मराठी बातम्या /बातम्या /heatlh /बोटं मोडण्याची सवय चांगली की वाईट? तुम्ही सुद्धा वारंवार मोडतात बोटं? मग वाचा काय आहेत फायदे अन् नुकसान

बोटं मोडण्याची सवय चांगली की वाईट? तुम्ही सुद्धा वारंवार मोडतात बोटं? मग वाचा काय आहेत फायदे अन् नुकसान

बोटं मोडल्यानं सांध्यांच्या आजूबाजूच्या स्नायूंना आराम मिळतो, अशी लोकांची समजूत असते. त्यामुळं काही लोक वारंवार बोटं मोडतात

बोटं मोडल्यानं सांध्यांच्या आजूबाजूच्या स्नायूंना आराम मिळतो, अशी लोकांची समजूत असते. त्यामुळं काही लोक वारंवार बोटं मोडतात

बोटं मोडल्यानं सांध्यांच्या आजूबाजूच्या स्नायूंना आराम मिळतो, अशी लोकांची समजूत असते. त्यामुळं काही लोक वारंवार बोटं मोडतात

    नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : लहानांनी कधी कोणा मोठ्या व्यक्तीला बोटं दुमडून आवाज काढताना पाहिलं की त्यांना प्रचंड उत्सुकता वाटते. त्याचं अनुकरण करून तसा आवाज येतोय का हे त्यांच्याकडून पाहिलं जातं; पण त्यांनी असं करताना घरातल्या मोठ्या माणसांनी पाहिलं तर मात्र खैर नसते. कारण बोटं मोडणं (knuckle Cracking) म्हणजे एखाद्याचं वाईट चिंतणं असं मानलं जातं. त्यामुळे लहान मुलांना बोटं मोडताना पाहिल्यास मोठी माणसं त्यांना 'अशी बोटं मोडू नयेत, ही चांगली सवय नाही,' अशी सक्त ताकीद देतात. कारण विचारलं तर मात्र अनेकांकडे उत्तर नसतं.

    आज मोठेपणी कोणाला अशी बोटं मोडताना पाहिलं की अनेकांना ही लहानपणीची आठवण येत असेल. आपल्या आजूबाजूला आपण अनेक जण पाहतो, जे बसल्या बसल्या सतत बोटं मोडत असतात. अस्वस्थता, कंटाळा या कारणांमुळे ते असं करत असल्याचं आढळून येतं; पण यामागचं नेमकं कारण काय, याला काही शास्त्रीय आधार आहे का, याबाबत कुतूहल नक्कीच असतं. याच प्रश्नाचं शास्त्रीय उत्तर तज्ज्ञांनी दिलं असून, 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

    गरम की थंड, अंघोळीसाठी कोणतं पाणी आहे योग्य? संशोधकांनी सांगितलं याचं हे उत्तर

    ऑर्थोपेडिक सर्जन (Orthopedic Surgeon) डॉ. समरजित चक्रवर्ती यांनी 'द हेल्थसाइट'ला दिलेल्या माहितीनुसार, बोटं मोडणे ही चांगली सवयही (Habit) नाही किंवा ती वाईटही नाही. असं केल्यानं ताप येतो, सांधेदुखी होते असंही सांगितलं जातं; मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याचं डॉ. चक्रवर्ती यांनी नमूद केलं. बोटं मोडण्याच्या सवयीमुळे सांधेदुखी (Arthritis) किंवा इतर समस्या उद्भवू शकतात असा दावा काही आरोग्यविषयक अभ्यासांमध्ये केला गेला आहे; पण याला कोणताही वैज्ञानिक पुरावा मिळालेला नाही, असं डॉ. चक्रवर्ती यांनी स्पष्ट केलं आहे.

    बोटं मोडताना जो एक विशिष्ट आवाज येतो, त्यामागे शास्त्रीय कारण आहे. बोटांच्या दोन हाडांच्या सांध्यांमध्ये एक द्रव (Fluid) असतो, जो हाडांमध्ये एक प्रकारचं ग्रीसिंग म्हणून काम करतो. हाडांच्या हालचालीसाठी ते आवश्यक असतं. याला लिगामेंट सायनोव्हियल फ्लुइड (Ligament Synovial Fluid) म्हणतात. जेव्हा बोटं वारंवार मोडली जातात तेव्हा हे लिगामेंट सायनोव्हियल फ्लुइड कमी होऊ लागतं आणि हाडं एकमेकांना घासू लागतात. अशा वेळी हाडांमध्ये असलेले कार्बन डाय ऑक्साइडचे (Carbon Di Oxide) बुडबुडे फुटतात आणि हाडं (Bones) एकमेकांना घासल्याचा कडकड असा आवाज येतो.

    chikoo : चिकूमुळे पचन आणि सुस्तीची समस्या राहते दूर; आणखी बरेच आहेत त्याचे फायदे

    बोटं मोडल्यानं सांध्यांच्या आजूबाजूच्या स्नायूंना आराम मिळतो, अशी लोकांची समजूत असते. त्यामुळं काही लोक वारंवार बोटं मोडतात; मात्र वारंवार अशी बोट मोडल्यानं बोटांवर ताण येतो आणि बोटांच्या दोन हाडांच्या सांध्यांमध्ये असणाऱ्या लिगामेंट सायनोव्हियल फ्लुइडवर परिणाम होतो. त्यामुळे काही काळानंतर हाडं सतत घासल्यामुळे संधिवात होऊ शकतो, असा दावा काही अभ्यासांमध्ये करण्यात आला आहे.

    प्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि संगीतकार निकोल पगानिनी यांना मारफान सिंड्रोम म्हणजेच हायपर-मोबाइल जॉइंटचा त्रास होता, तरीही त्यांची बोटं लांब असल्यानं ते सहजपणे व्हायोलिन वाजवू शकत होते, असं डॉ. चक्रवर्ती यांनी सांगितलं. बोटं मोडण्यामुळं काही वेळा सांधे सैल झाल्यानं हायपर-मोबाइल जॉइंटचा (Hyper Mobile Joint) त्रास होऊ शकतो; पण सांधेदुखीशी याचा काहीही संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

    First published:
    top videos

      Tags: Health, Lifestyle