मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

कोविड-19 ची दुसरी लाट: लक्षणे, धोके आणि प्रतिबंध

कोविड-19 ची दुसरी लाट: लक्षणे, धोके आणि प्रतिबंध

शारीरिक अंतर ठेवणे, मास्क वापरणे, खोल्यांमध्ये हवा खेळती ठेवणे, गर्दी किंवा इतरांशी जवळून संपर्क टाळणे आणि उत्तम स्वच्छता पाळणे यांसारख्या कोविड-सुसंगत वर्तनाविषयी सातत्याने संदेश पाठवत आहेत.

शारीरिक अंतर ठेवणे, मास्क वापरणे, खोल्यांमध्ये हवा खेळती ठेवणे, गर्दी किंवा इतरांशी जवळून संपर्क टाळणे आणि उत्तम स्वच्छता पाळणे यांसारख्या कोविड-सुसंगत वर्तनाविषयी सातत्याने संदेश पाठवत आहेत.

शारीरिक अंतर ठेवणे, मास्क वापरणे, खोल्यांमध्ये हवा खेळती ठेवणे, गर्दी किंवा इतरांशी जवळून संपर्क टाळणे आणि उत्तम स्वच्छता पाळणे यांसारख्या कोविड-सुसंगत वर्तनाविषयी सातत्याने संदेश पाठवत आहेत.

  • Published by:  Manoj Khandekar

या महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशाला धडक दिली आहे. निश्चित प्रकरणांच्या एकूण संख्येमध्ये दररोज होणारी वाढ पाहता नागरिकांमध्ये भीती आणि घाबरत निर्माण होत आहे व महामारीचा प्रसार रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांना अनेक निर्बंध घालावे लागत आहेत.

22 एप्रिल 2021 रोजी भारतात 3,15,735 नवीन निश्चित प्रकरणांची(कोविड-19 ची 22,84,411 सक्रीय प्रकरणे) नोंद झाली आणि याचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात दिसून आला. तज्ञांनी कोविड-19चा म्युटंट स्ट्रेन(नवीन विषाणू) अधिक तीव्र आणि संसर्गजन्य असल्याचा दावा केल्याने या चिंतेत अधिकच भर पडली. संशोधन चालू असले तज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञ या नवीन विषाणूचे विश्लेषण करत असले तरीही या चा संसर्ग रोखून आपला बचाव करण्यासाठी आपण याची लक्षणे आणि धोके समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 60+ वयोगटातील व्यक्ती आणि अन्य आरोग्यविषयक समस्या असलेल्या यांमध्ये गंभीर आजारपण येण्याचा अधिक धोका असतो. तरीही कोविड-19 कोणालाही होऊ शकतो आणि गंभीर आजारपण येऊ शकते किंवा आजाराला बळी पडू शकतो आणि यामध्ये वयाचा काहीही संबंध नसतो.

कोविड-19 ची अत्यंत सर्वसामान्य लक्षणे म्हणजे ताप, कोरडा खोकला आणि थकवा. श्वास मंदावणे, चव न कळणे किंवा वास न येणे, छातीत दुखणे, नाक बंद होणे, डोळ्यांच्या बुब्बुळांचा दाह, घसा खवखवणे, डोकेदुखी, स्नायू किंवा सांधे दुखणे, त्वचेवर पुरळ येणे, मळमळ किंवा ओकारी, अतिसार, थंडी वाजणे किंवा चक्कर येणे ही काही अन्य लक्षणेही काही रुग्णांमध्ये आढळली. अही लक्षणे असलेल्या लोकांनी ताबडतोब चाचणी करून घेऊन वेळीच वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत. कोणतीही लक्षणे नसलेली अज्ञात प्रकरणे म्हणजे ज्यांमध्ये लक्षणे दिसत नाहीत अशा संसर्ग झालेले लोक त्यांच्याही नकळत इतरांपर्यंत संसर्ग पोहचवत असल्याने ही एक चिंतेची बाब आहे.

शासन आणि आरोग्यविषयक तज्ञ शारीरिक अंतर ठेवणे, मास्क वापरणे, खोल्यांमध्ये हवा खेळती ठेवणे, गर्दी किंवा इतरांशी जवळून संपर्क टाळणे आणि उत्तम स्वच्छता पाळणे यांसारख्या कोविड-सुसंगत वर्तनाविषयी सातत्याने संदेश पाठवत आहेत. चांगली स्वच्छतेमध्ये हँड रब, हँड वॉश किंवा साबण आणि पाणी वापरून सॅनिटाईझ करणे, डोळे, नाक व तोंड यांना स्पर्श करण्याचे टाळणे, खोकताना किंवा शिंकताना टिश्यू किंवा कोपरातून वळवून हात यांनी नाक व तोंड झाकणे, स्पर्श झालेले पृष्ठभाग वारंवार स्वच्छ/ निर्जंतुक करणे यांचा समावेश होतो. आपल्यामध्ये कोविड-19 ची कोणतीही चिन्हे/ लक्षणे आढळल्यास किंवा आपण एखाद्या ज्ञात कोविड-19 च्या रुग्णाच्या जवळून संपर्कात आल्यास चाचणी करून घेणेही महत्त्वाचे आहे.

सध्या, सरकारी केंद्रांवर मोफत RT-PCR(आरटी-पीसीआर) चाचण्या करणार्‍या कोविड चाचणी सुविधांची संख्या वाढली आहे, तर खासगी लॅब आपल्या घरातून नमुना मिळवून सशुल्क चाचणी करतात. दररोज करण्यात येणाऱ्या चाचण्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, पुढे निश्चित रिपोर्ट्स मिळण्यास होणारा विलंब हानिकारक ठरत आहे. म्हणूनच, कोविडची लक्षणे असलेल्या व्यक्तीने चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत घरातच विलगीकरणात राहिले पाहिजे. लवकर चाचणी, वेळेवर उपचार, कोविड-सुसंगत वर्तन आणि लसीकरण यांमुळे मृत्यू आणि जलद प्रसाराला खीळ बसेल.

कोविड -19ची चिन्हे किंवा लक्षणे असलेली कोणतीही व्यक्ती घरी किंवा कोविड चाचणी सुविधांमध्ये चाचणी करू शकते. व्यक्ती बाधित असल्याचे समजल्यावर त्या व्यक्तीने सर्वप्रथम आपल्या परिसरातील कोविड-19 हेल्पलाईन व रूग्णालयाशी थेट संपर्क साधला पाहिजे, तसेच बेडच्या उपलब्धतेच्या आधारे बेडचे वितरण आणि प्रवेश प्रशासनाशी समन्वयाने केले पाहिजेत.

डॉ. मुकेश मोहोडे आणि डॉ. शैलेश वागळे – युनायटेड वे मुंबईचे एनजीओ(स्वयंसेवी) भागीदार

First published:

Tags: Sanjeevani