मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

डायबेटिसच्या रुग्णांनी सफरचंद खावं की नको? काय म्हणतात आरोग्य तज्ज्ञ

डायबेटिसच्या रुग्णांनी सफरचंद खावं की नको? काय म्हणतात आरोग्य तज्ज्ञ

सफरचंद गोड फळ आहे. याचं सेवन करण्याआधी डायबेटिसचे रुग्ण अनेकदा विचार करतात. सफरचंद खाणं फायदेशीर आहे की त्रास होऊ शकतो, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

सफरचंद गोड फळ आहे. याचं सेवन करण्याआधी डायबेटिसचे रुग्ण अनेकदा विचार करतात. सफरचंद खाणं फायदेशीर आहे की त्रास होऊ शकतो, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

सफरचंद गोड फळ आहे. याचं सेवन करण्याआधी डायबेटिसचे रुग्ण अनेकदा विचार करतात. सफरचंद खाणं फायदेशीर आहे की त्रास होऊ शकतो, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Lanja, India

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : डायबेटिस झालेल्या रुग्णांना आहाराच्या बाबतीत खूप काळजी घ्यावी लागते. जेवणाच्या वेळा पाळण्यासह गोड पदार्थ टाळण्याचा सल्ला डॉक्टर तसंच आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. खानपानाच्या बाबतीत थोडसं दुर्लक्षही धोकादायक ठरू शकतं. दैनंदिन आयुष्यातील वाईट सवयी व चुकीची लाइफस्टाइल रक्तातील साखर वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. आहारात फळं आणि भाज्यांची निवड करताना काळजी घेण्याबाबत डॉक्टर नेहमी सांगत असतात. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरचा सल्ला, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम ही त्रिसूत्री पाळायला हवी. डायबेटिसच्या रुग्णांनी सफरचंदाचं सेवन करावं की नाही, हा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. त्यांच्यासाठी सफरचंद उपयोगी आहे की वर्ज्य याबद्दल जाणून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेल्थलाइन डॉट कॉमनुसार, सफरचंद एक आरोग्यदायी व चवीला उत्तम असं फळ आहे. आरोग्याच्या दृष्टीनं यात अनेक फायदेशीर घटक आहेत. सफरचंदामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, कार्बोहायड्रेट म्हणजेच कार्ब्ज आणि अँटिऑक्सिडंट्स आदी घटकांचा समावेश असतो. यात कॅलरीजचं प्रमाणही खूप कमी असतं. फायबर आणि कार्ब्ज अधिक असल्यानं डायबेटिससचे रुग्ण हे फळ खाणं टाळत असतात.

सफरचंदामध्ये असलेले कार्ब्ज शरीरातील ब्लड शुगरवर परिणाम करू शकतात. पण कार्ब्ज आणि फायबरचं प्रमाण अधिक असल्यानं ब्लड शुगरची पातळी नियंत्रित करण्यासह आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकतं.

सफरचंदाबाबत तज्ज्ञांचं काय आहे मत?

सफरचंद गोड फळ आहे. याचं सेवन करण्याआधी डायबेटिसचे रुग्ण अनेकदा विचार करतात. परंतु, तज्ज्ञांच्या मते, सफरचंद गोड असलं तरी यात फ्रुक्टोज असतं. याचं सेवन केल्यानं ब्लड शुगरची पातळी फारशी वाढत नाही. सफरचंदातील फायबर आणि वनस्पती आधारित पॉलिफेनॉल्स कार्ब्जचं प्रमाण कमी करून डायबेटिसला नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं.

इन्शुलिन नियंत्रणात ठेवण्यास मदत

सफरचंदामध्ये सर्वाधिक वनस्पती आधारित कंपाउंड्स आढळतात. यामुळे डायबेटिस असलेल्या रुग्णांच्या शरीरातलं इन्शुलिन नियंत्रणात ठेवलं जाऊ शकतं व त्याचा चांगला फायदाही होतो. तज्ज्ञांच्या मते, डायबेटिसचे रुग्ण सफरचंदाचं सेवन करू शकतात. यात क्वेरसेटिन आणि फ्लोरिजिनचा समावेश असतो. शरीरातील डायबेटिसचा धोका कमी करण्यासाठी याची मदत होत असते.

दरम्यान, डायबेटिस झालेले बहुतांश रुग्ण त्यांच्या आहारावर नियंत्रण ठेऊ शकत नाहीत. त्यामुळे कालांतराने त्यांच्या शरीरावर त्याचे दुष्पपरिणाम दिसायला लागतात. शरीरातील ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर संतुलित आहार घेण्यासह दररोज व्यायाम करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जेवणाच्या वेळा काटेकोरपणे पाळल्या जातात, की नाही याकडे लक्ष देणंही आवश्यक आहे. आहारामध्ये कुठल्याही फळांचा समावेश करताना एकदा डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यास डायबेटिसच्या रुग्णांना ब्लड शुगर नियंत्रणात ठेऊन निरोगी जीवन जगण्यास फायदा होऊ शकतो.

First published:

Tags: Diabetes, Tips for diabetes