मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Dengue Remedies: डेंग्यूचा ताप कमी करण्यासाठी 'हे' उपाय ठरतात फायदेशीर; वाढतील Platelets

Dengue Remedies: डेंग्यूचा ताप कमी करण्यासाठी 'हे' उपाय ठरतात फायदेशीर; वाढतील Platelets

व्यक्तीला रक्तस्रावाची समस्या निर्माण होऊ शकते. रक्तस्राव ही डेंग्यूमुळे होणारी गंभीर समस्या आहे.

व्यक्तीला रक्तस्रावाची समस्या निर्माण होऊ शकते. रक्तस्राव ही डेंग्यूमुळे होणारी गंभीर समस्या आहे.

व्यक्तीला रक्तस्रावाची समस्या निर्माण होऊ शकते. रक्तस्राव ही डेंग्यूमुळे होणारी गंभीर समस्या आहे.

  देशात कोरोना (corona) रुग्णांची संख्या आता कमी होत आहे; मात्र डेंग्यूच्या (dengue) रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. डेंग्यू हा फ्लूसारखा (flu) आजार आहे. एडिस इजिप्ती प्रजातीच्या मादी डासांच्या (Aedes aegypti mosquito) चाव्यातून त्याचा प्रसार होतो.

  उलट्या, तीव्र डोकेदुखी, मळमळ, पुरळ, सांधेदुखी, स्नायू दुखणं, डोळ्यांच्या मागे दुखणं आणि ग्रंथी सुजणं ही डेंग्यूची काही सामान्य लक्षणं (common symptoms) आहेत. या आजारावर वेळीच उपचार न केल्यास थकवा येणं, उलट्यांमध्ये रक्त येणं, सतत उलट्या होणं, हिरड्यांमधून रक्त येणं, अस्वस्थता आणि पोटात दुखणं अशा मोठ्या समस्या उद्भवू शकतात.

  डेंग्यूच्या तापामध्ये शरीरातल्या प्लेटलेट्सचं (How to Increase platelets) प्रमाण कमी होऊ लागतं. पुरेशा प्लेटलेट्स नसल्यास, एखाद्या व्यक्तीला रक्तस्रावाची समस्या निर्माण होऊ शकते. रक्तस्राव ही डेंग्यूमुळे होणारी गंभीर समस्या आहे.

  डेंग्यूवर विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. या आजाराची लक्षणं गंभीर होऊ नयेत, यासाठी उपचार करणं हाच सध्या तरी एकमेव उपचार आहे. सुदैवाने, काही प्रभावी घरगुती उपचार आहेत, जे तुम्हाला डेंग्यू तापातून लवकर बरे होण्यास मदत करू शकतात. 'लोकमतन्यूज'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.

  निरोगी हृदयासाठी रात्री यावेळात झोपी जाणं आहे फायदेशीर; नवीन संशोधनातील निष्कर्ष

  डेंग्यूवर आयुर्वेदिक उपचार

  डेंग्यू तापातून आराम मिळवण्यासाठी भरपूर नारळ पाणी प्या. गरम पाण्यात तुळशीची पानं उकळून नंतर ते पाणी प्या. याशिवाय मेथीची पानं उकळून चहा बनवून पिणंसुद्धा डेंग्यूचा ताप कमी होण्यास फायदेशीर ठरतं. चला तर जाणून घेऊया डेंग्यू ताप असताना अजून काय सेवन करणं फायदेशीर ठरेल.

  संत्र्याचा रस

  व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचं काम करतं, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे संत्र्याच्या रसाचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल.

  कडुनिंबाची पानं

  डेंग्यूच्या तापामध्ये कडुनिंबाच्या पानांचा अर्क पिणं फायदेशीर ठरतं. यामुळे रक्तातल्या प्लेटलेट्स, तसंच पांढर्‍या रक्तपेशींमध्ये वाढ होते. कडुनिंबाच्या पानांचा रस रोगप्रतिकारशक्ती सुधारू शकतो. कडुनिबांची पानं पाण्यामध्ये उकळून ते पाणी पिऊ शकता.

  मेथीची पानं

  मेथीची पानं ताप, तसंच वेदना कमी करण्यात फायदेशीर ठरू शकतात. डेंग्यू तापाची लक्षणं कमी करण्यासाठी मेथीची पानं हा महत्त्वाचा उपाय आहे. सध्या थंडीचे दिवस असून या दिवसात मेथीची पानं बाजारामध्ये सहज मिळू शकतात. ही पानं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी पिता येईल.

  पपईची पानं

  डेंग्यू तापावर पपईची पानं हा एक उत्तम उपाय आहे. ही पानं या लक्षणांपासून मुक्त होण्यास, प्रतिकारशक्ती वाढविण्यास आणि प्लेटलेट्सची संख्या वाढविण्यास मदत करतात. या पानांचा रस काढून तो दिवसातून दोनदा घेऊ शकता.

  तुम्हालाही घोरण्याची समस्या असेल तर काळजी घ्या; Heart Attack चा इशारा असू शकतो

  नारळ पाणी

  डेंग्यूमुळे उलट्या होऊ शकतात. त्यामुळे डिहायड्रेशन होतं. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात नारळ पाण्याचा समावेश करू शकता. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठीही हा एक चांगला पर्याय आहे.

  हे टाळा

  डेंग्यूच्या रुग्णाने चहा, कॉफी, सोडा किंवा शीतपेय घेणं टाळावं. त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं. ते डेंग्यू तापामध्ये हानिकारक आहे.

  First published:
  top videos

   Tags: Health