मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Diabetes : जेवणानंतर करा हा व्यायाम, डायबेटिसचा धोका होईल कमी!

Diabetes : जेवणानंतर करा हा व्यायाम, डायबेटिसचा धोका होईल कमी!

How to Prevent Diabetes

How to Prevent Diabetes

डायबेटिस अर्थात मधुमेह (Diabetes) गंभीर आणि शरीरात गुंतागुंत निर्माण करणारा आजार आहे. बदलती जीवनशैली, ताणतणाव, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि अनुवंशिकता आदी कारणांमुळे डायबेटिस होऊ शकतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 3 सप्टेंबर : डायबेटिस अर्थात मधुमेह (Diabetes) गंभीर आणि शरीरात गुंतागुंत निर्माण करणारा आजार आहे. बदलती जीवनशैली, ताणतणाव, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि अनुवंशिकता आदी कारणांमुळे डायबेटिस होऊ शकतो. या आजाराचं निदान झाल्यानंतर ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) नियंत्रणात राहण्यासाठी आहार, विहार, ताणतणाव व्यवस्थापन याकडे लक्ष द्यावं लागतं. ब्लड शुगर लेव्हल सातत्यानं जास्त राहिली तर हृदयविकार, हार्ट अ‍ॅटॅक, किडनी विकार, स्ट्रोक किंवा दृष्टिदोष निर्माण होऊ शकतात. डायबेटिस असलेल्या रुग्णानं जेवण झाल्यावर काही मिनिटं चालल्यास (Walking) ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात येऊ शकते, असं एका नव्या संशोधनातून दिसून आलं आहे.

स्पोर्ट्स मेडिसीन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नव्या संशोधनात संशोधकांनी सात वेगवेगळ्या अभ्यासाचं विश्लेषण केलं आहे. यात जास्त वेळ बसण्यापेक्षा उभं राहणं आणि चालणं यासारख्या हलक्या शारीरिक हालचालींचा इन्शुलिन, ब्लड शुगर लेव्हल आणि हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, या गोष्टींचा या विश्लेषणात समावेश आहे. लंच किंवा डिनर केल्यानंतर बसणं किंवा झोपण्याऐवजी दोन ते पाच मिनिटं शतपावली केल्यास ब्लड शुगर लेव्हलमध्ये सुधारणा होऊ शकते. या शिवाय जेवणानंतर तुम्ही काही वेळ उभं राहिल्यास ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात येऊ शकते, असा सल्ला संशोधनाच्या निष्कर्षांच्या आधारे संशोधकांनी दिला आहे.

तुम्हाला डायबेटिस झाला असेल तर दृष्टिदोष, हार्ट अ‍ॅटॅक, स्ट्रोक आणि किडनी विकाराचा धोका टाळण्यासाठी शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवायला हवी.

दरम्यान, ``हलक्या शारीरिक हालचाली तुमच्या आरोग्यासाठी हितावह ठरू शकतात,`` असं या अभ्यासाचे लेखक एडन बुफे यांनी हेल्थ वेबसाईटशी बोलताना सांगितलं.

``ब्लड शुगर लेव्हल व्यवस्थापन योग्य पद्धतीनं केलं तर तुम्हाला भविष्यात डायबेटिसशीनिगडीत समस्यांचा सामना करावा लागणार नाही. ही लेव्हल दिवसभरात योग्य प्रमाणात राहिली तर तुमची एनर्जी लेव्हल बूस्ट होते,`` असं अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या आरोग्य सेवा कार्यक्रमाच्या उपाध्यक्षा लॉरा हिरोनिमस यांनी सांगितलं.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शनने (CDC) दिलेल्या माहितीनुसार, दिवसभर साखरेची लेव्हल नियंत्रित राहण्यासाठी फळं, भाज्यांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. त्यासोबत वजन नियंत्रणात ठेवणं आणि नियमित व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. याशिवाय सातत्यानं लेव्हल तपासणं, दिवसभरात ठराविक कालावधीनंतर काहीतरी खाणं, उपाशी न राहणं, पाणी पिणं आवश्यक आहे.

जेव्हा आपण एखादा कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खातो, तेव्हा रक्तातली साखर अचानक वाढू लागते. याला पोस्टप्रँडियल स्पाइक (Postprandial spike) असं म्हणतात. साखर अचानक वाढल्याने इन्शुलिन (Insulin) नावाचा हॉर्मोन रिलीज होतो. हा हॉर्मोन रक्ताच्या माध्यमातून ग्लुकोज पेशींमध्ये पोहोचतो, जेणेकरून त्याचा वापर साखरेचं विघटन करून ऊर्जा निर्माण करता येईल. परंतु, साखरेची पातळी आणि इन्शुलिनमधील हे संतुलन अतिशय नाजूक असतं आणि ते नियंत्रणाबाहेर जाऊ शकतं. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, जर सातत्याने शुगर लेव्हल वाढत असेल तर पेशी इन्शुलिनला प्रतिसाद देणं थांबवू शकतात आणि इन्शुलिन प्रतिरोधक बनू शकतात. यामुळे व्यक्ती प्री-डायबेटिक होऊ शकते किंवा तिला डायबेटिस टाइप -2 (Diabetes Type-2) होऊ शकतो.

``तुम्ही जर जेवणानंतर शतपावली केली तर शुगर लेव्हल कमी झाल्याने डायबेटिस तसंच हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो,`` असं या अभ्यासाचे लेखक बुफे नमूद करतात. जेवणानंतर बसून राहण्याऐवजी थोडा वेळ चालल्यास किंवा उभं राहिल्यास पोस्टप्रँडियल ग्लुकोज लेव्हल कमी होऊ शकते, असं संशोधकांना दिसून आलं आहे. पण या अभ्यासाच्या लेखकांच्या मते, संथ चालणं हे अधिक फायदेशीर ठरू शकतं, कारण जेवणानंतर इन्शुलिनची पातळी वाढते.

जेवणानंतर संथ चालल्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कमी होते, इन्शुलिन पातळीही व्यवस्थित राहते, असं मत संशोधकांनी व्यक्त केलं आहे. या शिवाय या अभ्यासाचे लेखक बुफे यांनी, ``दिवसभरात थोड्याथोड्या वेळानं चालणंही फायदेशीर ठरू शकतं,`` असं सांगितलं आहे. ``शक्य असेल तर दिवसभरात बसून राहण्याचा कालावधी कमी करणं गरजेचं आहे. जर तुमचं काम बैठ्या स्वरुपाचं असेल तर दर 20 ते 30 मिनिटांनी जागेवरून उठून थोडं फिरून यावं,`` असं बुफे यांनी सांगितलं.

First published:

Tags: Diabetes, Tips for diabetes