मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

डायबेटिसवर करा ‘हा’ उपचार; इतका आहे स्वस्त की कुणालाही परवडेल

डायबेटिसवर करा ‘हा’ उपचार; इतका आहे स्वस्त की कुणालाही परवडेल

डायबेटिस

डायबेटिस

जगभरात अनेक लोकं डायबेटिसच्या समस्येला तोंड देत आहेत. या आजारावर कायमस्वरूपी उपाय नाही. एकदा हा रोग झाला की, याचं समूळ उच्चाटन शक्य नाही.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : जगभरात अनेक लोकं डायबेटिसच्या समस्येला तोंड देत आहेत. या आजारावर कायमस्वरूपी उपाय नाही. एकदा हा रोग झाला की, याचं समूळ उच्चाटन शक्य नाही. औषधोपचार आणि डाएटच्या साहाय्याने हा आजार नियंत्रणात राहतो. डायबेटिक पेशंटच्या शरीरात इन्सुलिन या संप्रेरकाच्या निर्मितीचं प्रमाण असंतुलित होतं. ज्यामुळे रक्तातील साखरेचं विघटन केलं जात नाही. त्यामुळे रक्तातली साखर. यासाठीच रूग्णांना इन्सुलिनचं इंजेक्शन आणि औषधं दिली जातात. त्यामुळे डायबेटिस नियंत्रणात राखणं शक्य होतं. एका नव्या संशोधनानुसार रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवाण्यासाठी निराळ्या उपचार पद्धतीचा शोध लागलाय. या नव्या पद्धतीनुसार अगदी अत्यल्प दरात घरबसल्या या समस्येवर उपचार करता येईल.

संशोधनात आढळली एक धक्कादायक बाब

ब्रिटिश वेबसाईट ‘एक्सप्रेस’ च्या रिपोर्टनुसार रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा खाणं उपयुक्त आहे. डायबेटिसच्या रूग्णांसाठी हा स्वस्त आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. कांद्याच्या रसामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण 50% नी कमी होतं. कांद्याचा रस, एलियम सेपा आणि मेटाफॉर्मिनमुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. ही बाब अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या रिसर्च पेपरमुळे समोर आली. मेटाफॉर्मिनमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळवता येतं. त्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण कमी करण्याठी मेटाफॉर्मिन पेशंटना देतात. या रिसर्च टीमच्या प्रमुख संशोधकाने असं म्हटलंय, ‘डायबेटिसवर नियंत्रण मिळवण्यासाठी कांदा ही स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारी गोष्ट आहे’.

हेही वाचा -  चक्कर येणे, जास्त घाम येणे ही प्री-डायबिटीसची लक्षणे असू शकतात, आधीच अशी घ्या काळजी

कशी आहे संशोधन पद्धती?

संशोधनादरम्यान संशोधकांनी डायबेटिस झालेल्या उंदरांना 400 आणि 600 मिलिग्रॅम कांद्याचा रस दिला. ज्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण 50% आणि 35%नी कमी झालं. कांद्यामुळे उंदरांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी घटल्याचं दिसून आलं. तसंच ज्या उंदरांना डायबेटिसची लागण झाली नव्हती, त्याचे वजन वाढलं. उलट डायबेटिस झालेल्या उंदरांचं वजन नियंत्रणात राहिलं. संशोधकांच्या मते, कांद्यात कॅलरीचं प्रमाण मर्यादित असतं. ज्यामुळे पचनशक्ती सक्षम होते. परिणामी, भूक लागण्याचं प्रमाण वाढतं आहार वाढतो.

डायबेटिसच्या समस्येत होतेय वाढ

सध्याच्या जगात डायबेटिसचं प्रमाण खूप वाढतंय. अगदी तरुणवयात डायबेटिस होणार्‍या रूग्णांचं प्रमाण वाढलंय. यामुळे, हृदयाशी निगडित आजारांचं प्रमाण वाढलंय. गेल्या काही दिवसांत एक रिसर्च प्रसिद्ध झाला. त्या रिसर्चनुसार पुढच्या 20 वर्षांत जगभरात डायबेटिसची समस्या असलेल्या लोकांची संख्या कोटीच्या घरात असेल. या संशोधनाने सगळ्यांचीच झोप उडवली आहे. डायबेटिस एखाद्या महामारीप्रमाणे लोकांना आपल्या विळख्यात ओढतोय. या आजारापासून दूर राहायचे असेल तर तुमच्या जीवनशैलीत बदल करणं अनिवार्य आहे. संतुलित आहार, व्यायाम, नियमित तपासणी आणि वजन वाढीवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. यासाठीच तब्येतीच्या कोणत्याही तक्रारीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं इष्ट राहील.

डायबेटिसवर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, पळणं, चालणं, योग हे करण्याची गरज आहे. तसंच जोडीला सर्वसमावेशक पण संतुलित आहार गरजेचा आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने डाएट केल्यास उपयुक्तच ठरेल. कारण संतुलित आहार हेच निरोगी जीवनाचे रहस्य आहे यात शंका नाही.

First published:

Tags: Diabetes, Health, Lifestyle