मुंबई, 5 जून- कोरोनामुळे (Corona Pandemic) लोकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले आहेत. बरेच जण वर्क फ्रॉम होममुळे घरीच आहेत. कामाचा ताण वाढतोय त्यामुळे लोकांचे मानसिक आरोग्य(Mental Health) ढासळत आहे. वाढता तणाव दूर करण्यासाठी बरेच जण योग आणि मेडिटेशनची मदत घेत आहेत. तसेच गेल्या काही वर्षांत लोक आरोग्याबाबत सजग झाले आहे. लोकांचा मेडिटेशन आणि योग तसेच व्यायाम करण्याकडे कल वाढत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर योगासने तसेच मेडिटेशनचे नवनवे ट्रेंड येत आहेत. मन शांत ठेवण्यासाठी लोक चांगलं म्युझिक ऐकतात तसेच वॉकला जाणं पसंत करतात. असाच मेडिटेशनचा एक नवा प्रकार सध्या ट्रेंड(trend) करतोय. तो म्हणजे चॉकलेट मेडिटेशन (chocolate meditation). हे तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यात मदत करते. याबाबतचं वृत्त टीव्ही 9 हिंदीने दिलं आहे.
चॉकलेट मेडिटेशन केल्याने आपल्याला पॉझिटीव्हीटी मिळते. तसेच तणावमुक्त होण्यासही मदत होते. चला तर जाणून घेऊया चॉकलेट मेडिटेशन म्हणजे काय?
चॉकलेट मेडिटेशनसाठी तुम्ही रेग्युलर चॉकलेटऐवजी डॉर्क चॉकलेटचा वापर करा. मेडिटेशन करताना तुम्हाला हे चॉकलेट खायचंय तसेच त्याची चव आणि सुगंध अनुभवत ध्यान केंद्रित करायचंय. चॉकलेट मेडिटेशन केल्याने डिप्रेशन (depression)आणि निगेटिव्ह थॉट्स (negative thoughts) कमी करण्यात मदत होते. तसेच डॉर्क चॉकलेट (dark chocolate ) खाल्ल्याने तुमचे वजनही नियंत्रणात राहील. चॉकलेट शरीरात हॅप्पी हॉर्मोन (happy hormones) रिलीज करतं त्यामुळे आपल्याला पॉझिटीव्हिटी मिळते.
(हे वाचा:आठवड्यातील 'या' दिवशी आणि वेळेत Heart Attack येण्याचं प्रमाण सर्वाधिक )
चॉकलेट मेडिटेशन कसं करायचं -
चॉकलेट मेडिटेशन करण्यासाठी एका शांत जागेवर योगा मॅट टाकून बसा. शरीराला रिलॅक्स करून दीर्घ श्वास घ्या. काही सेकंद चॉकलेटकडे बघा आणि त्याच्या फ्लेवरचा अनुभव घ्या. त्यानंतर चॉकलेट नाकाजवळ न्या आणि त्याचा सुगंध घ्या. त्यानंतर चॉकलेटचा एक तुकडा खा आणि त्याच्या चव आणि सुगंधावर लक्ष केंद्रित करा. काही सेकंद थांबून दीर्घ श्वास घ्या आणि नॉर्मल स्थितीत या. ही प्रोसेस पुन्हा करा. चॉकलेट मेडिटेशन (chocolate meditation) केल्यानंतर दीर्घ श्वास घेत परत नॉर्मल स्थितीत या. एका अभ्यासानुसार,चॉकलेटमध्ये 300 फ्लेवर असतात.
(हे वाचा: अरे बापरे! उन्हामुळे चेहऱ्याची अशी भयंकर अवस्था तुम्ही कधीच पाहिली नसेल )
डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे
चॉकलेट आपला मूड चांगला ठेवतं. तसंच तणाव कमी करण्यास मदत करतं. यामध्ये 70 टक्के कोको आहे, जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतं. याशिवाय हे वजन नियंत्रणातही ठेवते. कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तज्ज्ञ आहारात डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fitness, Health Tips