Home /News /heatlh /

Pandemic मुळे घरात बसून मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतोय?, मग बालकांना असा द्या आहार

Pandemic मुळे घरात बसून मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतोय?, मग बालकांना असा द्या आहार

कोविडमुळे उद्यानं आणि खेळाच्या मैदानात जाणं सुरक्षित नाही.

    नवी दिल्ली, 8 डिसेंबर : दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून जगभरात कोरोना महामारीनं धुमाकूळ घातला आहे. लशीच्या उपलब्धतेमुळे आणि कोरोना संसर्गाचा वेग मंदावल्यामुळे सर्वांना काहीसा दिलासा मिळाला होता; मात्र आता ओमिक्रॉन नावाच्या नवीन व्हॅरिएंटमुळे पुन्हा परिस्थिती बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या या महामारीमुळे नागरिकांच्या सामाजिक आणि मानसिक स्थितीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाले आहेत. लॉकडाउन, वर्क फ्रॉम होम यामुळे दैनंदिन सवयींमध्येदेखील आमूलाग्र स्थित्यंतर झालं आहे. या सर्व गोष्टींचा सामना फक्त प्रौढांनाच नाही, तर लहान मुलांनासुद्धा करावा लागला आहे. विशेषत: त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये (Kids eating habits) अनेक बदल झाले आहेत. कोविड-19 महामारीचा (COVID-19 pandemic) लहान मुलांवर किती परिणाम झाला, हे अद्याप पूर्णपणे समोर आलेलं नाही. उपलब्ध झालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुलांमध्ये लठ्ठपणाचा (childhood obesity) धोका वाढला असल्याचं चित्र आहे. हा धोका प्रामुख्याने मध्यम आणि उच्च आर्थिक उत्पन्न असलेल्या घरांतल्या मुलांमध्ये जास्त दिसतो. कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या घरांतल्या मुलांमध्ये कुपोषणाचा (undernutrition) धोका आहे. 'फेमिना'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कोविड लॉकडाउनच्या काळात किशोरवयीन मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काय बदल झाले, हे जाणून घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे करण्यात आला. इटली, स्पेन, चिली, कोलंबिया आणि ब्राझीलमधल्या 820 किशोरवयीन मुलांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये असं दिसून आलं, की कोविड-19 निर्बंधांदरम्यान (COVID-19 restrictions) मुलांमध्ये तळलेले आणि गोड पदार्थ (fried and sweet food) खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. लॉकडाउनमुळे घरातच बसून असेल्या मुलांनी बटाटा चिप्स, रेड मीट आणि साखरयुक्त पेयांचा आस्वाद घेत आपला जास्तीत जास्त वेळ टीव्ही, कम्प्युटर आणि मोबाइल स्क्रीनसमोर घालवला. याउलट, खेळांसाठी दिला जाणारा वेळ लक्षणीय प्रमाणात घटला, अशी माहिती क्लिनिकल आहारतज्ज्ञ, व्याख्याते, डायबेटिस एज्युकेटर, मीट टेक्नॉलॉजिस्ट (Meat Technologist) आणि NUTRच्या संस्थापक लक्षिता जैन (Lakshita Jain) यांनी दिली. वाचा : हिवाळ्यात मेथीच्या पराठ्यांचा नाश्ता सर्वोत्तम, पुरुषांना होईल जबरदस्त फायदा कोविडच्या काळात मुलांच्या निष्क्रियपणाच्या वेळेत 63 टक्के, स्नॅकिंगमध्ये 21 टक्के, मिठाई खाण्यामध्ये 22 टक्के, कंटाळवाणेपणामध्ये 18 टक्के आणि काळजी करण्याच्या प्रमाणात 10 टक्के वाढ झाली. ताजं अन्न खाण्याच्या प्रमाणात 27 टक्क्यांनी घट झाल्याचं जैन यांनी नमूद केलं आहे. लक्षिता जैन यांच्या मते, कोविड काळात अनेक मुलांचं वजन सरासरी 1.8 किलोग्रॅमने वाढलं आहे. अशीच परिस्थिती दीर्घ काळ राहिल्यास मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतील. त्यामुळे जैन यांनी मुलांसाठीच्या खाण्यापिण्याच्या काही आरोग्यदायी सवयींबद्दल माहिती दिली आहे. मुलांच्या आहारामध्ये फळं, भाज्या यांचं प्रमाण वाढवून फॅट्स, साखर आणि मिठाचं प्रमाण कमी करावं. मुलांमध्ये जंक फूड खाण्याचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलं आहे. जंक फूडमध्ये (junk Food) फॅट्स, साखर, मीठ आणि कॅलरीज जास्त असतात. आपली मुलं या गोष्टींपासून दूर कशी राहतील, असा प्रयत्न प्रत्येक पालकानं करावा. हिरव्या, पिवळ्या, केशरी रंगाच्या भाज्या मुलांना नेहमी आकर्षित करतात. त्यामुळे अशा भाज्या (Vegetables) आणि फळांचा (Fruits) समावेश मुलांच्या आहारात करावा. वाचा : रात्रीचं जेवण 'या' वेळी केलं तर होईल वजन कमी, जाणून घ्या वेटलॉसचा फंडा सर्व पोषक तत्त्वं मुलांच्या शरीरात जावीत, यासाठी दूध, तृणधान्यं, कडधान्यं, रंगीत फळं आणि भाज्या यांसारख्या विविध पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा. जीवनसत्त्वं, खनिजं आणि हेल्दी फॅट्सची कमतरता भरून काढण्यासाठी मुलांना ऑलिव्ह, तीळ, शेंगदाणे, मूग, चणे, राजमा, काळे वाटाणे, हिरवे वाटाणे आणि इतर कडधान्यं अशा गोष्टी खाऊ घालाव्यात. पौष्टिक आहारासोबत एक अॅक्टिव्ह रूटीनदेखील (active routine) अतिशय महत्त्वाचं आहे. कोविडमुळे उद्यानं आणि खेळाच्या मैदानात जाणं सुरक्षित नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मुलांना टेरेसवर फिरायला नेऊ शकता किंवा त्यांच्याकडून घरात योगासनं करून घेऊ शकता.
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या