्सरची लसही (Cancer vaccine) तयार केली आहे.

जगाला कोरोना लस (Corona vaccine) उपलब्ध करून देणाऱ्या शास्त्रज्ञ दाम्पत्याने कॅन्सरची लसही (Cancer vaccine) तयार केली आहे.

जगाला कोरोना लस (Corona vaccine) उपलब्ध करून देणाऱ्या शास्त्रज्ञ दाम्पत्याने कॅन्सरची लसही (Cancer vaccine) तयार केली आहे.

  • Published by:  Priya Lad

बर्लिन, 25 मार्च : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर कोरोनावरील लस (Corona vaccine) उपलब्ध झाली. दरम्यान ही लस शोधता शोधता कॅन्सरसारख्या महाभयंकर आजारवरही लस (Cancer vaccine) सापडली आहे. कॅन्सर म्हटलं की पायाखालची जमीन सरकते, पोटात भीतीचा गोळा येतो. पण आता कॅन्सरलाही घाबरण्याची गरज नाही. नाही शास्त्रज्ञांना यावरसुद्धा लस सापडली आहे.

जगाला कोरोना लस उपलब्ध करून देणाऱ्या जर्मनीतील बायोएनटेक कंपनीच्या शास्त्रज्ञ दाम्पत्याने कॅन्सरची लसही तयार केली आहे.  बायोएनटेचे सीईओ डॉ. उगर साहिन आणि त्यांची पत्नी डॉ. ओजलेम तुरेसी यांनी कॅन्सरशी लढण्यासाठी प्रतिकारक प्रणालीला सक्षम करण्याचा मार्ग शोधला आहे. आता यापासून लसनिर्मितीच्या दिशेने पाऊल टाकलं आहे.

गेल्या वीस वर्षांपासून हे दाम्पत्य कॅन्सरवरील उपचाराचं संशोधन करत आहेत. डॉ. तुरेसी यांनी सांगितलं की कोरोनाची लस मॅसेंजर आरएनए (एम-आरएनए)  च्या मदतीने मानवी शरीरातील त्या प्रोटिनला उत्पादन संदेश पाठवतो जे प्रतिकारक प्रणालीला व्हायरसविरोधात लढण्यासाठी सक्षम बनवते. म्हणजेच एम-आरएनए जेनेटिक कोडचा एक छोटा भाग आहे, जो पेशींमध्ये प्रोटिनची निर्मिती करतो. यामुळे प्रतिकारक क्षमतेत सुरक्षित अँटिबॉडी तयार करण्यासाठी प्रेरित करतात. त्यामुळे खऱ्या व्हायरसची गरज पडत नाही. कोरोना लस तयार करताना याच पद्धतीने आम्ही कॅन्सरला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी काही लशी तयार केल्या आहेत. आम्ही लवकरच याचं क्लिनिकिल ट्रायल सुरू करणार आहोत.

हे वाचा - हँड सॅनिटायजर पसरवतोय कॅन्सर; आढळले धोकादायक केमिकल्स, अभ्यासातून मोठा खुलासा

आतापर्यंत आम्ही जे संशोधन केलं त्यानुसार एम-आरएनए आधारित लस कॅन्सर होण्यापूर्वीच त्याच्याशी लढण्याची ताकद देत असल्याचं स्पष्ट झालं आहे. सर्वकाही नीट झालं तर येत्या दोन वर्षांत कॅन्सरवर लस उपलब्ध होईल, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे. शिवाय  यामुळे कॅन्सर रुग्णांना दिल्या जाणाऱ्या केमोथेरेपी आणि रेडिओथेरेपीमुळे होणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हे वाचा - Alert! पुढील 2 आठवड्यांत दिवसाला 1000 कोरोना बळी जातील; आरोग्य विभागाचा इशारा

बायोएनटेकशिवाय  ऑक्सफोर्डचे शास्त्रज्ञदेखील एम-आरएनए आधारित कॅन्सर लस तयार करण्याच्या तयारीत आहेत. फुफ्फुसाचा कॅन्सर असलेल्या रुग्णांवर एम-आरएनए आधारित लशीचं परीक्षण करण्याची तयारीही पूर्ण केली आहे. त्यांनी वॅक्सिटेक कंपनी स्थापन केली आहे, जे प्रोस्टेट कॅन्सरवरील लशीवर काम करत आहे. या लशीचे सुरुवातीचे परिणाम खूपच सकारात्मक आहेत.

First published:

Tags: Cancer, Corona vaccine, Health, Vaccine