मुंबई, 07 मे : देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना तो कसा पसरतो आणि यापासून वाचण्याचे उपाय माहिती असायला हवेत. शिवाय कोरोना संक्रमणाचा
(Corona infection) शरीरावर वाईट परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्यायलाच हवं. कोरोना व्हायरस
(Corona virus) फुप्फुसांप्रमाणे डोळ्यांवरही
(Corona affects the eyes & lungs) परिणाम करतो आहे. त्यामुळे डोळ्यांमध्ये काही समस्या दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
कोरोना इन्फेक्शन नाक, तोंड यासारख्या डोळ्यांजवळच्या भागामधून सुरू होतं. कोरोना रुग्णाच्या शिंकण्यामुळे, खोकण्याने उडणाऱ्या स्त्रावामधून कोरोनाचे विषाणू नाक, तोंड आणि डोळ्यामधून शरीरात प्रवेश करतात. स्पर्शामधूनही कोरोनाचा संसर्ग होतो.
डोळ्यांना इन्फेक्शन झाल्यास डोळे लाल होणं, डोळे सुजणं, याशिवाय इन्फेक्शन गंभीर असल्यास झाल्यास डोळ्यांच्या रेटीनावरही
(Retina of the eye) परिणाम होतो.
(
केरळला मिळाले 73 लाख डोस, लसीकरण केले 74 लाख, वाया जाण्याचं प्रमाण 0 टक्के)
नेत्र रोग तज्ज्ञ डॉ. अमित गर्ग
(Ophthalmologist Dr. Amit Garg) सांगतात, कोरोना व्हायरस आपल्या डोळ्यांमध्ये लालसरपणा अणि सूज निर्माण करतो. डोळ्यांच्या बाहेरच्या भागात इन्फेक्शन असेल तर औषधाने ते बरं होतं. पण इन्फेक्शन आत गेल्यास रेटिनावर परिणाम होतो. काही रुग्णांच्या नजरेवर परिणामही
(Effects on patient vision) होतो.
डॉ. अमित सांगतात, कोरोनापासून बचावासाठी आपण मास्क घालत आहोत ज्यामुळे नाकाला आणि तोंडाला संरक्षण मिळतं. पण डोळ्यांना नाही. त्यामुळे डोळ्यांना सतत हात लावू नये. त्याऐवजी डोळ्यावर चष्मा घालावा किंवा फेसशिल्डचाही तुम्ही वापर करू शकता. चष्मा किंवा फेसशिल्डमुळे कोरोनाचे विषाणू डोळ्यांपर्यंत पोहोचणार नाहीत. बाहेर जातानाच नाही तर कोरोना पेशंटची काळजी घेतानाही मास्कबरोबर डोळ्यांचंही संरक्षण होईल याकडे लक्ष द्या.
(
महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन गुजरातला पळवून नेण्याचा कट उघड)
डोळे सतत चोळू नये. डोळ्यांना खाज येत असेल किंवा चष्मा साफ कारायचा असेल तर टीश्यू पेपरचा वापर करा. कोरोना काळात डोळ्यामध्ये मॉइस्चराइजिंग ड्रॉप्स घातल्याने फायदा मिळू शकतो. कोणत्याही कारणाने डोळ्यांना हात लावण्याची गरज असेल तर, आधी हात 20 सेकंद साबण लाऊन चोळून धुवा आणि डोळ्यांना हात लावल्यावरही स्वच्छ धुवा, असा सल्ला डॉ. गर्ग यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.