Home /News /heatlh /

संसर्गजन्य आजारांपासून वाचण्यासाठी वाढवा प्रतिकारशक्ती, या पदार्थांचा करा आहारात समावेश

संसर्गजन्य आजारांपासून वाचण्यासाठी वाढवा प्रतिकारशक्ती, या पदार्थांचा करा आहारात समावेश

फळ, भाज्या वेगवेगळे प्रकारचे पदार्थ आहेत. त्यामुळे पचायला लागणारा कालावधी वेगवेगळा असतो. त्यामुळे एकत्र खाऊ नयेत असं डॉक्टरही सांगतात.

फळ, भाज्या वेगवेगळे प्रकारचे पदार्थ आहेत. त्यामुळे पचायला लागणारा कालावधी वेगवेगळा असतो. त्यामुळे एकत्र खाऊ नयेत असं डॉक्टरही सांगतात.

आजाराच्या संसर्गापासून वाचण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती (Immunity ) चांगली असणं महत्त्वाचं आहे. आपल्या दररोजच्या आहारात (Diet) प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या त्याचप्रमाणे पोटही भरणाऱ्या पदार्थांचा समावेश केल्यास त्याचा नक्कीच अधिक फायदा होईल.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली 30 एप्रिल : सध्या सगळीकडे कोरोना विषाणूच्या (Corona Virus) संसर्गानं थैमान घातल्यानं त्यापासून वाचण्यासाठी प्रत्येकाला घरातच थांबणे अनिवार्य झालं आहे. परंतु सगळ्यांना ते शक्य होत नाही. त्यामुळे या आजाराच्या संसर्गापासून वाचण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती (Immunity ) चांगली असणं महत्त्वाचं आहे. अर्थात आपण घरात बसून राहिलो तरी हवामान बदल किंवा अन्य काही कारणांमुळे व्हायरल आणि फ्ल्यूसारखे आजार होऊ शकतात. असे आजार आपली घरीदेखील पाठ सोडत नाहीत. अशा परिस्थितीत स्वत:ला घराबाहेर आणि घरातही सुरक्षित ठेवण्यासाठी आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे हा एकच उत्तम उपाय आहे. यामुळे आपण अनेक विषाणूपासून आपलं संरक्षण करू शकतो. सध्या रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे काढे, व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घेतच आहेत. त्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढेल आणि अशा आजारांशी आपल्याला सामना करता येईल. या उपायांबरोबरच आपल्या दररोजच्या आहारात (Diet) प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या त्याचप्रमाणे पोटही भरणाऱ्या पदार्थांचा समावेश केल्यास त्याचा नक्कीच अधिक फायदा होईल. अशा काही पदार्थांबाबत ही माहिती. प्रीबायोटिक फूडचा आहारात समावेश करा : आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारात प्रीबायोटिक फूडचा (Prebiotic Food) समावेश करणं आवश्यक आहे. हे पदार्थ आतड्यांमधील चांगले जीवाणू (Bacteria) वाढवण्यास मदत करतात. प्रीबायोटिक्स आहार घेतल्यानं तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, तसंच पचन सुधारते. प्रीबायोटिक्स फूडमध्ये बदाम, सफरचंद, केळी, लसूण, कांदे, सोयाबीन, गहू, ओट्स आणि मका यासारख्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. आंबवलेल्या पदार्थांचे सेवन करा : आंबवलेले पदार्थ (Fermented Food) रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात खूप मदत करतात. आहारात त्यांचा समावेश केल्यानं पोटाचे आरोग्य आणि पचन प्रक्रियादेखील चांगली राहते. आंबवलेले पदार्थ आतड्यांच्या आरोग्यासाठीही चांगले मानले जातात. त्यामुळं आपल्या आहारात इडली, डोसा, जिलेबी, दही, लोणचे आणि कांजी यासारख्या आंबवलेल्या पदार्थांचा जरूर समावेश करावा. अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थ खा: आपल्या आहारात अँटिऑक्सिडेंटयुक्त (Antooxident) पदार्थांचा समावेश केल्यानं प्रतिकारशक्ती वाढते आणि कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य आजारापासून आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि बीटा कॅरोटीनयुक्त पदार्थ हे अँटिऑक्सिडेंट्सचा चांगला स्रोत आहेत. अँटिऑक्सिडेंट्स करता आपण आपल्या दररोजच्या आहारात टोमॅटो, सफरचंद, ब्लूबेरी, ग्रीन टी, कोबी, कांदे, संत्री, कोको, स्ट्रॉबेरी, बीट आणि बीन्स अशा विविध पदार्थांचा वापर करू शकता.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Food, Lifestyle

पुढील बातम्या