नवी दिल्ली, 10 एप्रिल : भारताने गेल्या काही दिवसांत कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाचा (Vaccination Drive) वेग वाढवला आहे. तरीही कोरोनाबाधितांच्या (Corona Patinets) संख्येत होणारी वाढ कायम आहे. अनेक डॉक्टर्सनी कोरोनाप्रतिबंधक लस (covid-19 Vaccination) घेऊनही त्यांना कोरोना झाल्याचं आढळून आलं आहे. तसंच काही जणांना एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतर पुन्हा संसर्ग झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पण म्हणून घाबरायचं कारण नाही. लसीकरणामुळे मुळात कोरोना संसर्ग होणार नाही, असा दावाच नाही. मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं तर कोरोना संसर्ग झाल्यानंतरच्या आजाराची तीव्रता निश्चितपणे कमी होईल, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू ले. प्रा. बिपिन पुरी यांनी कोविड19 (Covid19)लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर11दिवसांनी त्यांना कोरोनाचापुन्हा संसर्ग झाला. तरीही ते लसीकरण आवश्यक असल्याचं म्हणतात. कारण त्यांच्या मते, कोविड19च्या आजाराची तीव्रता कमी करण्याचं काम लस करते, असं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे.
त्याच विद्यापीठाचे वैद्यकीय अधीक्षक आणि संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. डी. हिमांशू यांनाही कोविड19 च्या लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला.
गेल्या वर्षी ही साथ (Pandemic) आल्यापासून अनेक वैद्यकीय व्यावसायिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. किती तरी डॉक्टर्सना लसीकरण झाल्यानंतरही संसर्ग झाला आहे.
संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकलसायन्सेसचे संचालक डॉ. आर. के. धिमन आणि त्यांच्या पत्नी यांना होळीच्या तीन दिवस आधी कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. त्या दोघांनीही लशीचे दोन्ही डोस घेतले होते. तरीही डॉ. धिमन लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करत आहेत. कोविड19चा संसर्ग झाला, तरी हॉस्पिटलायझेशन टाळण्यासाठी, रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी, तसंच मृत्यूची शक्यता कमी करण्यासाठी लस आवश्यकआहे. कोरोनाचा पुन्हा संसर्ग झाला, तरी लस घेतलेली असल्यास लक्षणं सौम्य(Mild Symptoms)होतात, असंही त्यांनी सांगितलं.
'दी न्यू इंडियनएक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारमधल्या 26हून अधिक डॉक्टर्सनी लस घेऊनही त्यांना संसर्ग झाला. डॉ. उमेशकुमार आणि पत्नी डॉ. निर्मलासिंग यांना लस घेतल्यानंतर कोरोना संसर्ग झाला.
पाटणा मेडिकल कॉलेज अँडहॉस्पिटलमधील नऊ डॉक्टर्सही लसीकरणानंतर कोविड पॉझिटिव्ह आले. बेगुसरायमधल्या एका डॉक्टरचा लस घेतल्यानंतर कोरोना संसर्ग होऊन मृत्यूही झाला.
वैशाली जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ. इंद्रदेव रंजन यांनादुसरा डोस घेतल्यानंतरही संसर्ग झाला. महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यातही आरोग्य विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही संसर्ग झाला.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA)माजी अध्यक्ष डॉ. पी. के.गुप्ता यांनी सांगितलं, की कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतरही कोरोनाचासंसर्ग होण्याची शक्यता टाळता येत नाही. मात्र त्याचं स्वरूप सौम्य असतं.त्यामुळे लोकांनी लस घेणं आवश्यक आहे.
'एम्स'चे संचालक डॉ. रणदीपगुलेरियाही लोकांना कोरोनाप्रतिबंधक लस घेण्याचं आवाहन करत आहेत.सीएनएन-न्यूज18च्या मार्या शकील यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं, की लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्याची लक्षणं सौम्य असतात किंवा अजिबात नसतात. सध्याच्या लशींमधून तयार होणारी प्रतिकारशक्ती 9 ते 12 महिने टिकते.
केंद्र सरकारच्या कोविड-19 रिस्पॉन्स टीमचे प्रमुख सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी लोकांना आवाहन केलं आहे, की लस घेतल्यानंतरही लोकांनी मास्क नियमितपणे परिधान करावा. आपलं बराच काळ संरक्षण करण्यासाठी मास्क घालण्याशिवाय पर्याय नाही, असं त्यांनी इंडियाटुडेला सांगितलं.
'काही जिल्ह्यांत कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे; पण संपूर्ण देशही धोक्याच्या पातळीवर उभा आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठीशक्य त्या सर्व उपायांची अंमलबजावणी करायला हवी,'असं त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus