मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

चक्कर येणे, जास्त घाम येणे ही प्री-डायबिटीसची लक्षणे असू शकतात, आधीच अशी घ्या काळजी

चक्कर येणे, जास्त घाम येणे ही प्री-डायबिटीसची लक्षणे असू शकतात, आधीच अशी घ्या काळजी

How To Manage lifestyle In pre-diabetes - जास्त घाम येणे, चक्कर येणे किंवा पाय सुन्न होणे ही प्री-डायबिटीजची लक्षणे असू शकतात. मधुमेह होण्याआधी, प्री-डायबिटीजची लक्षणे शरीरात दिसू लागतात, मात्र ती ओळखणे थोडे कठीण असते. अधिक जाणून घेऊया.

How To Manage lifestyle In pre-diabetes - जास्त घाम येणे, चक्कर येणे किंवा पाय सुन्न होणे ही प्री-डायबिटीजची लक्षणे असू शकतात. मधुमेह होण्याआधी, प्री-डायबिटीजची लक्षणे शरीरात दिसू लागतात, मात्र ती ओळखणे थोडे कठीण असते. अधिक जाणून घेऊया.

How To Manage lifestyle In pre-diabetes - जास्त घाम येणे, चक्कर येणे किंवा पाय सुन्न होणे ही प्री-डायबिटीजची लक्षणे असू शकतात. मधुमेह होण्याआधी, प्री-डायबिटीजची लक्षणे शरीरात दिसू लागतात, मात्र ती ओळखणे थोडे कठीण असते. अधिक जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : अंतःस्रावी विकारांमुळे मधुमेह होतो. मधुमेह असताना शरीराचे अंतर्गत तापमान स्थिर राखणे कठीण असते. मधुमेहामुळे शरीराची तापमान राखण्याची नैसर्गिक क्षमता नष्ट होते. त्यामुळे मधुमेहामुळे जास्त घाम येणे किंवा घामाची कमतरता होऊ शकते. जास्त घाम येणे, चक्कर येणे किंवा पाय सुन्न होणे ही प्री-डायबिटीजची लक्षणे असू शकतात. मधुमेह होण्याआधी, प्री-डायबिटीजची लक्षणे शरीरात दिसू लागतात, जी ओळखणे थोडे कठीण असते. असामान्य साखरेचा स्तर असलेल्या लोकांना प्री-डायबिटीज होण्याचा धोका असतो. प्री-डायबेटिस हा रिवर्सिबल करता येण्याजोगा असतो जो जीवनशैलीतील बदल आणि आहाराने बरा करता येतो. सुरुवातीलाच त्यावर नियंत्रण ठेवल्यास मधुमेह आणि हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होऊ शकतो. प्री-डायबिटीसमध्ये जीवनशैलीत कसे बदल करता येतील ते जाणून घेऊया.

प्री-मधुमेह म्हणजे काय?

प्री-डायबिटीज हा मेटाबॉलिक सिंड्रोमचा एक भाग आहे, जो नंतर टाइप-2 मधुमेहामध्ये बदलू शकतो. आय अॅम अवेअरच्या माहितीनुसार, प्री-डायबिटीजमध्ये शरीरात अनेक बदल दिसून येतात जे अगदी सामान्य आहेत. यामुळेच लोकांना प्री-डायबेटिसची लक्षणे वेळेत ओळखता येत नाहीत. असे मानले जाते की प्री-डायबिटीज होण्याचे मुख्य कारण म्हणजे अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि लठ्ठपणा. प्री-डायबिटीजमुळेही उच्च रक्तदाब होऊ शकतो. चक्कर येणे, उलट्या होणे, जास्त घाम येणे, पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे असे प्रकार घडू शकतात. हा एक रिव्हर्सिबल सिंड्रोम आहे जो जीवनशैलीत काही बदल करून नियंत्रित केला जाऊ शकतो.

वजन नियंत्रित ठेवा -

जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. ज्यामध्ये हार्ट प्रॉब्लेम, हाय बीपी, स्ट्रोक, डायबिटीज आणि अगदी कॅन्सरचाही समावेश आहे. प्री-मधुमेहासाठी लठ्ठपणाही कारणीभूत ठरू शकतो. ज्या पुरुषांच्या कंबरेचा आकार 40 पेक्षा जास्त आहे आणि ज्या महिलांच्या कंबरेचा आकार 35 पेक्षा जास्त आहे त्यांना प्री-मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. यासाठी वजन कमी करणे खूप महत्त्वाचे आहे. जीवनशैली आणि आहारात बदल करून वजन नियंत्रित करता येते.

चालणे-धावणे -

प्री-डायबिटीजसाठी दिवसातून 30 मिनिटे किंवा त्याहून अधिक चालणे फार महत्त्वाचे आहे. चालण्याने शारीरिक हालचाली वाढवता येतात जे निरोगी जीवनशैलीसाठी आवश्यक आहे. चालण्याने केवळ मधुमेहच नाही तर स्ट्रोक, हृदयाच्या समस्या आणि अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. चालणे शरीराला कॅलरी बर्न करण्यास, वजन कमी करण्यास आणि चरबी जाळण्यास मदत करते.

हे वाचा - ‘एंझायटी अ‍ॅटॅक’ का येतो?; जाणून घ्या त्याची कारणं, लक्षणं आणि उपचार

अधिक फायबर सेवन -

प्री-डायबिटीज नियंत्रित करण्यासाठी उच्च फायबरयुक्त आहार घेतला जाऊ शकतो. उच्च फायबरसाठी रास्बेरी खाऊ शकता. रास्बेरी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिन कमी होऊ शकते. त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप कमी आहे जे प्री-डायबिटीज पूर्ववत करण्यास मदत करू शकते. रास्बेरीशिवाय लेट्युस, कोबी, सेलेरी आणि गाजर यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

हे वाचा - काय येतो जिममध्ये हार्ट अटॅक? सलमानच्या बॉडीगार्डचाही यामुळेच मृत्यू

इंटरमिटेंट फास्टिंग करा -

इंटरमिटेंट फास्टिंग करणे हा कॅलरी कमी करण्याचा उत्तम मार्ग असू शकतो. इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये खाण्याच्या ठराविक पद्धतीचा समावेश असतो, ज्यामध्ये सर्व पोषक तत्वांचा समावेश केला जाऊ शकतो. यात सर्वात लोकप्रिय 5:2 आणि 16/8 खाण्याच्या पद्धती आहेत ज्याचे बहुतेक लोक अनुसरण करतात. कमी कॅलरीज घेतल्यास प्री-डायबिटीजची लक्षणे कमी होऊ शकतात.

First published:

Tags: Diabetes, Tips for diabetes