मुंबई, 25 मार्च : राज्यात बुधवारी कोरोना रुग्णसंख्येने (Coronavirus in Maharashtra) उच्चांक गाठला. आतापर्यंत सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान आता पुढील दोन आठवडे अधिक धोक्याचे असणार आहेत. या कालावधीत अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या (Coronavirus Active cases in Maharashtra) 3 लाखांपर्यंत पोहोचेल तर दिवसाला एक हजार मृत्यू होतील, असा धोक्याचा इशारा राज्याच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
बुधवारी राज्यात तब्बल 31,855 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत दिवसातील ही सर्वाधिक उच्चांक संख्या आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 25,64,881 वर पोहोचली आहे. बुधवारी 95 रुग्णांच्या मृत्यूसह बळींचा आकडा 53,684 झाला आहे. तर सध्या 2,47,299 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हे वाचा - 45 पेक्षा जास्त वय असल्यास तुम्हालाही मिळणार कोरोना लस; समजून घ्या प्रक्रिया
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 61,125 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ नागपुरात 47,707 आणि मुंबईत 32,927 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 4 एप्रिलपर्यंत राज्यात कोरोनाचे अॅक्टिव्ह केसेस 3 लाखांपर्यंत पोहोचतील, शिवाय मृत्यूचा आकडाही पुढील 11 दिवसांत 64,000 च्या वर पोहोचेल असा इशारा महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
आठवड्याला संसर्गाचं प्रमाण एक टक्क्याने वाढतं आहे. सध्या असलेला 2.27% मृत्यूदर लक्षात घेता एकूण 28,24,382 रुग्णसंख्येच्या 64,613 मृत्यू होण्याची शक्यता आहे. पुढील दोन आठवड्यात दिवसाला एक हजार मृत्यूची शक्यता विभागाने वर्तवली आहे. असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. सध्या राज्यात 41% पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहे. त्यापैकी 8% गंभीर आहेत आणि 0.71% व्हेंटिलेटरवर आहेत.
हे वाचा - हँड सॅनिटायजर पसरवतोय कॅन्सर; आढळले धोकादायक केमिकल्स, अभ्यासातून मोठा खुलासा
अनेक जिल्ह्यांमध्ये उपचाराच्या योग्य सुविधा नाहीत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार पुरेशा प्रमाणात नॉन ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर आहेत पण जवळपास 4,000 पेक्षा जास्त ऑक्सिजन बेडची गरज आहे. नागपूर आणि ठाण्याने जर त्यांच्या सुविधा वाढवल्या नाहीतर तर या रुग्ण वाढ आणि रुग्ण मृत्यूबाबतील या दोन्ही जिल्ह्यांची परिस्थिती खूपच गंभीर होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona hotspot, Corona spread, Coronavirus, Covid cases, Covid-19, Maharashtra, Mumbai