Home /News /heatlh /

5 महिन्यांत 7 वेळा इन्फेक्शन, सातवी सर्जरी; ब्लॅक फंगसमुळे भयंकर अवस्था, पण त्याने मानली नाही हार

5 महिन्यांत 7 वेळा इन्फेक्शन, सातवी सर्जरी; ब्लॅक फंगसमुळे भयंकर अवस्था, पण त्याने मानली नाही हार

कोरोनामुक्त तरुणाला वारंवार म्युकरमायकोसिसचा (Mucormycosis) संसर्ग होतो आहे, पण तो मोठ्या धीराने पुन्हा पुन्हा या आजाराचा मोठ्या धीराने सामना करतो आहे.

    अहमदाबाद, 25 मे : एका आजारातून बरं झाल्यानंतर दुसरा आजार बळावला तर रुग्ण फक्त शारीरिकरित्या कमजोर होत नाही तर मानसिकरित्याही खचतो. पण कोरोनावर (Coronavirus) मात केलेल्या एका तरुणाला म्युकरमायकोसिस (Mucormycosis) झाला. एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल सात वेळा त्याला ब्लॅक फंगस इन्फेक्शन (Black fungus infection) झालं. आतापर्यंत त्याने सर्जरी करून सहा वेळा यावर मात केली आणि आता सातव्या सर्जरीला तो सामोरा जाणार आहे (Man seven times infected with mucormycosis). पण वारंवार संसर्ग होऊनही तो खचला नाही आहे. तर पुन्हा पुन्हा मोठ्या धीराने त्याचा सामना करतो आहे. कोरोनानंतर आता देशात म्युकरमायकोसिसचंही संकट आहे. काही जणांना कोरोनाचा संसर्ग पुन्हाही झाला आहे. त्याचप्रमाणे आता म्युकरमायकोसिसही पुन्हा पुन्हा होत असल्याचं दिसून आलं आहे. गुजरातच्या (Gujrat Mucormycosis) राजकोटमधील तरुण विमल जोशी सध्या अशाच भयंकर परिस्थितीचा सामना देतो आहे. विमल 5 महिन्यांपासून म्युकरमायकोसिसशी लढतो आहे. हे वाचा - ...तर रुग्णाला फुलांमुळेही जीवघेण्या आजाराचा धोका; डॉक्टरांनी केलं सावध मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणारा विमल गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना संसर्ग झाला होता. कोरोनाविरोधात त्याने यशस्वी लढा दिला. पण कोरोनावर मात करताच त्यांना म्युकरमायकोसिसने गाठलं. नोव्हेंबर, 2020 पासून तो रुग्णलायत दाखल आहे. कोरोनाशी लढा तर जिंकले पण म्युकोरमायकोसिस काही त्याचा पिच्छा सोडत नाही आहेत. अजूनही तो या आजारातून बरा झाला नाही. पाच महिन्यांत त्याला सात वेळा ब्लॅक फंगसचं निदान झालं. त्याच्या सहा सर्जरी झाल्या आहेत आणि आता सातवी सर्जरीही होणार आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार विमलची पत्नी चांदनीने सांगितलं, विमलची आतापर्यंत चार लेप्रोस्कोपी, एक फोरहेडर आणि एक ब्रेन सर्जरी झाली आहे. इतक्या सर्जरी केल्यानंतर आता ते ठिक झाले असंच आम्हाला वाटलं. पण त्यांच्या मेंदूत पुन्हा म्युरकमायकोसिस असल्याचं निदान झालं. आता त्यांची न्यूरो सर्जरी केली जाणार आहे. हे वाचा - कोरोना घटला तरी पुणे, नागपूर, मुंबईची चिंता कायम; आता नव्या आजाराचा प्रकोप इतक्या शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांच्या किडनीवरही गंभीर दुष्परिमाम झाला आहे. त्यामुळे त्यांना महागडी अशी औषधं घ्यावी लागतात. या औषधांचा कोर्स पूर्ण झाल्यावरच त्यांची न्यूरो सर्जरी केली जाणार आहेत. आता त्यांना तब्बल 96 हजार रुपयांच्या औषधांची गरज आहे. या आजाराशी लढा देताना त्यांच्यासमोर आता आर्थिक प्रश्नही उभा राहिला आहे. आतापपर्यंत उपचारासाठी 41 लाख रुपए खर्च झाले आहेत आणि आणखी 10-15 लाख रुपयांची गरज आहे. घरखर्चाचा संपूर्ण पैसा विमलच्या उपचारात लावण्यात आला. घरही विकलं आहे. नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, ओळखीच्या बहुतेक व्यक्तींकडून त्यांनी आर्थिक मदत घेतली. शिवाय लोकांनाही मदतीचं आवाहन केलं आहे.  आपल्या नवऱ्याची सातवी सर्जरीही यशस्वी होईल आणि तो घरी परततेल, असा विश्वासही चांदनीने व्यक्त केला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Gujrat, Serious diseases

    पुढील बातम्या