मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

कोरोनाच्या नवसंजीवनीबाबत कंपनीने केलं सावध! 2DG औषधाबाबत दिली नवी अपडेट

कोरोनाच्या नवसंजीवनीबाबत कंपनीने केलं सावध! 2DG औषधाबाबत दिली नवी अपडेट

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी 2DG या औषधाच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे.

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी 2DG या औषधाच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे.

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी 2DG या औषधाच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे.

  • Published by:  Manoj Khandekar

नवी दिल्ली, 19 मे : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी 2DG हे औषध लाँच करण्यात आलं आहे. या औषधाच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनाची सद्यपरिस्थिती पाहता हे औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनीच ठरणार आहे. कारण या औषधामुळे कोरोना रुग्णांची ऑक्सिजनची गरज कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. पण या औषधाबाबत आता नवी माहिती समोर आली आहे.

डीआरडीओच्या (DRDO) INMAS लॅब आणि हैदराबादच्या डॉ. रेड्डीज कंपनीने (Dr Reddy's Laboratories) एकत्रितरित्या तयार केलेलं 2-deoxy-D-glucose (2DG) हे औषध. तोंडावाटे घेता येणारं पावडर स्वरूपातील हे औषध आहे. मध्यम ते तीव्र लक्षणं असलेल्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांनाच हे औषध देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हे वाचा - कोरोना लशीची कमाल! 10 वर्षांपासून असलेला आजारच गायब झाल्याचा व्यक्तीचा दावा

या औषधाबाबत डॉ. रेड्डीजने नुकतीच नवी अपडेट दिली आहे. जूनच्या मध्यापर्यंत हे औषध कर्मशिअल लाँच केलं जाईल किंवा त्याचा पुरवठा केला जाईल. पण सध्या तरी हे औषध अजून बाजारात आलेलं नाही. त्याची किंमतही जारी करण्यात आलेली नाही. लवकरच त्याची किंमत जारी केली जाईल. पण तोपर्यंत बाजारात हे औषध मिळणार नाही. त्यामुळे कुणीही 2DG औषधाच्या नावाने बेकायदेशीर उत्पादन विकत असेल तर सावध राहा, असा सल्ला कंपनीने दिला आहे.

कसं काम करतं 2-डीजी औषध

2-डीजी ग्लुकोजप्रमाणे शरीरात पसरतं आणि विषाणू-संक्रमित पेशींमध्ये जमतं. ते विषाणूजन्य संश्लेषण आणि ऊर्जा निर्मिती थांबवून विषाणूची वाढ रोखतं. फुफ्फुसांमध्ये पसरलेल्या विषाणूच्या संसर्गदेखील ते कमी करतं. त्यामुळे रुग्णाची कृत्रिम ऑक्सिजनची गरज कमी होते आणि त्याची प्रकृती सुधारते. या औषधामुळे अनेक मौल्यवान जीव वाचवणं आणि रुग्णाचं रुग्णालयातील वास्तव्य कमी करण्यास मदत होईल, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

हे वाचा - 'घरी जाऊन कोरोना लस देऊ शकाल का? तर आम्ही BMC ला परवानगी देतो' - मुंबई हायकोर्ट

क्लिनिकल ट्रायलमध्ये सर्व वयोगटातील रुग्णांना हे औषध दिल्यानंतर त्यांच्यात वेगात सुधारणा झाल्याचं दिसून आलं. तसंच तीन दिवसात त्यांची ऑक्सिजनची गरज कमी झाली आणि ऑक्सिजन यंत्रणेवरून त्यांना हटवणं शक्य झाल्याचं अभ्यासात स्पष्ट झालं आहे. कोरोनावरील निश्चित उपचार पद्धतीमुळे केवळ 31 टक्के रुग्णांची तिसऱ्या दिवशी ऑक्सिजन यंत्रणेची गरज कमी होते. तर 2-डीजीचा वापर केल्यास 42 टक्के रुग्णांची 3 दिवसात ऑक्सिजन यंत्रणेची गरज कमी होते. कोरोनावरील निश्चित स्टँडर्ड उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा 2-डीजी घेणाऱ्या रुग्णांची लक्षणं दोन ते अडीच दिवसात कमी झाल्याचं आढळलं आहे.

First published:

Tags: Coronavirus