नवी दिल्ली, 25 एप्रिल: देशातील कोविड रुग्णांची
(Covid Patients) संख्या रोज तीन लाखांनी वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून कोरोना लसीकरण वाढविण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. 1 मेपासून 18 वर्षावरील प्रत्येकजण कोरोना लसीकरण
(Corona Vaccine) करू शकणार आहे. पण लसीकरणानंतरही कोराना
(Corona) होत असल्याने अडचणी वाढलेल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास देशातील कोविशील्ड
(Covishield) आणि कोव्हॅक्सिनच्या
(Covaxine) डोसनंतर देशभरातील 25 हजाराहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर 4,208, तर दुसरा डोस घेतल्यानंतर 695 लोकांना कोरोना झाल्याचं सांगण्यात आलं. कोविशील्ड लस देशातील सुमारे 11 कोटी लोकांना मिळाली आहे. यापैकी पहिला डोस घेतल्यानंतर 17,145 आणि दुसर्या डोसनंतर 5,014 लोकांना कोरोना झाला.
(
जालन्यात मृत रुग्णाच्या बँक खात्यातून पैसे गायब; बोटाचे ठसे वापरुन चोरी)
अशा परिस्थितीत लसीच्या विश्वासाहर्तेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना होण्याची बरीच प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तर, दुसरा त्या व्यक्तीने किती दिवसांनी दुसरा डोस घ्यावा असा प्रश्न विचारला जात आहे.
(
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विस्फोटानं देश चिंतेत, इतकी का बिघडली परिस्थिती?)
तज्ञांच्या मते, कोरोनाचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह झाल्यास दुसरा डोस आठ आठवड्यांनी म्हणजेच दोन महिने पूर्ण झालायनंतर घ्यायला हवा. पहिली लस घेतल्यानंतर दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांनी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात. पण कोरोना झाला असेल तर लसीचा दुसरा डोस पहिल्या लसीनंतर आठ आठवड्यांनी घेणे चांगले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.