Home /News /heatlh /

दाढी वाढवणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट? डॉक्टरांनी दिलं उत्तर

दाढी वाढवणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट? डॉक्टरांनी दिलं उत्तर

दाढी वाढवणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे (Doctor opens secret whether keeping beard is healthy or not) की वाईट, याचं उत्तर डॉक्टरांनी दिलं आहे. अनेकांना दाढी वाढवण्याची हौस असते.

    मुंबई, 1 डिसेंबर: दाढी वाढवणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे (Doctor opens secret whether keeping beard is healthy or not) की वाईट, याचं उत्तर डॉक्टरांनी दिलं आहे. अनेकांना दाढी वाढवण्याची हौस असते. आपला चेहरा दाढी असतानाच चांगला दिसतो, असं त्यांचं (Beard look vs clean shave) मत असतं. तर अनेकजण क्लिन शेव्ह ठेवणं पसंत करतात. काहीजण दाढी वाढवणं हे आरोग्यासाठी हानीकारक असल्याचं मानतात, तर काहींना ते अस्वच्छ असण्याचं लक्षण वाटतं. मात्र दाढी वाढवण्याचा संबंध हा जसा दिसण्याशी आहे, तसाच तो प्रत्येकाच्या आरोग्याशीदेखील संबंधित असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. व्हिडिओ होतोय व्हायरल पेशानं सर्जन असणाऱ्या डॉ. करण राजन यांनी टिकटॉकवर एक व्हिडिओ तयार करत दाढीच्या फायद्यातोट्यांबाबत सविस्तर माहिती दिली आहे. दाढीचा संबंध हा आरोग्याशी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दाढी वाढवणाऱ्या व्यक्तींना चेहऱ्याला ब्लेड किंवा कुठलाही धारदार धातू लावण्याची गरज पडत नाही. त्यामुळे त्यांच्या त्वचेची हानी कमी होते आणि त्यांचा चेहरा दीर्घकाळ तरुण राहत असल्याचं डॉक्टर सांगतात. किरणांपासून होते संरक्षण सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे कायमच त्वचेचं नुकसान होत असतं. मात्र जे पुरुष दाढी वाढवतात, त्यांच्या त्वचेचं अतिनील किरणांपासून संरक्षण होत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. अतिनील किरणं थेट त्वचेवर पडण्याआधी ती दाढीवर पडतात. त्यामुळे त्वचेचं होणारं नुकसान कमी होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे दाढी वाढवणं हे एक प्रकारे क्लिनशेव करण्यापेक्षा अधिक आरोग्यदायी असल्याचं म्हटलं जातं. हे वाचा- ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी, IMD कडून Alert, वाचा मुंबई-पुण्यात काय स्थिती हिवाळ्यात वाढवा दाढी डॉ. करण हे स्वतः लांब दाढी ठेवतात. यंदाच्या हिवाळ्यात जर तुम्हाला दाढी वाढवण्याची इच्छा असेल, तर बिनधास्त दाढी वाढवा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यात दाढी ठेवणारे कर्मचारी हे क्लिनशेव करणाऱ्यांपेक्षा स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर आणि तत्पर असल्याचं समोर आल्याची माहितीदेखील डॉ. करण यांनी दिली आहे
    Published by:desk news
    First published:

    Tags: Fashion, Health, Lifestyle

    पुढील बातम्या